तुम्हाला आलेत रॅगिंगचे काही अनुभव? - तरुण डॉक्टरांसाठी एक आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 04:14 PM2019-05-30T16:14:09+5:302019-05-30T16:14:16+5:30

तुम्ही शिकता आहात किंवा शिकला आहात वैद्यकीय महाविद्यालयात? तुम्हाला आलेत रॅगिंगचे काही अनुभव?

Have you experienced some ragging? - An appeal to young doctors | तुम्हाला आलेत रॅगिंगचे काही अनुभव? - तरुण डॉक्टरांसाठी एक आवाहन

तुम्हाला आलेत रॅगिंगचे काही अनुभव? - तरुण डॉक्टरांसाठी एक आवाहन

googlenewsNext
ठळक मुद्दे या प्रकारांना आळा बसावा, यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल?

मुंबईच्या नायर महाविद्यालयात शिकणार्‍या डॉ. पायल तडवीनं
रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली. 
इतका छळ वैद्यकीय महाविद्यालयात होतो की,
एक होतकरू डॉक्टर स्वतर्‍ला संपवते?
याला जबाबदार कोण?
वैद्यकीय महाविद्यालयात होणारं रॅगिंग,
त्यातला छळ,
चलता है अ‍ॅटिटय़ूड
भयंकर अपमान
आणि सिनिअर्स असंच वागतात ही रीत.
हे सारं आम आहे,
अशी चर्चा उघड होते.
त्यांसदर्भातला एक लेख
‘ऑक्सिजन’ने. प्रसिद्ध केलाही होता.
मात्र त्या चर्चेत असं समोर आलं की,
अनेक मुलंमुली घाबरून गप्प बसतात.
विशेषतर्‍ सरकारी मेडिकल महाविद्यालयात
तर असे प्रकार सर्रास होऊनही कुणी तक्रार करत नाही.
हे सारं बंद व्हायला हवं,
असं नाही वाटतं?
त्यासाठी मनमोकळेपणानं बोला.
* तुम्ही शिकता आहात किंवा शिकला आहात
वैद्यकीय महाविद्यालयात?
तुम्हाला आलेत रॅगिंगचे काही अनुभव?
* त्याच्याशी ‘डील’ करणं कसं जमलं? 
की भयंकर वेदनादायी काळ होता तो?
त्यावर उपाय कसा शोधला?
* महाविद्यालयं या प्रकरणात काय भूमिका घेतात
 किंवा घेतच नाहीत?
* या प्रकारांना आळा बसावा, यासाठी
तुम्ही कोणते उपाय सुचवाल?

- या मुद्दय़ांच्या आधाराने तुमचे अनुभव जरूर लिहा.
तुमचं नाव प्रकाशित होऊ नये अशी इच्छा असेल,
तर नाव लिहिणं बंधनकारक नाही.
तुमच्या नावापेक्षा तुमचा अनुभव आणि मत महत्त्वाचं!
लिहून पाठवणं शक्य नसेल
तर व्हिडीओ किंवा नुस्ता ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून पाठवली तरी चालेल.


इमेल- Oxygen@lokmat.com
अंतिम मुदत- 5 जून 2019

Web Title: Have you experienced some ragging? - An appeal to young doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.