कार्ट शेफारलंच कसं?
By admin | Published: June 11, 2015 03:02 PM2015-06-11T15:02:56+5:302015-06-11T15:02:56+5:30
ज्या घरात आईवडील व्यसन करतात, त्या घरातली मुलं व्यसनांच्या आहारी जाण्याचं प्रमाणही मोठं आहे, मुलांना वाटतं, घरातले करतात ना ड्रिंक्स, मग त्यात काही वाईट नाही. सोशल ड्रिंक्सच्या नावाखाली पाटर्य़ा करताना घसरणारा तोल सावरायचा कुणी?
Next
>दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेला बंटी. त्याची धास्तावलेली आई विनवण्या करकरुन त्याच्या वडिलांना मुक्तांगणमधे घेऊन आली होती.
बंटीच्या आईला काहीही करुन बंटीला दारूच्या पाशातून सोडवायचंच होतं.
ते दोघंही ढवळे सरांना भेटले. त्यांची चर्चा सुरू झाली. ढवळे सरांनी विचारलं की, सांगा काय मदत पाहिजे?
‘‘हिच्या लाडाने बंटी नको नको त्या गोष्टी या वयात करत असतो. आणि हे सारं आमच्या घरात घडावं? एका उच्चभ्रू घरात?. त्याला तुम्ही सरळ करावं अशी आमची इच्छा आहे.’’
-बंटीचे वडील तावातावानं बोलत होते.
त्यावर ढवळे सर शांतपणो म्हणाले,
‘‘ आम्हालाही असं वाटतं की त्यानं या वयात सिगरेट ओढणं किंवा दारू पिणं योग्य नाही. त्याच्या आईनं जे सांगितलं त्यावरुन तो अजून पूर्णपणो व्यसनी झालेला नाही. त्यामुळे आपण सगळे एकित्रतपणो त्याला योग्य रीतीने वागायला मदत करू शकतो’’
हे ऐकून त्याचे वडील उखडलेच, ‘‘आम्हाला कशाला त्यात ओढत आहात? आम्ही जे करायचं होत ते करून झालं आहे. म्हणून तर आम्ही तुमच्याकडे आलो आहोत ना?’’
‘‘तुम्ही प्रयत्न केलेत हे मान्य. पण मला असं वाटतं की आत्तापर्यंत जे प्रयत्न होते ते व्यसनाच्याकडे पाहण्याच्या अयोग्य दृष्टीकोनातून आले होते. आम्ही तुम्हाला शास्त्नीय रीतीने त्याला मदत कशी करावी हे सांगू शकतो. सर्वात पहिले तुमच्या प्रत्यक्ष घरात असलेलं वातावरण बदलण्ं गरजेचं आहे.’’
हे ऐकून ती बंटीचेबाबा भडकलेच. म्हणाले,
‘‘ रब्बीश. म्हणजे तुम्ही आरोप करताय की आमच्या घरातील वातावरण चांगलं नाही?’’ आईने त्यांना शांत व्हा अशी खूण केली. तरी ते त्या विषयी बोलण्यास फारसे उत्सुक वाटले नाहीत. मध्येच आई म्हणाली ‘‘ आम्ही काय करायला हवं?’’
‘‘तुम्ही दोघांनीही एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. बंटीशी बोलण्याची संधी माङयापेक्षा तुम्हाला जास्त वेळा मिळेल. म्हणून मिळेल तेंव्ंर त्याच्याशी संवाद साधावा लागेल. त्याच्याशी बोलताना कोणती काळजी घ्यायची ते मी तुम्हाला सांगणार आहेच, पण त्या बरोबर बंटीचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काही मुद्दे थोडक्यात लिहिले आहे. ते एकदा वाचा. दोघांनीही ते वाचले. आईच्या चेह:यावर उत्सुकता दिसत होती तर वडिलांच्या चेह:यावर यात काय नवीन सांगताय असे तुच्छतेचे भाव होते.
‘‘ तुम्ही स्मोक-ड्रिंक्स करता का?’ ढवळे सरांनी विचारलं. वडील म्हणाले, ‘‘ मी व्यसनी नाही. मी फक्त सोशली ड्रिंक्स घेतो. आणि क्वचित सिगरेट ओढतो. आणि मला वाटतं हे नॉर्मल आहे.’’
‘‘मी समजू शकतो. आजकाल बहुतेक कंपनीच्या कार्यक्र मात दारू हा भाग असतोच. आणि क्वचित कधीतरी ड्रिंक्स घेणा:या व्यक्ति असतात. अनेकदा मनातून पटत नसलं तरी एटीकेटस म्हणून करावे लागतं म्हणतात. आणि मुलं अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतात. पण बंटीला सावरायचं तर आपल्याला निश्चित अशी योजना आखावी लागेल.तुमच्या सवयीतही बदल करावे लागतील. तुम्ही जे अधून मधून का होईना ड्रिंक्स घेता ती किमान एक महिना संपूर्णपणो बंद करावी लागतील. या गोष्टीची तयारी असेल तर आपण पुढे बोलू.
तुम्ही तुमचा वेळ घ्या त्या दरम्यान मी बंटीशी बोलून घेईन.
तुम्ही तुमचा वेळ घ्या त्या दरम्यान मी बंटीशी बोलून घेईन. आज थांबूया का इथे? असं ढवळे सरांनी विचारताच ते
सत्न संपलं. आईच्या चेह:या वर स्पष्ट आनंद दिसत होता. वडील मात्न टेन्शनमध्ये वाटत होते.
त्यावेळी माङया लक्षात आलं की, पालकांनी फक्त मुलांनाच दोष देऊन उपयोगी नाही.
तरुण मुलांनी जे चांगलं वागावं असं पालकांना वाटतं ते पालकांनी स्वत: वागायला हवं.
घरातलं वातावरण बदलायला हवं. आणि स्वत: सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर रहायला हवं?
पण ते बंटीच्या आणि इतरांच्याही पालकांना कसं जमावं?
आणि नाहीच जमवलं तर.?
मनोज कौशिक मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे यांच्या सहकार्याने.