तिचं ड्रिंक्सचं व्यसन
By Admin | Published: June 25, 2015 02:56 PM2015-06-25T14:56:10+5:302015-06-25T14:56:10+5:30
वारंवार होणा-या पाटर्य़ा, कमालीची आर्थिक असुरक्षितता, स्पर्धा, नवीन संधी न मिळणं, प्रेमभंग आणि नव:याचे किंवा स्वत:चे विवाहबाह्य संबंध या कारणांमुळे ‘पिणा:या’तरुणींचे प्रमाणही आता वाढले आहे. पण आपण व्यसनी आहोत, हे मात्र त्या मान्यच करत नाहीत!
>मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात आता ‘निशिगंध’ नावाचं खास महिलांसाठीचं केंद्र सुरू करण्यात आलं आहे, इतकं ‘व्यसनी’ मुलींचं प्रमाण वाढलं आहे!
गेले काही दिवस वर्तमानपत्रत महिलांच्या ड्रिंक अॅण्ड ड्राइव्हच्या बातम्या वाचल्या.
महिलांना आणि दारूचं व्यसन?
अनेकांना हा विषयच ङोपत नाही. मुक्तांगणमधे एक वॉर्ड आहे, त्याचं नाव निशिगंध. महिलांसाठी व्यसनमुक्ती केंद्र असलेला हा स्वतंत्र वॉर्ड. या वॉर्डात जाऊन महिलांच्या व्यसनाधीनतेच्या प्रमाणाबद्दल, त्यांच्या दारूच्या व्यसनाबद्दल आणि त्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांबद्दल बोलायचं म्हणून त्या केंद्राच्या समन्वयक प्रफुल्ला मोहिते (त्यांना मुक्तांगणमधे आत्या म्हणतात) यांची भेट घेतली. त्या निशिगंध आणि सहचरी असे दोन प्रकल्प सांभाळतात. मुक्तांगणमधल्या पुरुष रुग्णमित्रंचेही समुपदेशन करतात. निशिगंधचा विषय मात्र त्यांच्या जिव्हाळ्याचा. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘मुक्तांगणमधील शंभर रुग्ण-मित्र सांभाळणं एक वेळ सोपं; पण निशिगंधमधील पंधरा-सोळा रुग्ण सांभाळणं मुश्कील असतं!’
हाच धागा पकडून त्यांना विचारलं की, मुक्तांगणमधे महिलांसाठी स्वतंत्र केंद्र तयार करण्याची वेळ का आली? महिलांमधलंही व्यसनांचं प्रमाण इतकं वाढलंय का?
त्या म्हणाल्या, ‘‘आठ- दहा वर्षापूर्वी क्वचित कधीतरी व्यसनी महिला येत असत. तेव्हा आमच्याकडे महिलांसाठी निवासी उपचारांची सोय नव्हती. आणि उपचारांबाबत चौकशी करणारे फोनही कमी असत. पुण्यात काही केंद्रात महिलांना निवासी उपचारांची सोय होती. अशा ठिकाणी आम्ही त्यांना पाठवत असू. परंतु एकदा एक व्यक्तीनं त्या केंद्रात स्त्री-पुरु ष एकत्र एकाच ठिकाणी उपचार घेत असलेले पाहून आपल्या पत्नीस त्या केंद्रात दाखल करण्यास नकार दिला. या घटनेतून प्रेरणा घेऊन खरंतर निशिगंधची स्थापना झाली.’’
मुक्तांगणमधे ‘निशिगंध’ हा फक्त व्यसनी मैत्रिणींसाठी फक्त महिलांकडून चालवला जाणारा विभाग आहे. या विभागात आत्या अत्यंत मनापासून काम करतात. व्यसनं आणि महिलांची व्यसनाधीनता हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय असल्याने त्यांनी भरभरून माहिती दिली. त्यांनी सांगितलेले अनुभव सुन्न करून टाकणारे आहेत.
‘थोरामोठय़ांच्या चांगल्या घरच्या मुली सहज दारू प्यायला लागतात आणि नंतर त्या व्यसनानं अक्षरश: गटारात पडून नको त्या गोष्टींना बळी पडतात. अतिशय हुशार, कलांमध्ये प्रवीण अशा काही मुली देहविक्र ीच्या पातळीवर जाऊन पोहचलेल्या आम्ही पाहिलेल्या आहेत. निशिगंधमध्ये दाखल होणा:या रुग्णमैत्रिणी अगदी 14-15 वर्षापासून साठ वर्षे वयार्पयतच्या असतात.
तरुण मुली ड्रग्स आणि दारूच्या व्यसनात गुंतलेल्या आढळतात, तर चाळिशीतील महिला प्रामुख्यानं दारू आणि प्रिस्क्रिप्शन ड्रगचा अतिरेकी वापर करणा:या असतात. तंबाखूच्या व्यसनात अडकलेल्या महिला तर असतातच.’’ - आत्या सांगतात.
त्या केंद्रात अधिक माहिती घेतल्यावर कळलं की, तरु ण मुलींच्या व्यसनाची मुळं ही त्यांच्या जीवनशैलीत आणि नव्यानं मिळालेलं स्वातंत्र्य हाताळताना होणा:या चुकांमधे आहे. हुक्का पार्लर, नाईट क्ल्ब, डिस्को थेक, रेव्ह पाटर्य़ा अशी संस्कृती आता रुजू पाहत आहे. त्यामुळे अनेक मुलींच्या व्यसनाची सुरु वात आपल्या ग्रुपपासूनच होते. बहुतेक सर्व उत्तेजक ड्रग्जचं व्यसन एक- दोनदा केल्यानंही लागू शकतं. पुढे पुढे हे व्यसन इतकं वाढतं की, वेळच्या वेळी दारू किंवा ड्रग्ज न मिळाल्यानं या मुली हैराण होतात. घरच्यांनी पैसे देणं बंद केलं तर काहीजणी थेट देहविक्र ी करण्याइतपत अधीर होतात, त्यातून पैसे कमावतात आणि व्यसन करतात. काहीजणी चो:याही करतात. ड्रग पेडलिंगर्पयत जाऊन पोहचतात. ते पुरु षांच्या तुलनेत मुलींसाठी कमी धोक्याचं असतं. अशा एकात एक गुंतलेल्या कारणांमुळे मुलींचं व्यसन मग वाढत जातं.
