ट्विटर सेल चालतो कसा?

By admin | Published: February 4, 2016 08:55 PM2016-02-04T20:55:19+5:302016-02-04T20:55:19+5:30

मुंबई पोलिसांच्या टीममध्ये चोवीस तास ऑनलाइन टक्कं जागं राहून काम करणारी ही माणसं आहेत कोण? काय करतात? कसं करतात?

How to run a Twitter cell? | ट्विटर सेल चालतो कसा?

ट्विटर सेल चालतो कसा?

Next
>‘‘तरुण मुलांच्या जगात व्हायरल झालेले, तुफान चर्चेत असलेले आणि ‘नेमके’ त्यांच्यातल्या चुकारपणावर बोट ठेवणारे तरीही ‘फ्रेण्डली’ असे ट्विट्स नेमके कुणाचे ब्रेनचाइल्ड असतात?’’
- असं विचारलं तर या टीममधले सगळे हसत सांगतात, ‘‘आमच्या सगळ्यांच्याच डोक्यातून निघतात या कल्पना! हे टीमवर्क आहे आणि ते सतत चालतं. त्यामुळे कुणा एकाचं नाही, तर हे काम सगळ्यांचं आहे. सतत चालणारं आहे. चोवीस तास अलर्ट ठेवणारं आणि सहभागाची प्रेरणा देणारं हे काम आहे.’’ 
दररोज ते सारे भेटतात. त्या त्या आठवडय़ाची थीम ठरवतात. त्यावर भरपूर कल्पनांचा विचार केला जातो. ट्विट तयार केले जातात. त्यातून जे उत्तम तेच निवडून, पोलीस अधिका:यांकडून मंजुरी घेऊन ट्विट केले जातात.
पण नुस्तं गमतीजमतीचं ट्विट असं या कामाचं स्वरूप नाही. हे काम अत्यंत ‘सिरीयसली’ चालतं आणि गांभीर्यानं केलंही जातं. या हॅण्डलवरच अनेक जण तक्रारी करतात. गंभीर तक्रार असेल तर तत्काल त्या व्यक्तीशी संपर्क केला जातो. माहिती गोळा केली जाते आणि संबंधित माणसाच्या जवळच्या पोलीस स्टेशनमधून कार्यवाहीला सुरुवातही होते.
‘रिअल टाइम’ कामाचा आनंद, प्रभावी आणि परिणामकारक तत्काल काम आणि तक्रार निवारण झाल्यावर ते पूर्ण झाल्याचं ट्विट हे असं चक्र चोवीस तास फिरतं. पोलिसांच्याच कामासारखं या हॅण्डलच्या कामालाही वेळकाळाचं कुठलंही बंधन नाही.
तीन शिफ्टमध्ये ही टीम काम करते. नागरिकांनी केलेलं एकही ट्विट दुर्लक्षिलं जाऊ नये म्हणून  ही माणसं काम करतात. वेब सेंटरसोबतच टि¦टर हॅण्डल हाताळताना टीमची अनेकदा दमछाक उडते.  अनेकदा महिलांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी वेब डेव्हलपमेण्ट सेलच्या प्रमख अश्विनी कोळी त्यांच्याशी स्वत: संवाद साधतात. अनेकदा रात्री दोनतीन वाजतासुद्धा अश्विनी कोळी यांना कॉलसाठी तत्पर राहावं लागतं. मुंबई पोलीस टि¦टर अकाउंट व पोलीस आयुक्त टि¦टर अकाउंटसाठी प्रत्येकी दोन संगणक राखीव ठेवण्यात आले आहेत. मात्र मनुष्यबळ तुलनेनं कमी असल्यानं हे काम जिकिरीचं होतं. तरीही अश्विनी कोळी यांनी उत्तमपणो वेब सेंटर सुरू ठेवल्यानं त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यातही आलं आहे. 
आता वाहतूक पोलिसांसाठीही लवकरच ट्विटर हॅण्डल सुरू होईल अशीही शक्यता आहे. त्यामुळे तरुण मुलं आता आपल्या अडचणी, तक्रारी कुठल्याही भीतीभयाशिवाय थेट वरिष्ठ पोलीस अधिका:यांर्पयत पोहचवू शकणार आहेत.
 
