गरम चाय की प्याली हो..
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 02:43 PM2017-12-14T14:43:17+5:302017-12-14T14:43:41+5:30
‘लो-प्रोेफाइल’ चहा आता तरुण जगाचा ट्रेण्डी, ग्लॅमरस भाग होतोय.. चहा की कॉफी? या प्रश्नाचं ‘काहीही’ असं उत्तर देणाºयांना सोडून देऊ ! त्यांना चॉईस नसतो बहुतेक कसलाच.
- भक्ती सोमण
‘लो-प्रोेफाइल’ चहा आता तरुण जगाचा ट्रेण्डी,
ग्लॅमरस भाग होतोय..
चहा की कॉफी?
या प्रश्नाचं ‘काहीही’ असं उत्तर देणाºयांना सोडून देऊ ! त्यांना चॉईस नसतो बहुतेक कसलाच.
पण चहा की कॉफी असं विचारलं की, काहीजण शान से सांगत मी कॉफीच घेणार! कॉफी पिणं, कॉफीचा क्लास याचं भरपूर कौतुक !
चहा पिणाºयांकडे पाहताना कायम अनेकांच्या नजरेत एक टपरीवाला लूक असतो.
पण आता काळ कसा बदलला पहा !
देशात चहाला ग्लॅमर आलं, चहा पिणाºयांना आलं आणि काही चहा विकणाºयांनाही आलं !
जागतिकीकरणाची कमाल म्हणा किंवा प्रतिष्ठेच्या व्याख्येत स्वत:ला न कोंबता जे आवडतं ते बिनधास्त, बेफिकीर करायची नवीन लाइफस्टाइल म्हणा, चहा पिणं आता काही लो-क्लास राहिलेलं नाही.
ते तसं कधी नव्हतंच म्हणा; पण कॉफीचा गंध झाकोळून टाकत असे चहा पिणाºयांची मस्त बेफिक्री!
चार मित्र एकत्र येणार असतील किंवा खूूप गप्पा मारायच्या असतील तर कॉफीच प्यायला हवी असा एक शिरस्ता. कॉफी पे बनते, बिघडते रिश्ते म्हणत कॉफीच्या विविध प्रकारांना ग्लॅमर प्राप्त झालं. त्यामुळे अनेक कॉफीशॉप्स, कॅफेज उघडले गेले. मात्र, जगभरात जास्त प्यायला जाणारा चहा तसा लो प्रोफाईलच राहिला. आपल्याकडे तर चहाची ओळख टपरीपुरतीच मर्यादित.
पण जसंजसं ग्लोबलायझेशन वाढायला लागलं, लोकांच्या परदेशी फेºया व्हायला लागल्या तसं लोकांना चहाचे असंख्य प्रकार आहेत हे कळू लागलं. त्याच ओढीतून गेल्या २-३ वर्षात हळूहळू चहा शॉप्स सुरू झाले आणि चहाला ग्लॅमर प्राप्त झालं.
‘टी ट्रेल’ या चहा शॉप साखळीचे प्रोडक्ट हेड असलेले शेफ अमित तिवारी सांगतात, चहा पिण्यासाठी टपरी किंवा कॉफी शॉप्स सोडून दुसरा पर्याय मिळत नव्हता. पण उत्तम चहा शॉप सुरू झाल्यावर त्यांना पर्याय मिळाला. पर्यायाने चहाचे असंख्य प्रकारही प्यायला मिळाले. सतत नावीन्याच्या शोधात असलेल्या लोकांना चहा शॉप्सची ही थीम आणि चव अत्यंत आवडली. याचमुळे आता चहाला खºया अर्थाने ग्लॅमर मिळतं आहे.’
मित्रांबरोबर गप्पा मारण्यासाठी कॉफी शॉपमध्ये बसणारा वर्ग आता चहा शॉपकडे वळू लागला आहे. टपरीवर रंगणाºया गप्पा चहाच्या नव्या चकाचक आउटलेट्समध्ये होऊ लागल्या आहेत. आणि थंडीतला गरमागरम चाय का प्याला आता मॉडर्न, ग्लॅमरस होत नव्या जगाचा हातही धरताना दिसतो आहे.
तेव्हा यापुढे कुणी विचारलं की, चहा की कॉफी?
तर स्टाइल मारत बिनधास्त सांगा, मी चहाच पिणार !
चहा खाऊया
चहाच्या पानांचा उपयोग आता खाद्यपदार्थातही केला जात आहे. सलाडमध्ये ग्रीन टीच्या पानांचा उपयोग केला जातो. काही ठिकाणी तर चहाचा उपयोग करून केलेले सूपही मिळते. डेझर्ट, आइस्क्रीम स्मूदीज, चहाचा कोल्ड शेक असे विविध प्रकार आता काही टी लाउन्जेसमध्ये मिळतात.
आजकाल ग्रीन टी, ब्लॅक टी असे बिनदुधाचे चहा आरोग्याच्या दृष्टीने चांगले म्हणून अनेकजण पितात खरे; पण तो चहा नेमका करतात कसा हेच अनेकांना माहिती नसतं. प्रत्येक चहा उकळण्याचं विशिष्ट तपमान (टेम्परेचर) असतं. तेवढाच तो उकळवला तर तो फक्कड जमतो. नाहीतर उकळलं पाणी प्यालं, त्यात काही मज्जा नाही !