कांदेपोहे खाऊन हो/नाही कसं सांगणार?

By admin | Published: June 22, 2016 07:05 PM2016-06-22T19:05:21+5:302016-06-22T19:05:21+5:30

एका भेटीत लग्नाला होकार/नकार देण्याच्या प्रथेला प्रश्न विचारण्याची धमक कमवतंय का आजचं तारुण्य?

How do you know if you have eaten onions? | कांदेपोहे खाऊन हो/नाही कसं सांगणार?

कांदेपोहे खाऊन हो/नाही कसं सांगणार?

Next
>- गजानन दिवाण
 
एका भेटीत लग्नाला होकार/नकार देण्याच्या प्रथेला प्रश्न विचारण्याची धमक कमवतंय का आजचं तारुण्य?
 
 
आई-बाबांनी मुलगी-मुलगा पाहायचा, कांदेपोहे खाण्याचा कार्यक्रम ठरवायचा आणि  नुसते पोहे खावून वा खाऊ घालून लग्नाचा बार उडवून द्यायचा हा ट्रेण्ड आता बदलतोय. 
या बदलत्या ट्रेण्डवर प्रकाश टाकणारी एक जाहिरात सोशल मिडीयावर पाहण्यात आली... 
एका मुलीच्या घरी तिला पाहण्यासाठी मुलासह त्याचे आई-वडील येतात. मुलगी तयार होण्यासाठी खूप वेळ घेते. अखेर कंटाळून  तिचे बाबा रूममध्ये जाऊन तिला लवकर ये सर्वजण वाट पाहत आहेत, असे सांगतात. यावर ती म्हणते, ‘पापा, सिर्फ समोसे खिलाकर कैसे डिसाईड करू की जिंदगी ईसीके साथ बितानी है...’
वडिलांना कुठलेही उत्तर देता येत नाही. एकही शब्द न बोलता ते खोलीबाहेर येतात. पाठोपाठ तयार होऊन मुलगीही येते. मुलगी पसंत असल्याचे मुलाचे आई-वडिल सांगतात. मुलगाही होकार देतो. तारीख कधीची काढायची, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यावर मुलीचे वडील म्हणतात, ‘तुम्ही आमचे घर पाहिले. आता आम्हालाही तुमचे घर पाहायचे आहे. माझी मुलगी काय करू शकते, हे तुम्ही जाणले. तुमच्या मुलाला काय-काय करता येतं हेही आम्हाला पाहायचं आहे..’
यावर मुलाचे आई-वडिल आश्चर्यचकीत होतात. ते म्हणतात, ‘मुलाला तर किचनमधले काहीच येत नाही. अगदी चहादेखील त्याला करता येत नाही. तो फार फार तर ओव्हनमध्ये नूडल्स बनवू शकतो.’ 
यावर मुलीचे वडील म्हणतात, ‘मला माफ करा. माझी मुलगी आयुष्यभर नुडल्स खाऊन नाही जगू शकत...’
वातावरण गंभीर बनते. कोणीच काही बोलत नाही. 
काही क्षणांत स्वत: मुलगाच बोलतो. ‘तुम्ही दहा दिवसांनी याल का आमच्या घरी?’ 
मुलीचे वडील म्हणतात, ‘दहा दिवसांनी का?’
तो म्हणतो, ‘या काळात मी आणखी काहीतरी बनवायला शिकेन’ मुला-मुलीसह सर्वांच्या चेहºयावर हास्य फुलते आणि ही जाहिरात येथे संपते.  
***
आपला जोडीदार निवडताना काय पाहिलं जातं? 
केवळ पोहे-समोसे खाऊ घालून वा खाऊन काय समजतं?
चहा-पान होण्यापुरत्या वेळेत दोन कुटुंब आणि स्वत: मुलगा-मुलगी ‘हो वा नाही’चा निर्णय कशाच्या आधारे घेतात?
मोठं कोडं आहे. 
 इंडिया ह्यूमन डेव्हलपमेंट सर्वे २०११-१२च्या आकडेवारीनुसार, देशातील ग्रामीण भागातील लग्न झालेल्या आणि ३२ वर्षे वयोगटातल्या अर्ध्याहून अधिक मुलींचं लग्नाआधी आपल्या जोडीदारासोबत एकदाही बोलणं झालेलं नाही. समोरासमोर तर नाहीच. फोन-इमेलच्या माध्यमातूनही त्यांचा जोडीदाराशी संपर्क झालेला नाही. एवढंच नाही तर या मुलींनी आपल्या जोडीदाराला लग्नाआधी प्रत्यक्ष पाहिलेलं देखील नाही. केवळ फोटो पाहून त्यांनी होकार दिला. तरूण पिढीतील हे वास्तव. ज्येष्ठांच्या बाबतीत काय असेल? सहापैकी केवळ एका महिलेला आपल्या भावी जोडीदारासोबत लग्नाच्या आधी बोलता आलं. शहरातलं वातावरण यापेक्षा थोडंसं बरं आहे. ते पण समाधानकारक म्हणता येणार नाही. 
 
