हिरो बने आयटम बॉइज

By admin | Published: June 11, 2015 02:56 PM2015-06-11T14:56:19+5:302015-06-11T14:56:19+5:30

फीमेल गेझ’ नावाच्या एका नव्याच नजरेनं सिनेमात दाखवल्या जाणा:या पुरुषांचं रंगरूपच पालटून टाकलं!

Hero Made Items Boyz | हिरो बने आयटम बॉइज

हिरो बने आयटम बॉइज

Next
सिनेमाच्या पडद्यावर एकाएकी हिरो अंगप्रदर्शन करू लागले ! तरुण मुलींच्या स्वप्नातला हवाहवासा ‘हिरो’ म्हणून नायकाची इमेज तयार होऊ लागली, त्याच्या देहाचं उघड प्रदर्शन  हा चर्चेचा विषय होऊ लागला कारण? स्त्रियांच्या हाती आलेली  आर्थिक क्षमता. म्हणजेच पैसे खर्च करण्याची ताकद,मॉलमध्ये जाऊन आपल्याला आवडेल ते खरेदी करण्याची क्षमता असलेल्या स्त्रिया 
आपल्याला ‘आवडेल तेच’ पाहतील आणि त्यासाठी पैसे मोजतील हे मनोरंजन क्षेत्रनं हेरलं
आणि ‘खास महिला प्रेक्षकांसाठी’  कॅमे-यानं आपलं वळण बदललं !
 
फीमेल गेझ’ नावाच्या एका नव्याच नजरेनं सिनेमात दाखवल्या जाणा:या पुरुषांचं रंगरूपच पालटून टाकलं!
 
 
 
कट्टय़ावर नेहमीप्रमाणो चर्चा सुरू होती. फिटनेसवरून तेच ते दळणं दळून झाल्यावर विषय निघाला, सगळ्यात बेस्ट बॉडी कुणाची? मुलांनी एकदिलाने (त्यांच्या मते) बेस्ट बॉडी असणा:या सल्लूभायचं नाव घ्यायच्या आधीच एक अघटित घडलं चक्क ग्रुपमधली एक मुलगी म्हणाली, ‘‘ए ! सलमान खानची कसली आलीये बेस्ट बॉडी, किती जाडा भरडा दिसतो तो! आणि मग ग्रुपच्या सगळ्याच मुली ‘बेस्ट बॉडी, हॉट बॉडी, लीन  बॉडी’, ‘सेक्सी बॉडी’ अशा सगळ्या बॉडय़ाचं पोस्टमॉर्टम करत राहिल्या. ग्रुपमधल्या मुलांची तर बोलतीच बंद हे सांगणो न लागे.
वरच्या उदाहरणातून एक गोष्ट ठळकपणो समोर आली की, आजकालच्या मुलींनी त्यांच्या आवडत्या हिरोंची शरीरे ‘पाहिली’ होती, नुसती पाहिलीच नाही तर त्याचं निरीक्षणं करून त्यांना सेक्शुअल व्हॅल्यूजदेखील चिकटवून टाकल्या होत्या. पण हे घडलं कसं? ह्या आधी हिरोंची बेअर म्हणजेच नग्न किंवा अर्धनग्न बॉडी स्त्रीवर्गानं बघितली नव्हती असं नाही, मग आताच काय झालं?
झालं असं की, कट्टय़ावर असणा:या पोरींनी समोरून जाणा:या गुडलुकिंग पोरांना ‘ढापायला’  सुरुवात केली. तेव्हाच जाहिरात आणि सिनेमा जगातल्या रथी महारथींच्या लक्षात आलं की, एका नवीन त:हेच्या कण्टेण्टसाठी एक नवीन प्रकारचा प्रेक्षकवर्ग तयार होतोय. फक्त पुरुष प्रेक्षकांना काय ‘बघायला’ आवडतं ह्याची त्यांची गणित चुकायला लागली आणि कॅमेरा पुरुष पात्रंकडे नवीन ‘नजरेनं’ पाहायला लागला.
 समस्त स्त्रीप्रेक्षक वर्गाला आजकालच्या चित्रपटांनी नायकांची शरीरं सेक्शुअल व्हॅल्युजसकट दाखवायला सुरुवात केली.
आणि त्यातून उगम झाला एक नव्या ट्रेण्डचा. नव्या नजरेचा.
त्याचंच नाव ‘फीमेल गेझ’.
प्रेक्षक अभ्यासातली एक महत्त्वाची संकल्पना आहे ‘मेल गेझ’. म्हणजे ढोबळ मानानं सांगायचं तर पुरुषी नजर. चित्रपट अभ्यासक लॉरा मुलव्हेनी 1975 मध्ये मेल गेझची ही संकल्पना मांडली. पुरुष प्रेक्षकांना काय पाहायला आवडेल हे लक्षात घेऊन स्त्रीचं केलेलं चित्रण म्हणजे ही मेल गेझ. इथे स्वत: त्या कॅमे:याचीच नजर पुरुषी आहे. स्त्री शरीराला वस्तू (ऑबजेक्ट) म्हणून दाखवत, तिचा देह पुरुषांच्या नजरेतून टिपत स्त्रीदेहाचं चित्रण केलं गेलं. अनेक चित्रपट आणि जाहिरातींनी या थिअरीला पुष्टीच दिली.
स्त्रीवादाच्या दुस:या लाटेनंतर मात्र  ‘फिमेल गेझ’ ह्या संकल्पनेचा उदय झाला. पुरुषांच्या ‘नजरेसारखी’च ही ‘बायकी नजर’. पाश्चात्य जगातील विशेषत: हॉलिवूडमध्ये छायाचित्रकार, दिग्दर्शक वा तत्सम महत्त्वाच्या पदांवर काम करणा:या स्त्रियांनी चित्रपटातून दर्शविल्या जाणा:या सेक्शुअॅलिटीची पुनव्र्याख्या करायची ठरवली. अर्थात हे सारे प्रयोग प्रायोगितेच्या पातळीवरच झाले आणि इतपतच मर्यादित राहिले.
जशी जशी स्त्रियांची प्रगती झाली, जशा जशा त्या आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र झाल्या. आपण कमवलेला किंवा आपल्या हातात खुळखुळणारा पैसा कुठे खर्च करायचा याचे निर्णय बाई स्वत:च घेऊ लागली. तिला काय आवडतं, हे महत्त्वाचं ठरू लागलं हे बाजारपेठेच्या लक्षात आलंच आणि त्यातून मार्केटला एक नवीन ग्राहक सापडला. 
