हिना खानची जीन्सबीन्स स्टाइल पाहिलीय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 07:00 AM2019-09-12T07:00:00+5:302019-09-12T07:00:02+5:30
फॅशन आणि जीन्स? सण-समारंभ आणि जीन्स? या दोन्ही प्रश्नांचं उत्तर या मौसमात ‘हो’ असंच आहे.
- प्राची साठय़े
अजून पावसाची झड संपत नसली तरी आता सुरू झालाय तो फेस्टिव्ह हंगाम. सगळा उत्साही मामला. सेलिब्रेशन. आता गणपती झाले, मग नवरात्र येईल. या सार्यात आपण छान स्टायलिश दिसावं असं कुणालाही वाटेलच.
यंदा या स्टायलिश वातावरण निर्मितीसाठी जरा हिना खानची टय़ुशन लावून पाहू..
हिना खान म्हणजे एकदम स्टायलिश अभिनेत्री. सध्या तिच्या डेनीम ड्रेसेसच्या फोटोंची इन्स्टाग्रामवर प्रचंड चर्चा आहे.
आपणही ती आयडिया ढापूच शकतो. कारण आपण जातो कॉलेजात किंवा ऑफिसला. आपण तसेही नियमित जीन्स वापरतोच. ती आपली हक्काची साथी, तिच्यावर काहीही घातलं तरी अपेक्षित लूक येतो. कुर्ता घातला की ट्रॅडिशनल आणि टॅँक टॉप घातला की पार्टीवेअर असं आपण सहज काहीही खपवू शकतो.
तर त्याच जोडीला आपल्याला ग्लॅमरस लूक हवा असेल तर हिनाचे फोटो पाहा.
त्यातून आयडिया मिळेल, कारण तसंही डेनीम किंवा जीन्स कधीच आउटडेटेड होत नाही. आणि आता येत्या उत्सवी काळात आपल्यालाही स्टायलिश दिसण्याची संधी मिळेल.
तेव्हा या डेनीम आयडिया ट्राय करून पाहा.
फ्लेअर्ड जीन्स.
तसंही सध्या पलाझो आणि फ्लेअर्ड पॅण्टची फॅशन आहेच. मात्र फ्लेअर्ड जीन्स हा प्रकार मात्र आता नव्यानं रुजतो आहे.
त्यामुळे यंदा जीन्सची खरेदी करणार असाल तर फ्लेअर्ड जिन्स ट्राय करून पाहा.
त्यावर लॉँग कुर्ता किंवा अगदी टॅँक टॉपही घालता येईल.
हिनाच्या अशाच ड्रेसमधल्या फोटोने इन्स्टावर मोठा कल्ला केला म्हणतात.
डेनीम मिडी.
गुडघ्यार्पयतच्या मीडीची फॅशन आता परतून आली आहे. त्यामुळे गुडघ्यार्पयतचे ड्रेस घालत असाल तर ही मीडी हा एक उत्तम पर्याय आहे.
निळी मॅक्सी
जीन्सची मॅक्सी हा पर्याय आहे नवा. मात्र सध्या लॉँग कुत्र्याची फॅशन असल्यानं ही फ्लोअर लेंथ जीन्सची मॅक्सी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. फॅशनेबलही आणि स्मार्टही.
जीन्स स्कर्ट
स्कर्ट वापरत असालच तर पायघोळ स्कर्ट ते गुडघ्यार्पयतचा स्कर्ट असे एकसे एक पर्याय सध्या जीन्स स्कर्टमध्ये उपलब्ध आहेत.
जॅकेट
हा ट्रेण्ड तर कधीच आउटडेटेड होत नाही. जब वी मेटमधल्या करिनाचं जिन्सचं जॅकेट आठवा. तसेच एकसे एक जॅकेट घालून नेहमीच्याच कपडय़ांना नवा लूक देता येऊच शकतो.