कसं ओळखाल की तुमच्या भोवतीची माणसं प्रगतीला तारक आहेत की मारक?
By admin | Published: April 25, 2017 04:29 PM2017-04-25T16:29:01+5:302017-04-25T16:36:08+5:30
आपला स्वभाव, फॅशन, करिअरचे निर्णय हे सारं दोस्तांशी सल्लामसलत करुनच आपण ठरवतो.पण
Next
>- नितांत महाजन
आपले कॉलेजातले दोस्त. आपली गॅंग. आपला ग्रूप हे सारं आपल्याला जीवाभावाचंच असतं. दोस्त म्हणतील तसं आपण करतो. आपला स्वभाव, आवडीनिवडी, फॅशन, आपलं बोलणं, रुटीन, करिअरचे निर्णय हे सारं दोस्तांशी सल्लामसलत करुनच आपण ठरवतो.
आपल्या घरच्यांपेक्षा हे दोस्तच आपल्याला जवळचे वाटतात.
मात्र आपण हे कसं ओळखायचं की आपले हे दोस्त आपल्या प्रगतीला तारक आहेत की मारक?
त्याच्या काही टेस्ट लंडन स्थित एका ऑनलाइन पोर्टलने सांगितल्या आहेत.
1) डू इट ऑर नॉट पॉसिबल
ही एक साधी टेस्ट या अभ्यासानं अनेकांच्या मित्रांच्या संदर्भात वापरुन पाहिली. म्हणजे काय तर एखादं काम जर मित्र करणार असेल तर दोस्त काय म्हणतात. म्हणजे अगदी पहिली विचारही न करता दिलेली रिअॅक्शन काय असते?
डू इट! म्हणजे जमेल तुला, क्या बात है, कर तू, आम्ही आहोत ना.
असं म्हणतात
की
काहीतरीच काय, कसली खुळं येतात तुझ्या डोक्यात, तुझं वय काय तू बोलतोस काय, समजतो कोण स्वतर्ला, औकातीत रहा.
नेमकं काय सांगतात.
हे मित्र तुम्हाला?
टेस्ट साधी आहे, अत्यंत सोपी.
पण आपल्या मित्रांच्या संदर्भात तिचा विचार करून पहा.
म्हणजे काय जर तुमचे मित्र जर तुम्हाला पहिली रिअॅक्शन देत असतील तर समजा की ते तुमच्या प्रगतीला पोषक आहेत.
दुसरी देत असतील तर समजा ते घातक आहेत, ते तुमचा उत्साह मारुन टाकतात.
तुम्हाला बांधून घालतात.
तुम्हाला बांधून घालतात.
अशा मित्रांचा हात त्वरित सोडा.