आकडे काय सांगतात?
१९६०च्या दशकात शहरी भागातील साधारण २० टक्के मुलींचे लग्नाआधी आपल्या जोडीदारांशी बोलणं झाले. म्हणजे ८० टक्के मुलींनी न बोलताच लग्नाला होकार दिला. ग्रामीण भागातील हे प्रमाण केवळ १७ टक्के होते. पुढे १०७० च्या दशकात यात थोडीसी सुधारणा झाली. शहरी भागातील ३२ टक्के मुलींना लग्नाआधी जोडीदारांशी बोलता आले. ग्रामीण भागातील हे प्रमाण २३ टक्के होते. ऐंशीच्या दशकात शहरातील हे प्रमाण ४२ टक्के तर ग्रामीणमधील ३० टक्के होते. पुढे नव्वदच्या दशकात शहरातील प्रमाण ६० टक्क्यांवर पोहचले तर ग्रामीण भागात ४७ टक्के झाले. 
याचा अर्थ अजुनही जवळपास ५० टक्के मुली आपल्या भावी जोडीदाराशी न बोलताच आयुष्यभराचा निर्णय घेऊन मोकळ्या होतात. 
 
लग्नाचं वय वाढतेय...
मुलींच्या लग्नाचं वय आता वाढत आहे, त्यातल्या त्यात हे एक समाधान. संयुक्त राष्टÑाच्या आकडेवारीनसाुर भारतातील मुलींच्या लग्नाचं वय १९९१ साली १९.३ वर्षे होते. २०११ मध्ये हे वय २१ वर्षांवर पोहोचलं आहे. इंडिया ह्यूमन डेव्हलपमेंट सर्वेनुसार २०११-१२ साली साधारण ४१ टक्के विवाहित महिलांचा वयोगट हा १५ ते ३२ वर्षे असा होता. याचाच अर्थ, १९८० नंतर जन्मलेला मुलींनी १६ ते १८ वयादरम्यान लग्न केले. १९ ते २१ या वयोगटात २४ टक्के मुलींनी लग्न केले आणि २२ ते २५ या वयोगटात ११.५ टक्के मुलींनी लग्न केले. 
१९७०च्या दशकात १५ वर्षांखालील वयात लग्न केलेल्या मुलींची टक्केवारी २९ टक्के होती. १६ ते १८ वयोगटातील ३८ टक्के, १९ ते २१ वयोगटातील २०, २२ ते २५ वयोगटातील १० आणि २६ ते ३० वयोगाटातील ४ टक्के इतकी होती. १९७० ते ९७च्या दरम्यान यात थोडीसी सुधारणा झाली. १५ पेक्षा कमी वय असलेल्या विवाहित मुलींची टक्केवारी २०, १६ ते १८ वयोगटातील टक्केवारी ४१, १९ ते २१ वयोगटातील टक्केवारी २५, २२ ते २५ वयोगटातील टक्केवारी ११ आणि २६ ते ३० वयोगटातील टक्केवारी चार इतकी आहे. 
याचा अर्थ १६ ते १८ वर्षे वयोगटात मुलींचे लग्न करण्याचे प्रमाण अजूनही ४१ टक्क्यांवर असून ते धोकादायक आहे. युनिसेफने २०११ साली भारतात केलेल्या सर्वेक्षणानुसार गरिबीमुळे पालक आपल्या पाल्याचे अल्पवयात लग्न करतात. सामाजिक दबाव, शाळा सोडण्याचं प्रमाण आणि शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोण ही देखील यामागची कारणं असल्याचं हा सर्वे सांगतो. 
 
मुलीकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलतोय...
समाजाचा मुलीकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलत आहे. वंशाचा दिवा आणि म्हातारपणाचा केवळ मुलाचाच आधार असतो, हे चित्र आता हळूहळू बदलत आहे. २००४-०५ मध्य आईला मुलीकडून आर्थिक सहकार्य मिळण्याचे प्रमाण ३२.८ टक्के होते. ते वाढून २०११-१२मध्ये ४४.७५ टक्क्यांवर गेले आहे. एवढंच नाही तर याच काळातील सर्वेक्षणानुसार म्हातारपणी मुलीकडे राहणाºया आई-वडिलांचे प्रमाण तब्बल दहा टक्क्यांनी वाढले आहे. 
 
 

Web Title: How do you know if you have eaten onions?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.