-स्त्री ग्राहक! 
ह्या ग्राहकाची अफाट क्रयशक्ती जाणवल्यानंतर दृश्यमाध्यमांनी स्त्रियांना जे आवडेल ते दाखवायला सुरुवात केली. पुरुषी शरीराचं स्त्रीला आवडेल असं चित्रण सुरूझालं आणि दृश्यमाध्यमाने भल्याभल्या हिरोंचे कपडे उतरवले.
हॉलिवूडमध्ये तर सर्रास हे सुरू झालं. पुरुष देह बायकांना ‘पहावासा’ वाटेल किंवा बायकांच्या फॅण्टसीतला पुरुष सहज पडद्यावर दिसेल अशा रितीनं पुरुषांचं चित्रण सुरू झालं. 
हे सारं तिकडंच भारतात अजूनही असली काही ‘थेरं’ आली नाहीयेत, अशा गैरसमजात कोणी राहू नये.
 गेल्या काही वर्षात सिक्स पॅक्स, एट पॅक्सच्या नावाखाली किती हिरोंनी आपले कपडे उतरवले किंवा दिग्दर्शकाने त्यांना उतरवायला भाग पाडले ह्याची एक यादी मनातल्या मनात सहज तपासून पहा. समस्त खान मंडळीपासून ते आताच्या वरुण धवन, टायगर श्रॉफर्पयत सगळ्यांनी बेअर बॉडीचं दर्शन घडवलं आहे. 
आजकाल हिरोदेखील सेक्सी ‘दिसावा’ लागतो. पूर्वीचे नट त्यामानाने सुखी म्हणायचे, त्यांच्या शरीराचं दर्शन कधी घडलंच तर ते फक्त त्यांच्या पुरुषी ताकदीचं प्रदर्शन असायचं.  आजकाल मात्र मुलींना त्यांच्या हिरोच्या बेअर बॉडीवर एक केसही चालत नाही. हिरो म्हटला की, त्याची छाती व्हॅक्स, टॅन, लीन (कधी कधी सिल्कीही) हवी असते. अनिल कपूरच जुन्या पिक्चरमध्ये त्यांच्या अंगावर असणारे केस पाहून झुरळ पाहिल्यागत किंचाळणा:या आणि त्यासा:या किळस वाटणा:या आज कित्येकजणी आहेत.
आणि हे सारं सिनेमाच्या जगाला माहिती आहे. आपल्या सिनेमाचा महिलावर्ग वाढावा म्हणून ते महिलांना आवडेल ते द्यायला आणि त्यासाठी पुरुष देहाचं वस्तुकरण करायला तयार आहे. 
मुलींच्या हातात पैसा आला आणि आपल्याला हवीहवीशी वाटणारी ‘वस्तू’ पैसा टाकून विकत घेण्याची पूर्वीची पुरुषी वृत्तीही आपसूक आली. परिणामी डिझायरेबल, सेन्शेनल, सेक्सी ही विशेषणो युनिसेक्स झाली. म्हणजेच पूर्वी जे सारं तरुणींना म्हटलं जायचं ते आज तरुणांना म्हटलं जातं. आज रामलीलामधल्या रणवीर सिंगला फक्त ‘पाहण्यासाठी’ चार-चार वेळा पिक्चर पहाणा:या मुलींची संख्या मोठी आहे. उघडपणो चर्चा होत नसली तरी हिरोंच्या दिवसागणिक खाली घसरणा:या पॅण्ट्स एका मोठय़ा सामाजिक आणि सांस्कृतिक बदलाची साक्ष देत आहेत.
पुरुषी नजरांची मक्तेदारी संपवून ‘बायकी’ नजरांचं राज्य आता सुरू होतं आहे.
हे कितपत योग्य किंवा अयोग्य हे ज्याचं त्यानं (खर म्हणजे जिचं तिनं ठरवावं.)
एक नक्की ज्या जगात पुरुषी नजरांसाठी सनी लिऑनची अर्निबध सत्ता आकार घेतेय त्याच जगात आता येत्या मोहोंजदडो नावाच्या सिनेमात उघडय़ावाघडय़ा पिळदार शरीराच्या हृतिकला ‘पहायला’ जावं असं मुलींना वाटणार हे उघड आहे. हृतिकने त्या सिनेमात न्यूड सीन दिलाय म्हणो!  
आता हा न्यूड सीन कुणासाठी दिलाय?
त्याचं उत्तर हेच.फीमेल गेझ!!
बायकी नजरांची चंगळ!!
 