थेट कनेक्टिव्हिटीची पॉझिटिव्ह चेन
 
सोशल मीडियावर काम करत असताना आपण समाजासाठी काही तरी देणं लागतो ही भावना नेहमीच होती. सुरुवातीपासून पोलिसांबद्दल एक वेगळी उत्सुकताही होती. त्यात आमच्या टीममध्ये काम करत असलेल्या सुचिकानं एक कल्पना मांडली. मुंबई पोलिसांचंही ट्विटर अकाउंट सुरू झालं तर? अशी कल्पना तिनं मांडली. त्या दिशेनं आमची रिसर्च मोहीम सुरू झाली. या रिसर्च मोहिमेअंतर्गत नवनवीन कल्पना सुचत गेल्या. सुचिकानं धाडस करून हा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस अधिका:यांसमोर मांडला. योगायोगानं पोलीसही तेव्हा असं अकाउण्ट सुरू करण्याच्या विचारात होते. त्यामुळे टि¦टर अकाउण्टच्या या संकल्पनेला पोलिसांकडून ग्रीन सिग्नल मिळाला.  अकाउण्ट सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी त्याला मुंबईकरांचा जो  प्रतिसाद मिळाला तो पाहून आम्हीही भारावलो. एक वेगळीच कनेक्टिव्हिटी निर्माण झाली. 
आणि लक्षात आलं की, तरुणाईला तरुणाईच्या भाषेत समजावण्यासाठी हा प्लॅटफॉर्म फार महत्त्वाचा आहे. काम सुरू झाल्यावर टि¦टरवरील तक्रारींचा आम्ही अभ्यास केला. त्यात तीन प्रकारची माणसे भेटली. तटस्थ, सकारात्मक आणि नकारात्मक स्वभावाची. त्यात 7क् टक्के माणसं तटस्थ स्वभावाची होती. म्हणजे आपल्याला काय त्याचं या मोडवरची. त्यांना सकारात्मक विचारसरणीच्या गटात कसं आणायचं या दिशेनं आम्ही प्रयत्न सुरू केले.  शब्दांबरोबरच दृश्यात्मकतेतून जनजागृती करणो अधिक प्रभावी ठरेल म्हणून आम्ही व्हिज्युअल्सकडेही वळलो. शब्दांबरोबरच  चित्रतून व्यक्त होणारे वास्तव जास्त भिडते हे त्यातूनच लक्षात आलं. आणि जनजागृतीची मोहीम सुरू झाली. टि¦टर अकाउंटसाठी वरिष्ठ अधिका:यांसोबत एक व्हॉट्सअॅप ग्रुप आम्ही तयार केला आहे. या ग्रुपअंतर्गत आम्ही विषय ठरवून त्याची एक टॅगलाइन ठरवतो. ही लाइन मिळताच त्यावर काम करून काटरून आणि शब्दांच्या मदतीने पोस्टर तयार केले जातात. यातील ब:याचशा पोस्टर्सची चर्चा जगभर झाली. हजारो रिट्विट्स झाले. एक वेगळाच अभिमान, गर्व, मजा आहे हे काम म्हणजे, आणि त्याचंच समाधानही आहे.
 
- अमीन घडीअली 
(सोशल मीडिया, ट्रायव्होन सोशल मीडिया हेड)
 
 
जबाबदारीचं ऑनलाइन काम
2क्क्4 मध्ये पोलीस दलात रुजू झाल्यापासून नागरिकांच्या समस्या जवळून जाणून घेतल्या. 2क्12 मध्ये पोलीस नियंत्रण कक्षात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर वेबसाइटचं काम करताना लक्षात येत होतं की, नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक, मेसेज सेवा आहेत. मात्र याबाबत पुरेशी जनजागृती नसल्यानं नागरिक त्याकडे लक्ष देत नाहीत. बदलत्या काळानुसार अशी सुविधा अपेक्षित होती की जी बसल्या ठिकाणी लोकांच्या तक्रारींचे निवारण करेन. आता मुंबईत 9क् टक्के नागरिक स्मार्ट फोन  वापरत असून, टि¦टरचं माध्यम हा त्यांच्यासाठी योग्य दुवा ठरत आहे. नागरिकांची आलेली तक्रार तत्काळ संबंधित पोलीस ठाणो अथवा नियंत्रण कक्षाला पुरविण्याचं काम आमच्याकडे असतं. स्वत:चं टि¦टर अकाउंट हाताळताना जबाबदारी नव्हती. मात्र तेच काम जेव्हा जनतेसाठी करतो, तेव्हा एक वेगळीच जबाबदारी असल्याची जाणीव होते. प्रत्येक टि¦टचा रिप्लाय देतेवेळी त्यावर योग्य विचार करून काम केले जाते. 
- स्मितेज सावंत 
 पोलीस अंमलदार
 
 
 
ऑनलाइन पोलीस ठाणो
 
टि¦टर अकाउंटवर दिवसरात्र डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं. कारण जर एखाद्या  टि¦टची लगेच दखल घेतली नाही, तर नागरिक नाराज होतात. बरेचसे टि¦ट्स हे वाहतुकीच्या समस्यांवर असतात. अशावेळी संबंधित माहिती वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप सेवेवर फॉरवर्ड केली जाते. त्यावर अवघ्या काही मिनिटांतच कारवाई केली जाते. नागरिकांसाठी सध्या तरी हे ऑनलाइन पोलीस ठाणंच बनल्यासारखं वाटतं.
- अमोल कदम 
पोलीस अंमलदार
 
 
 
टि¦टर हॅण्डल हे संवादाचं माध्यम 
नागरिक आणि पोलिसांसाठी टि¦टर अकाउण्ट हे एक संवादाचं माध्यम ठरलं आहे. या माध्यमातून सायबर गुन्हे, अमली पदार्थ, ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या जाळ्यात गुरफटत चाललेल्या तरुणाईला जागृत करणं हे आमच्यासमोर आव्हान आहे. तरुणांशी कनेक्ट निर्माण करून पोलिसांविषयी विश्वास निर्माण करणं हा आमचा प्रयत्न आहे.
 
- अश्विनी कोळी 
 सहायक पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा
वेब डेव्हलपमेण्ट सेलच्या प्रमुख 
 
वेब डेव्हलपमेण्ट सेल
अश्विनी कोळी- सहायक पोलीस निरीक्षक
पोलीस अंमलदार- दिलीप राजाराम हारुगडे, दिनेश परब, सूर्यकांत कांबळे, संतोष धुरत, प्रशांत केसरकर, अमोल कदम, स्मितेज सावंत, दत्तात्रय पवार, राजेश चव्हाण, लक्ष्मीकांत धोंडगे, प्रमोद पाटील.
............
ट्रायव्होनची टीम 
अमीन घडीअली
रित्विक मैंदर्गी
तेजस बेर्डे
सुचिका पांडे 

Web Title: How to run a Twitter cell?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.