चांगला कंगवा कसा निवडाल?

By Admin | Published: December 5, 2014 11:37 AM2014-12-05T11:37:42+5:302014-12-05T11:37:42+5:30

डोक्यावरचे केस टिकवायचे, तर कंगव्याशी दोस्ती हवीच.

How to choose a good comb? | चांगला कंगवा कसा निवडाल?

चांगला कंगवा कसा निवडाल?

googlenewsNext

कंगवा काय, वापरायचा कुठला तरी. त्यात काय असतं विचार करण्यासारखं?

आपण रोज केस विंचरतो, त्यासाठी हातात कंगवा घ्यावाच लागतो.  एरवी शंभर गोष्टींचा विचार करतो आपण. केसाला लावायचे बोज, क्लचरसुद्धा काळजीपूर्वक विकत आणतो. पण कंगवा विकत घेताना कधी फार विचार केलाय तुम्ही? कुठला कंगवा आपल्या केसांसाठी चांगला, अमुकच वापरणं गरजेचं असं काही ठरवून, अभ्यास करून कंगवा खरेदी केलाय का तुम्ही कधी? बहुसंख्य लोक नाहीच असा काही विचार करत. कुठला तरी कंगवा घेतात, पटकन केस विंचरतात, कामाला लागतात. मात्र कंगवा ही रोजच्या जगण्यातली आणि स्टायलिंग मधली अत्यंत महत्त्वाची गोष्ट. माहितीच असलं पाहिजे, की कंगवा कुठला वापरायचा? आणि त्यातही महत्त्वाचं की कंगवा वापरायचा की ब्रश?
१)  कुरळ्या, बोंगा होणार्‍या, वेव्ही म्हणजे नाठाळ केसांना सेट करण्यासाठी गोलाकार किंवा त्रिज्यात्मक अर्थात सक्यरुलर रॅडिअल ब्रश वापरणं उत्तम. या कंगव्यांचे असंख्य प्रकार आणि साईज मिळतात. काही अर्ध वतरुळाकारही असतात.
२) ड्राय केसांसाठी किंवा कधी तुमचे केस खूप ओले असतील तर फ्लॅट किंवा हाफ राऊंड कंगवा वापरायला हवा.
३) बाजारात, रस्त्यावर मिळणारे प्लॅस्टिकचे कंगवे घेणं टाळा. असे कंगवे साच्यात बनवले जातात. ते टोकदार असतात. डोक्यावरचा नाजूक त्वचेचा थर हे कंगवे हळूहळू काढून टाकतात. त्यामुळे केस तुटतात, केसांना फाटेही फुटतात.
४) केसातला गुंता काढण्यासाठी किंवा केसांना कंगव्यानं कंडिशनर लावण्यासाठी मोठा ‘टूथ कॉंब’ म्हणजेच लांब दांडीचा ब्रशसारखा कंगवा वापरायला हवा.
५) तुमचे केस खूपच जास्त कुरळे असतील तर आफ्रो कॉँब नावाचा कंगवा वापरा. अशाच केसांसाठी हे खास कंगवे तयार केलेले असतात.
६) कंगवा तुम्ही विकत घेता तेव्हा त्याच्या प्रत्येक दाताला हात लावून पाहा. कंगव्याचे दात अतीच टोकदार वाटले, हातात रुतले तर तो कंगवा घेऊ नका. केस विंचरताना अशा कंगव्यांमुळे जास्त तुटतात.
७) हा नियम तर सर्वांनी तंतोतत पाळायलाच हवा. आपला कंगवा, ब्रश कधीही दुसर्‍याला वापरायला देऊ नये. दुसर्‍याचा चुकूनही वापरू नये. परस्परांचे कंगवे वापरल्याने केसांतले इन्फेक्शन्स होतात, वाढतात. म्हटलं तर हा नियम काय कॉमन सेन्स आहे असं एरवी वाटतं. पण बहुसंख्य लोक घरात एकमेकांचे कंगवे वापरतातच. तसं करू नये.
- धनश्री संखे ब्युटी एक्सपर्ट

Web Title: How to choose a good comb?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.