हॅलो कबिरा स्पिकिंग. देवीप्रसाद है?
By admin | Published: April 1, 2017 05:58 PM2017-04-01T17:58:37+5:302017-04-01T18:15:24+5:30
कुणाची फजिती करण्याचा एखादा हक्काचा दिवस असेल, तर तो कोण कशाला सोडेल म्हणा.
एप्रिल फुल करणं आलं कुठून नेमकं आपल्याकडे?
आज १ एप्रिल. सगळ्यांना एप्रिल फुल करण्याचा दिवस.
या दिवसाचं एवढं कोडकौतुक का?
अर्थात कुणाची फजिती करण्याचा एखादा हक्काचा दिवस असेल, तर तो कोण कशाला सोडेल म्हणा. या दिवशी एखादा वेडा बनतो तरी, नाहीतर बनवतो तरी. मुळात बनवाबनवी करून वेड्यात काढणं हे महत्त्वाचं. खाली बघ केळ्याची साल आहे, डोक्यावर बघ काय पडलंय! आपण जीला फक्त स्वप्नातच डेट करू शकतो अशा मुलीला प्रपोज करणं ते एखाद्याच्या जिवंत नातेवाईकाला यमसदनी धाडण्यापर्यंत लोकांची मजल जाते. या दिवशी लोकांना असेही फोन येऊ शकतात, ‘हॅलो, कबीरा स्पीकिंग. देवीप्रसाद है’ आपकी पोती हमारे कब्जेमे है.’
आता या दिवसाच्या मागे कोणता इतिहास आहे का?कोणाच्या डोक्यात सफरचंद पडलं आणि याचा शोध लागला. तर हो,हा दिवस साजरा होण्यामागे खूप आख्यायिका आहेत,पण नेहमीप्रमाणे गुगल सर्च केल्यावर जे पहिलं दिसत तेच आपण खरं मानतो. सुरु वात अशी झाली की, १५८२ मध्ये फ्रान्स या देशाने त्यांच्या जुन्या ज्युलियन कॅलेंडर मधून नव्या ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये स्थलांतर केलं, त्यामुळे नवीन वर्षाची सुरु वात १ एप्र्रिलपासून न होता १ जानेवारीला झाली. ही बातमी सर्व युरोपिअन देशांमध्ये पसरण्यास वेळ लागली म्हणून काही लोकं १ एप्रिललाच नवीनवर्ष साजरा करत होते, पण त्या काळातही कदाचित काही असे लोक होते ज्यांना सर्व जगाच्या खबरा असत. ते या भोळ्या लोकांवर हसत आणि त्यांच्या पाठीमागे पेपर फिश लावत त्याला एप्रिल फिश असंही म्हणतात. ही प्रथा अशी चालू होऊन एप्रिल फुल पर्यंत पोचली.
बाकी हे खरं की खोटं तुम्ही ठरवा, तसंही आजही एप्रिल फुल आहेच..
विशाखा विश्वनाथ पाडावे