संधी आहे, वाजवा!
By admin | Published: March 4, 2016 11:54 AM2016-03-04T11:54:03+5:302016-03-04T11:54:03+5:30
आपल्या स्टार्ट अपसाठी दोन कोटी रुपयांचं क्यू प्राईझ मिळवणारा राजेश मानपत इथवर कसा पोचला? मेक इन इंडिया सप्ताहात सर्वोत्तम स्टार्टअपचा किताब मिळविणा:या तरुण दोस्ताशी विशेष गप्पा.
Next
मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया हे दोन शब्द आता आपण सतत ऐकतोय. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्यमस्नेही बनावं म्हणून सरकार प्रोत्साहन देतं आहे. आणि याच वा:यावर स्वार होत कोची, हैदराबाद, बेंगळुरू इथल्या आयटी हब्जमधले अनेक तरुण नोकरी सोडून स्वत:चं काहीतरी निर्माण करण्यासाठी, आपल्या मनातील संशोधन कल्पनांचा विकास करण्यासाठी स्टार्टअपचा मार्ग स्वीकारत आहेत. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या मेक इन इंडिया सप्ताहामध्येही या स्टार्टअप्सचा बोलबाला होता.
गेल्याच महिन्यात क्वालकॉम या गुंतवणूक समूहाने भारतातील स्टार्टअप्ससाठी क्यू प्राइझ नावाची एक स्पर्धा घेतली होती. संपूर्ण भारतातील 5क्क् स्टार्टअप कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतला. आणि या क्यू प्राइझमध्ये बाजी मारली ती बेंगळुरूस्थित ‘आर्क रोबोट’ या कंपनीने. पहिला क्रमांक मिळविणा:या या स्टार्टअपला आता क्वालकॉमकडून दोन कोटी रुपये मिळाले असून, भारतातील एक उत्तम स्टार्टअप अशी ओळखही त्यांना लाभते आहे.
आर्क रोबोटची भन्नाट कल्पना.
ही भन्नाट कल्पना आलीये एका भन्नाट तरुणाच्या डोक्यातून, तो म्हणजे राजेश मानपत. आपल्या नेमबाजीच्या छंदामधून त्याने 2008 साली आय फ्युचर्स या मशीन व्हीजन कंपनीची स्थापना केली. तिच्याच पालकत्वाखाली आर्क रोबोट्सचा जन्म झाला. वेअरहाऊसेस, गुदामांमधील कामांमध्ये गती यावी, वस्तूंची ने-आण आणि स्टोअरेज अशा कामांसाठी थेट रोबोटच तयार केले तर असा विचार डोक्यात आला आणि आता त्यासाठी लागणारे रोबोट्स ही कंपनी तयार करते. हे काम नेमकं चालतं कसं आणि ‘मेक इन इंडिया’ वीकमध्ये मिळालेल्या बक्षिसानंतर पुढे काय या विषयावर राजेशशी गप्पा मारल्या. त्याच गप्पांचा हा काही अंश.
राष्ट्रीय पातळीवरचा नेमबाज आणि आता उद्योजक हा वेगळाच प्रवास तू केलास, कशी सापडली ही वाट?
- संगणकाची आणि नेमबाजीची आवड मला आधीपासूनच आहे. नेमबाजीमध्ये राष्ट्रीय पातळीवर रायफल शूटिंगचं पदक याच आवडीमुळे आणि सरावामुळे मिळालं. त्यानंतर मी बीसीएस केलं. 2क्क्8 साली आय फ्युचर्स कंपनीची स्थापना झाली, त्यात मी एक सहसंस्थापक होतो. त्यामध्ये मी एलिट स्कोरर ही इलेक्ट्रॉनिक शूटिंग टार्गेट प्रणाली विकसित केली आणि ती प्रचंड यशस्वी झाली. 25 देशांमध्ये सध्या तिला मागणी आहे. नेमबाजी आणि तंत्रज्ञान दोन्ही आवडत होतं, म्हणून हे सुचलं.
मग आर्क रोबोट्स कसं सुरू झालं?
- आय फ्युचर्समधूनच 2क्14 मध्ये आर्क रोबोटचा जन्म झाला. आर्क रोबोटचा विकास करताना आणि त्याचा वापर केल्यानंतर जे अडथळे आले किंवा ज्या गोष्टी समजत गेल्या त्यातूनच नव्या कल्पनांचा विकास होत गेला आणि नवे संशोधन आमच्याकडून होत गेले. या आठ वर्षाच्या काळामध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. ग्राहकांचं समाधान होण्यासाठी त्यात बदल करतानाही नवनवं शिकायला मिळतं. आर्क रोबोटसाठी सध्या माझी आठ पेटंट्स प्रलंबित आहेत. इ-कॉमर्स कंपन्यांना कामाच्या संचलनातील अडथळे आणि संथगतीमुळे अनेकदा तोटा होतो, त्याचं आम्ही निरीक्षण केलं होतं. त्यामुळे आर्क रोबोटसारखा रोबोट करण्याची कल्पना आम्ही विकसित केली. आता इतरही क्षेत्रंमध्ये रोबोट तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का याची आम्ही चाचपणी करतो आहोत.
मेक इन इंडिया सप्ताहामध्ये पहिला नंबर मिळाला, आता पुढे?
- हा आमच्यासाठी खरंच एक आनंदाचा क्षण होता. क्यू प्राइझमध्ये देशातील उत्तमातील उत्तम स्टार्टअप कंपन्यांनी सहभाग घेतला होता आणि त्यांच्यामध्ये जबरदस्त चुरस होती. अंतिम फेरीमध्ये आमच्यासह अनेक चांगल्या स्टार्टअप्समध्ये स्पर्धा होती. त्यामुळे अशा स्पर्धेत मिळालेले यश अधिकच बळ देते. या पाचशे कंपन्यांमधून भारतातील पहिल्या क्रमांकाचे हार्डवेअर टेक स्टार्टअप होणं भूषणावह आहे. सध्या आम्ही बंगळुरूमधून रोबोट्स तयार करत आहोत आणि लवकरच जगभरात हे रोबोट्स पाठविले जातील असा विश्वास आम्हाला वाटतो.
स्टार्टअप इंडिया या योजनेबद्दल तुला काय वाटते? तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे असं वाटतं तुला?
- भारतीय मुलांमध्ये अनेक विशेष कौशल्ये आणि प्रतिभा आहेत. या गुणांच्या विकासासाठी अशा व्यासपीठाची गरज होतीच. नव्या युगातील प्रश्न सोडविण्यासाठी स्टार्टअपची गरज लागणार आहे. हे स्टार्टअप्स केवळ उद्योजक तयार करणार नसून रोजगार निर्मिती करत आहेत आणि भविष्यात मोठय़ा प्रमाणावर यात रोजगार निर्मितीची शक्यता आहे. ज्या मुलांना काही नवे करायचे आहे, समस्या सोडवायच्या आहेत त्यांनी स्टार्ट अप्सकडे जरुर वळावं. प्रत्येक कामामध्ये जोखीम असतेच. उद्योगातही ती असणारच. मात्र संधी दिसत असेल तर ती आपण नक्की वाजवून पाहायला हवी!
क्यू प्राइझ
क्वालकॉम व्हेंचर्स भारतामध्ये 2007 पासून कार्यरत आहे. 2क्क्9 पासून भारतीय स्टार्टअप्ससाठी 2009 पासून क्वालकॉमने क्यू प्राइझ ही स्पर्धा सुरू केली. मुंबईमध्ये पार पडलेल्या मेक इन इंडिया सप्ताहात 18 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले. पाच अंतिम स्पर्धकांमधून आर्क रोबोटची निवड यावेळेस करण्यात आली आणि दोन कोटी रुपयांचे बक्षीसही देण्यात आले. स्पर्धकांची परीक्षाही तितक्याच तोडीच्या परीक्षकांनी घेतली. क्यू प्राइझच्या परीक्षकांमध्ये भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रलयाचे सचिव अमिताभ कांत, इन्फोसिसचे सहसंस्थापक क्रिस गोपालकृष्णन, क्विकपॉड डॉट कॉमचे संस्थापक रवि गुरुराज, क्वालकॉम इंडियाचे अध्यक्ष सुनील लालवाणी, क्वालकॉम व्हेंचर्सचे कार्थी मदसामी यांचा समावेश होता.
आर्क रोबोट्स
आर्क रोबोट हे 250 किलोर्पयत वजन उचलू शकणारे रोबोट्स आहेत. वेअरहाऊसमधील जागेचा सुयोग्य वापर होण्यासाठी, वस्तूंची हाताळणी कमीत कमी वेळेत होण्यासाठी हे रोबोट्स तयार केले गेले आहेत. इ-कॉमर्स क्षेत्रतील कंपन्यांना हजारो वस्तू दिवसभरात वर-खाली किंवा आत-बाहेर करावे लागतात. सणासुदीच्या दिवसांमध्ये किंवा सुटय़ांच्या काळामध्ये वस्तू मोठय़ा संख्येने वेअरहाऊसमध्ये येतात, त्यांच्याही हालचाली वेळेत होणो आवश्यक असतं. या सर्वासाठी या रोबोटची मदत होऊ शकेल!
- ओंकार करंबेळकर
onkark2@gmail.com