विचारांचं समग्र दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 03:00 AM2017-09-28T03:00:00+5:302017-09-28T03:00:00+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं समग्र लेखन कोलंबिया विद्यापीठाच्या ऑनलाइन ग्रंथालयात वाचता येतं. तेही एका क्लिकवर
प्रज्ञा शिदोरे
जगात अशा खूप कमी व्यक्ती असतात ज्या एखाद्या समाजात, राष्ट्रात दूरगामी, मूलभूत आणि विधायक बदल घडवत असतात. अशा व्यक्तींकडून प्रेरणा घेऊनच एखाद्या भूभागाचं राष्ट्र होतं. त्या राष्ट्राला एक सामाजिक भान येतं. भारतामधील अशा काही सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींमधलं एक नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
डॉ. आंबेडकरांनी अफाट लेखनही केलं आहे. हे सारं एकत्रित करून ठेवलं आहे ते कोलंबिया महाविद्यालयाच्या आॅनलाइन ग्रंथालयामध्ये. अमेरिकेतील कोलंबिया महाविद्यालयात डॉ. आंबेडकरांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. हे महाविद्यालय मोठ्या गर्वाने ‘भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार आम्ही घडवले’ असं आजही सांगतं. बाबासाहेबांनी लिहिलेलं सर्व साहित्य त्यांनी जतन करून ठेवलं आहे. त्यांच्या लेखनाबरोबरच त्यांचा सर्व जीवनप्रवासही आपण इथे वाचू शकतो. आंबेडकरांचं असं समग्र साहित्य वाचायला मिळणं ही एक उत्तम संधी आहे.
ती चुकवू नयेच.
पहा-
कोलंबिया विद्यापीठाने जपून ठेवलेलं डॉ. आंबेडकरांचं साहित्य या लिंकवर वाचता येईल
http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/