सॉफ्ट-स्मुथ ओठांसाठी लिपस्टिक कशी निवडायची?
By admin | Published: August 7, 2014 09:14 PM2014-08-07T21:14:59+5:302014-08-07T21:14:59+5:30
लिपस्टीक कशी निवडायची?’ असा तीन शब्दांचा पण अनेकींसाठी अत्यंत अवघड असलेला हा प्रश्न.
Next
>लिपस्टीक कशी निवडायची?’ असा तीन शब्दांचा पण अनेकींसाठी अत्यंत अवघड असलेला हा प्रश्न. तुम्ही मेकप करत असा-नसा, पण उत्तम लिपस्टिकची एक शेड तुमच्या चेहर्याचा नूर बदलू शकते. एक खास रौनक तुमच्या चेहर्यावर झळकू शकते. पण त्यासाठी तुमची लिपस्टिकची निवड मात्र अचूकच हवी. ती कशी करायची, हे सांगणारी ही काही सिकेट्र्स.
१) अनेक जणी आपल्या रंगाला कुठली लिपस्टिक चांगली दिसेल याचाच जास्त विचार करतात, खरंतर लिपस्टिक निवडताना आपल्या स्किनटोनपेक्षा आपल्या ओठांचा आकार कसा आहे हे जास्त विचारात घ्यायला हवं. तुमचे ओठ कसे आहेत आणि तुम्हाला ते कसे दिसायला हवे आहेत यावर लिपस्टिकची निवड ठरते.
२) त्यासाठी एक साधा निकष आहे. डार्क कलरची लिपस्टिक वापरली तर ओठ आहे त्यापेक्षा जास्त बारीक दिसतात. त्याऐवजी लाईट किंवा ब्राईट कलर वापरले तर ओठ आहे त्यापेक्षा जाड दिसतात. तेव्हा तुम्ही ठरवा तुमचे ओठ जाड आहेत की बारीक, ते तुम्हाला ठसठशीत दिसायला हवेत की बारीक-नाजूक? त्यानुसार शेड निवडा.
३) सध्या बाजारात कितीतरी प्रकारच्या लिपस्टिक उपलब्ध आहेत. तुमचे ओठ कोरडे असतील तर मॉईश्चरायझिंग लिपस्टिक वापरा, त्याने ओठ मऊ, तजेलदार दिसतील. अनेक मॉईश्चरायझिंग लिपस्टिक्समध्ये व्हिटॅमिन ई, ग्लिसरीन, कोरफड असते. तसा उल्लेख त्यावर असतो, लिपस्टिक घेताना हे सारं तपासून पहाता येतं.
काही फ्रोस्टेड लिपस्टिक्सही मिळतात. त्या वापरल्या तर ओठांना एक चमक येते कारण प्रकाश त्यावरून परावर्तित होतो. पण त्यांच्या सततच्या वापरानं ओठ जड पडतात, अनेकदा ओठांना भेगा पडतात, काही जणींचे ओठ खूप कोरडेही पडतात. म्हणून मग ही लिपस्टिक वापरण्यापूर्वी ओठांना मॉईश्चरायझर लावायला हवं.
४) ग्लॉस लिपस्टिक सध्या खूप लोकप्रिय आहेत. कुठल्याही मॅट लिपस्टिकबरोबर ही लिपस्टिक नीट ब्लेण्ड करून लावली तर ओठांना मस्त चमक येते.
५) अनेक जणी सकाळी ओठांवरून लिपस्टिक फिरवली की तेवढीच, पुन्हा पुन्हा लिपस्टिक लावायला काही वेळ नसतो. त्यामुळे मग लिपस्टिक निवडतानाच लॉँग वेअरिंग लिपस्टिक्स घ्या. ज्यांचा इफेक्ट ओठांवर ४ ते ८ तास टिकतो. तुम्ही जोवर काही तेलकट खात पीत नाहीत, तोवरही ही लिपस्टिक ओठांवर चांगली राहते.
६) क्रीम आणि मॅट लिपस्टिकचा योग्य वापर खूप सुंदर शेडस देतात. अन्य लिपस्टिकपेक्षा त्यात व्हॅक्सही जास्त असतं.
७) युव्ही फिल्टर्स लिपस्टिकही मिळतात, वयानुरूप ओठांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी ही लिपस्टिकही वापरता येऊ शकते.
- धनश्री संखे
ब्युटी एक्स्पर्ट