अनेकदा मित्रंच्या किंवा बॉयफ्रेंडच्या (आता तर नव:याच्याही) आग्रहाखातर किंवा आपण मागासलेल्या नाहीत, आधुनिक आहोत हे सिद्ध करण्यासाठी अनेक तरुणींच्या व्यसनाची सुरु वात होते. आधी सिगरेट, मग बिअर, मग कित्येकदा फक्त सोशली म्हणत वाइन आणि मग रीतसर व्यसन असा हा प्रवास सुरू होतो. यात धक्कादायक गोष्ट अशी की, काही वेळा पुरुष फक्त सोशल ड्रिंकर राहतो आणि महिला मात्र व्यसनी होतात.
घरात एकटय़ा राहणा:या महिलाही कंटाळा घालवण्यासाठी अनेकदा दारूच्या आहारी जाताना दिसतात. त्यात पाटर्य़ामधून दारू पिण्याची सुरु वात होते आणि त्यातून मग व्यसनच सुरू होतं. अति दारू पिणं कधी सुरू होतं, हे त्यांना कळतही नाही.
वारंवार होणा:या पाटर्य़ा, कमालीची आर्थिक असुरक्षितता या गोष्टीही आता तरुणींच्या व्यसनाला कारणीभूत ठरत आहेत. त्यातच नवीन काम न मिळाल्यामुळे किंवा विवाहबाह्य संबंध, प्रेमभंग हीदेखील दारूच्या वाढत्या व्यसनाची कारणं आहेत.
पूर्वी सिनेमात फक्त खलनायिकाच दारू पिताना, सिगरेट ओढताना दिसत; परंतु आता नायिकाही ‘मॉडर्न, स्वतंत्र आणि स्मार्ट’ आहोत हे दाखवण्यासाठी दारू पिताना दिसतात.
बाकीचे दारुडे, मी नाही!
सर्वच व्यसनी व्यक्ती त्यांच्या नशेबाबतची वस्तुस्थिती नाकारतात. याला ‘डिनायल’ म्हणतात. परंतु पुरु षांपेक्षा महिलांमध्ये डिनायलचे प्रमाण जास्त असते. मी इतकी नशा करत नाही, मला उपचारांची गरज नाही, अमुकतमुक कारणांमुळे काही दिवस जास्त घेतली, माझी परिस्थितीच अशी आहे की नशेला पर्याय नाही, मी दारू पीत असले तरी मी काही दारुडी नाही अशी विविध कारणं सांगत तरुणी वस्तुस्थिती नाकारत असतात.
यात अजून एक महत्त्वाचा भाग असतो. व्यसन म्हणजे इतके तितके पेग पिणो अशी एक समजूत असते. त्यातही पुरुषांची दारू पचवण्याची क्षमता महिलांपेक्षा जास्त असते. ही वस्तुस्थिती माहिती नसल्यामुळे अनेकजणी कौतुकानं सांगतात मी फक्त तीनच पेग घेते, चोवीस तास पीत नाही. पण आपण दारूच्या गर्तेत रुतत चाललो आहोत हे मात्र मान्यच करत नाहीत.
रडणं हाच बचाव!
आपण चुकतोय, व्यसनी होतोय हे माहिती असूनही स्वत:ला वाचवण्यासाठी अनेक कारणं सांगत बचावाची एक फळीच उभी केली जाते. बचावाच्या या सर्व फळ्या मोडणं हा उपचारांमधला सर्वात महत्त्वाचा आणि कठीण भाग ठरतो. त्यात महिलांकडे रडणं हे एक नित्य वापराचं अस्त्र असतं. ‘निशिगंध’मधल्या आत्या सांगत होत्या, ‘‘निशिगंधमध्ये उपचार घेणा:यांपैकी एक रडायला लागली की संसर्ग झाल्यासारख्या बाकीच्या सगळ्या रडू लागतात. पण तरीही उपचारांचा भाग म्हणून सगळ्यांना सारखी कामं करावी लागतात. निवासी उपचारात कोणतीही सौंदर्यसाधने, केशभूषा यांना थारा नसतो. सर्व कामं करावी लागतात. बडय़ा घरच्या लेकींना इथं लसूण सोलणं म्हणजे महाभयंकर काम वाटतं. एकीकडे त्या स्वतंत्र असतात पण व्यसनात अडकल्यानं आत्मविश्वासही गमावून बसतात. आमचा अनुभव सांगतो की, महिलांना व्यसनमुक्त करणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे.’’
व्यसन म्हटलं की पुरुषीच चेहरा समोर येत असताना, मुक्तांगणमधल्या या केंद्राला भेट दिल्यावर कळतं की शिकलेल्या, स्वतंत्र, सुस्थित कमावत्या महिलाही आता दारूच्या व्यसनात अडकत आहेत, तरी हे महत्त्वाचं की त्यातल्या काही व्यसनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतात. पण ज्यांना आपण ‘व्यसनी’ आहोत किंवा बनतो आहोत असं वाटत नाही, त्यांचं काय?
- मनोज कौशिक
सहकार्य- मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणो