वाटलं म्हणून हिरो कसं होता येईल?

By admin | Published: June 23, 2016 05:43 PM2016-06-23T17:43:08+5:302016-06-23T17:43:08+5:30

सैराट सिनेमा आला आणि सर्व होतकरू तरुण तरुणींना सिनेमात काम करावं असं वाटू लागलं.

How can you think of heroes? | वाटलं म्हणून हिरो कसं होता येईल?

वाटलं म्हणून हिरो कसं होता येईल?

Next
>- प्रतिक प्रवीण म्हात्रे
सैराट सिनेमा आला आणि सर्व होतकरू तरुण तरुणींना सिनेमात काम करावं असं वाटू लागलं. ग्लॅमर प्राप्त करायचा एक सहज सोपा फंडा (असं त्यांचं मत). ज्यांनी कधी स्टेजवर पायही ठेवला नाही अशा लोकांनीही दिग्दर्शकाला पत्र लिहिली.
अगदी छोटासा रोल का होईना सिनेमात काम तर करायला मिळेल या वेडी आशा मनात बाळगून केलेली निरर्थक धडपड पाहून खरचं त्यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावीशी वाटली.
आपल्यातला कुणी मुलगा हिरो झालाय म्हणून कदाचित प्रत्येकाला स्वत: मध्ये हिरो दिसू लागलाय.
‘अरे हा हिरो होऊ शकतो मग आपण का नाही?’ असा विचार एकदा मनात आला की मग पुढची धडपड सुरु. पण आपण ज्या क्षेत्रात आहोत,ज्याची आपल्याला आवड आहे त्याचा विचार न करता जे आहे ते सोडून पळत्याच्या मागे लागण्यात कितपत शहाणपण आहे??
एक दोन एकांकिका, काही नाटकं केली कि यांना वाटतं कि आता आपण अ‍ॅक्टर झालो. आता आपल्याला अ‍ॅक्टिंग मधलं सगळं कळतं. कलाक्षेत्र म्हणजे ग्लॅमर एवढंच दिसतं लोकांना पण त्यामागे प्रचंड मेहेनत आहे, एक तपश्चर्या आहे. आज जे लोकिप्रय अभिनेते आणि अभिनेत्री दिसतात त्यांनी खूप धडपड केलीय. या क्षेत्रात स्थिरावण्यासाठी खूप काम केलंय. अचानक ते सुपरस्टार झालेले नाहीत.
हाती घेतलेल्या क्षेत्रात काम करण्याचा कंटाळा आला म्हणून अनेक जण चित्रपट सृष्टीमध्ये जाण्याचा विचार करतात पण ते क्षेत्र सर्वांना भाग्यदायी ठरेल असं नाही.
फक्त प्रसिद्धी, पैसा मिळतो म्हणून चित्रपटात काम करण्याचा विचार करणं कितपत योग्य आहे. अशाने आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेतो. त्यामुळे फक्त ग्लॅमर कडे न बघता आपण ज्या क्षेत्रात आहोत त्याच क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करणं कधीही चांगलं असं मला वाटतं.
 
वाचक कट्टा
 
हा कट्टा खास तुमच्यासाठी.
मनातलं सारं शेअर करण्याची एक खास जागा. तुमचाही लेख या वॉलवर झळकू शकतो. या कट्टयावर त्याची चर्चा होऊ शकते.
तेव्हा लिहा आणि तुमचे लेख आम्हाला oxygen@lokmat.com वर मेल करा.
निवडक लेखांना या वाचक कट्ट्यावर झळकण्याची संधी...
 

Web Title: How can you think of heroes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.