स्मार्ट फोन टीव्हीला कनेक्ट कसा करायचा?

By Admin | Published: August 20, 2015 02:37 PM2015-08-20T14:37:49+5:302015-08-20T14:37:49+5:30

आपल्या स्मार्ट फोनवरचे फोटो, व्हिडीओ टीव्हीवर पाहण्यासाठी काय करता येईल?

How to connect smart phone to TV? | स्मार्ट फोन टीव्हीला कनेक्ट कसा करायचा?

स्मार्ट फोन टीव्हीला कनेक्ट कसा करायचा?

googlenewsNext
>जेव्हापासून स्मार्टफोनमधील कॅमेरे अधिकच स्मार्ट झाले तेव्हापासून हौशी फोटोग्राफरची संख्या प्रचंड वाढली. जो तो आपली फोटोग्राफीची तहान स्मार्टफोन कॅमे:याच्या माध्यमातून भागवू लागला. कुठेही काही वेगळे दिसले की लगेच तुमच्यातील फोटोग्राफर जागा होतो. लगेच स्मार्टफोन कॅमे:याच्या मदतीने पाच-दहा क्लिक होतात आणि लगेच मित्रमंडळी किंवा घरातील सदस्यांना व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक वर हे फोटोग्राफ शेअर केले जातात. त्याचप्रमाणो घरात एखादा कार्यक्रम असेल तरी लगेच स्मार्टफोन कॅमे:याने त्याचे फोटो काढले जातात. त्याच स्मार्टफोन कॅमे:याच्या मदतीने व्हिडीओ शूटिंगदेखील केले जाते. मात्र, नंतर जेव्हा हे तुम्ही शूट केलेले फोटो किंवा व्हिडीओ निवांत क्षणी घरातील सदस्यांसोबत बघायचे ठरवतात तेव्हा काय होतं?
एकतर एकाच फोनवर सगळ्यांना एकदम पाहता येत नाहीत. कारण सगळे एकदम जमत नाहीत आणि जमले तरी एकदम कितीजण पाहणार? तेव्हा तुमच्या मनात कदाचित असा विचार येईल कीतुमच्या घरात जो भलामोठा स्मार्टटीव्ही तुम्ही घेतलेला आहे त्यावर जर हे स्मार्टफोनमधील फोटो किंवा व्हिडीओ बघता आले तर किती बरे होईल? सगळ्यांना एकत्र आनंद घेता येइल. तुमचा स्मार्टटीव्ही जर तुम्हाला स्मार्टफोन म्हणून वापरता आला तर? म्हणजेच तुमचा स्मार्टफोन जसाच्या तसा स्मार्टटीव्हीवर दिसला तर? अर्थात स्मार्टफोनची मिरर स्मार्टटीव्हीवर दिसली तर? 
आता तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे की वरील सर्व प्रश्नांची उत्तरे ‘होय हे शक्य आहे’ असेच आहे. तुम्ही थेट तुमचा फोनच तुमच्या टीव्हीला कनेक्ट करू शकता. 
हे कसे कराल?
तुमचा स्मार्टफोन तुमच्या स्मार्टटीव्हीला शेअर करण्यासाठी अनेक प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. गुगलचे अॅण्ड्रॉईड स्मार्टफोनसाठी क्रोमकास्ट,  डीएलएनए तंत्रज्ञान असलेले टीव्ही आणि स्मार्टफोन, अॅपल टीव्हीचा वापर करून एअर प्लेच्या माध्यमातून अॅपलचे स्मार्टफोन टीव्हीवर शेअर करता येतात. तसेच अनेक असे अनेक डोंगलदेखील उपलब्ध आहेत ज्याचा वापर करून तुम्हाला तुमचा स्मार्टफोन टीव्हीवर शेअर करता येईल.
आजकाल टीव्हीदेखील फार स्मार्ट झाले आहेत. पूर्वी टीव्हीवर एव्ही, एचडीएमआय, यूएसबी आदि सुविधा असायच्या; आता मात्र स्मार्ट टीव्हीला वाय-फाय, स्क्रीन मिररिंग, मीरा कास्ट आदि शेअरिंगसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान बिल्टइन उपलब्ध आहे. तसेच तुमच्या स्मार्टफोनमध्येदेखील स्क्रीन मिररिंग, कास्ट स्क्रीन आदि ऑप्शन उपलब्ध झाले आहेत, ज्याचा वापर करून तुमचा स्मार्टफोन तुमच्या स्मार्टटीव्हीवर मिरर करणो अधिक सोपे झाले आहे.
सोपा पर्याय कुठला?
तुमचा स्मार्टफोन स्मार्टटीव्हीवर मिरर करण्याचा सगळ्यात सोपा आणि कुठलाही अतिरिक्त खर्च न लागणारा प्रकार आपल्याला घरच्या घरी करता येईल. जर तुमचा टीव्ही स्मार्टटीव्ही असेल आणि त्यावर जर वाय-फाय आणि स्क्रीन मिररिंग किंवा मीरा कास्ट हे तंत्रज्ञान उपलब्ध असेल तर तुमचे काम अधिक सोपे होईल. मात्र त्याचबरोबर तुमच्या स्मार्टफोनवरसुद्धा कास्ट स्क्रीन किंवा स्क्रीन मिररिंग हे ऑप्शन असायला पाहिजे. अॅण्ड्रॉईडच्या लेटेस्ट व्हजर्नमध्ये कास्ट स्क्रीन किंवा स्क्रीन मिररिंग हे ऑप्शन इनबिल्ट उपलब्ध असतात.
जेव्हा तुम्हाला तुमचा स्मार्टफोन मिरर करायचा तेव्हा तुमच्या स्मार्टटीव्हीवर सोर्समध्ये जाऊन स्क्रीन मिररिंग किंवा मीरा कास्ट यापैकी किंवा तत्सम दुसरे एखादे जे ऑप्शन उपलब्ध असेल ते सिलेक्ट करून तुमच्या स्मार्टफोनवरसुद्धा स्क्रीन मिररिंग किंवा कास्ट स्क्रीन हे ऑप्शन एनॅबल करून इनबल वायरलेस डिसप्लेला क्लिक केले असता तुमचा टीव्ही तुम्हाला लिस्टमध्ये दिसेल. तो सिलेक्ट केला की तुमचा स्मार्टफोन तुमच्या टीव्हीच्या स्क्रीनवर दिसू लागेल. म्हणजे आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरील फोटो, व्हिडीओ, मुव्हीज तुमच्या टीव्हीच्या मोठय़ा स्क्रीनवर पाहू शकता.
- अनिल भापकर

Web Title: How to connect smart phone to TV?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.