- अनघा पाठक
 
बॉलिवूडवाले हॉट-सेक्सी-पॅक्सवाले
उघडेवाघडे नायक आले कुठून?
* हिंदी सिनेमात ‘फीमेल गेझ’चं अस्तित्व ठळकपणो समोर आलं ते 2क्क्8 च्या ‘दोस्ताना’ चित्रपटातून. आठवतेय जॉन अब्राहमची एण्ट्री आणि शक्य तेवढे कमी कपडे (चतकोर चड्डी!) अंगावर ठेवून त्यांच्या शरीराचं घडवलेलं मुबलक दर्शन? कहर म्हणजे आंघोळ करणा:या जॉन अब्राहमच्या नाभीवरून ओघाळणा:या पाण्याच्या शॉटने तर हॉटनेसच्या बाबतीत त्याच गाण्यात असणा:या शिल्पा शेट्टीलाही मान खाली घालायला लावली होती. 
* त्यानंतर आला टॉवेलवाला रणवीर आणि मग एका मागोमाग एक अशा हिरोंची आणि त्यांच्या अंगप्रदर्शनाची लाइनच लागली.
*2012 मध्ये ‘विकी डोनर’ या सिनेमाचा निर्माता असलेल्या जॉन अब्राहमने याच सिनेमात एक आयटम सॉँग केलं होतं. ते शर्टलेस तर होतं, पण त्याच्या देहाचं प्रदर्शनही होतं. त्यात दोन स्त्रिया त्याच्याभोवती घुटमळत, त्याच्या कपडय़ांशी खेळतानाचंही चित्रण होतं. हे सारंच महिला प्रेक्षकांच्या नजरेला सुखावण्यासाठी होतं, अर्थातच!
* फराह खान ने शाहरूख खानलाही असंच पेश केलं आधी सिक्स पॅकमध्ये आणि आता इंडियावाले म्हणत 8 पॅक्समध्ये!
* शर्ट काढून सलमान खान तर गेली अनेक वर्षे नाचतोय. त्याचं शर्टलेस होणं आणि लोभस, प्रेमळ होणं, मारामारी करतानाही विशेष नजरेनं नायिकेकडे पाहणं, हे सारं याच नव्या ट्रेण्डचा भाग.
 
हॉलिवूडवाल्या पुरुषांचे घसरते कपडे
हिरोचे कपडेही न उतरवतादेखील संपूर्ण चित्रपटावर त्याला एक हवीहवीशी वस्तू अर्थात ‘ऑबजेक्ट’ म्हणून दाखविण्याची किमया साधली हॉलिवूडच्या ‘द ट्विटलाइट सागा’ या फिल्म सिरीजने. संपूर्ण चित्रपटभर नायिका (ख्रिस्टीन स्टुअर्ट) नायकाकडे (रॉबर्ट पॅरीयन) लहान पोराने दुस:याच्या हातातल्या आइसफूट्रकडे पाहावं, तशी जास्त असते. कधी ते आइसफूट्र मिळेल अन् कधी ते मी खाईन, असाचं भाव आहे तिच्या चेह:यावर! नायकाच्या चेह:यावरून, अंगावरून फिरणारा कॅमेराही आपल्याला स्टुअर्टला काय हवयं हेच सांगत असतो. सेक्सी हिरोईनसोबत स्वत:ला कल्पिणारे किंवा तिच्याकडे बघण्याची मजा लुटणारे पुरुषप्रेक्षक जितके निरुपयोगी आणि मठ्ठ असतात, तितकीच मठ्ठ स्टुअर्ट वाटते; मात्र साधारणत: हॉलिवूडमध्ये 1975 पासून सुरू झालेला हा ट्रेण्ड 2015 र्पयत येता येता बायकांसाठी पुरुषी देहाचं मुक्त सादरीकरण या टप्प्यार्पयत येऊन पोहोचला आहे!
 
जाहिरातीत विकणारं शरीर
पाश्चात्य देशांमध्ये ब:याच जाहिरातींमधून फीमेल गेझच वर्चस्व जाणवतं. जीन्स किंवा डेनिमच्या जाहिराती ह्यामध्ये आघाडीवर आहेत. त्याखालोखाल नंबर लागतो डिओड्रण्टच्या जाहिरातींचा. अर्थात त्यांच्याकडच्या जाहिरातीत आपल्याकडे दाखवतात तसं आकाशातून पोरी बदाबदा पडत नाहीत. पुरुषी शरीराच आकर्षक असं चित्नण करून आपली उत्पादने स्त्रियांना विकणं एवढाच त्यामागचा उद्देश असतो.  
भारतातील चित्नपटांमध्ये जितका ‘फीमेल गेझचा’ प्रभाव दिसतो तितका भारतातील जाहिरातींमध्ये दिसत नाही. 

Web Title: Hero Made Items Boyz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.