होस्टेलची मेस
By admin | Published: March 2, 2017 03:44 PM2017-03-02T15:44:30+5:302017-03-02T15:48:24+5:30
होस्टेलच्या वरणात डाळ शोधा आणि अमुक-तमुक जिंका.. किंवा आज तुमच्याकडे बटाट्याची भाजी का, अरे वा आमच्याकडेपण बटाट्याचीच भाजी.. किंवा भोपळा, उसळी, वरणात पाणी, होस्टेलच्या जेवणाची रोजचीच कहाणी - हे असं सारं तुम्हीही भोगत असाल, भोगलं असेल..
होस्टेलच्या वरणात डाळ शोधा आणि अमुक-तमुक जिंका.. किंवा आज तुमच्याकडे बटाट्याची भाजी का, अरे वा आमच्याकडेपण बटाट्याचीच भाजी.. किंवा भोपळा, उसळी, वरणात पाणी, होस्टेलच्या जेवणाची रोजचीच कहाणी - हे असं सारं तुम्हीही भोगत असाल, भोगलं असेल..
होस्टेलची मेस हा एक फार इंटरेस्टिंग विषय!!
त्यातून शिजलेल्या भाजीत मेलेल्या पाली
नाहीतर झुरळं सापडली, की
त्याच्या बातम्या होतात आणि चर्चा तापते!
- पण पुन्हा मुलांच्या नशिबी तीच मेस!!
सांगणार कोणाला?
तक्रारी केल्या तर मेसचं जेवण
बंद होण्याची भीती असतेच ना!
- काय आहे तुमचा अनुभव?
कसं असतं मेसचं जेवण?
तुम्ही समाधानी असता त्या जेवणावर?
तक्रार केली तर मेसचे ठेकेदार, वॉर्डन
ऐकून घेतात, प्रश्न सोडवतात?
की त्याउलट जास्त त्रासाला सामोरं जावं लागतं?
लातूरसारख्या शहरात जर काही मुलं
भोजनभत्त्याची मागणी करून
बाहेर मेसमध्ये जेवतात,
स्वत: महिनाभर ते पैसे पुरवण्याची जबाबदारी घेतात
तर मग ते अन्यत्र शक्य होऊ शकेल का?
- पण मग ते पुण्यातल्या मुलांना का साधलं नाही?
भोजनभत्ता म्हणून महिन्याकाठी शासन जे पैसे
ठेकेदारांना देतं, ते थेट मुलांनाच मिळाले तर?
तुम्ही घ्याल ती जबाबदारी?
अशी व्यवस्था समजा लावायची ठरवली तर
तुम्हाला काय काय अडचणी येऊ शकतात?
- त्याबद्दल तुमच्याकडूनच समजून घ्यावं,
आणि ते सरकारपर्यंत पोचवावं,
असं आम्ही ठरवतो आहोत.
तेव्हा लिहा. तपशिलात लिहा
आणि मुख्य म्हणजे प्रश्न सोडवण्याचे मार्ग सांगा/सुचवा.
पोस्टाने पाठवणार असाल, तर
पत्ता : संयोजक, ' ऑक्सिजन', लोकमत भवन, बी-३, एम.आय.डी.सी, अंब, नाशिक - 422010 .....................
ई-मेल करणार असाल, तर-
oxygen@lokmat.com
.............................
आॅक्सिजनच्या फेसबुक पेजवर
lokmatoxygen
इथं थेट पोस्ट करता येईल. मेसेजही करता येईल.
........................................
अंतिम मुदत-१० मार्च २०१७