ऑफिसातल्या राजकारणात टिकाल कसं?

By admin | Published: June 18, 2015 05:08 PM2015-06-18T17:08:41+5:302015-06-18T17:08:41+5:30

सगळेच माझ्यासारखे नसतील, काही माझ्यापेक्षा फार वेगळे असतील आणि काही मला छळायला टपतीलही, हे गृहीत असतानाही ‘टीम’चा भाग होणं सोपं कसं असेल?

How to survive in office politics? | ऑफिसातल्या राजकारणात टिकाल कसं?

ऑफिसातल्या राजकारणात टिकाल कसं?

Next

चार माणसं एकत्र आली म्हणजे मतभेद होणार, प्रत्येकाचे विचार, कामाची पद्धत वेगळी असणार हे सारं गृहीत धरायला हवं.  प्रोफेशनल आयुष्याची सुरुवात करताना इतपत मनाची तयारी करूनच ऑफिसमधे पाऊल ठेवायला हवं की, सगळेच माङयासारखे नसतील, काही माङयापेक्षा फार वेगळे असतील आणि मला त्यांच्यासोबत जमवून घ्यायचं आहे. 

मात्र होतं वेगळंच. ऑफिसात एक नवा शब्द वाटय़ालाही येतो आणि अनुभवायलाही मिळतो. त्याचं नाव ‘ऑफिस पॉलिटिक्स!’ 
मुळात प्रश्न पडतो की, आपण ऑफिस पॉलिटिक्स केलं नाही तरी आपण त्याचा बळी ठरलो तर? लोकांनी आपल्याला छळलं तर?
आपल्याशी अगदी छान वागणारी व्यक्तीही आपल्या मागे आपल्याविषयी हानिकारक गोष्टी पसरवू शकते, आपल्याला मिळणार असलेलं प्रमोशन कोणीतरी गोड बोलून पटकावू शकतं, बॉसची हांजी हांजी करणारे लोक आपल्या पुढे जाऊ शकतात. असं बरंच काही घडू शकतं. पण हे सारं हाताळणं नव्या काळात सॉफ्ट स्किल्सचाच भाग आहे. तुम्ही ऑफिसमधलं राजकारण आणि त्यातून येणारं टेन्शन कसं हाताळता, माणसं कशी जपता, टिकवता आणि तरीही सगळ्यात चांगलं परफॉर्म करतात हे सारं नव्या काळात फार महत्त्वाचं झालं आहे.
त्यामुळे ऑफिसातलं राजकारण कसं हाताळायचं यासाठीची काही सूत्रं कायम लक्षात ठेवायला हवीत.
* खंबीर व्हायला शिका. जर कोणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्नास देत असेल, तर त्या व्यक्तीला हे स्पष्ट करा की तुम्हाला हे कळते आहे आणि तुम्ही ते चालवून घेणार नाही. अर्थात, असे करण्यासाठी भांडण्याची किंवा फार मोठा आवाज करण्याची गरज नाही. समजदार को इशारा काफी है, एवढे लक्षात ठेवा. तुमच्या एखाद्या वाक्याने, एखाद्या हावभावानेसुद्धा तुम्ही ही गोष्ट दर्शवून देऊ शकता.
* आपले काम चोख आणि उत्तम करा.  एकदा का तुमच्या वरिष्ठांचा तुमच्या कामावर ठाम विश्वास बसला, की मग राजकारणाला तुम्ही इतके सहज बळी पडणार नाहीत.
* स्वत: कोणत्याही प्रकारच्या राजकारणात किंवा वायफळ गॉसिपमध्ये सहभागी होऊ नका. तुमची वागणूक जर या सा:याच्या पलीकडची असेल तर तुमच्याविषयी राजकारण खेळणाराही जरा बिचकून राहीन.
* तुमच्या कामात पारदर्शकता ठेवा. कुणाला तुमच्या कामाच्या पद्धतीवर किंवा कोणत्याही बाबतीत कोणत्याही प्रकारची शंका, प्रश्न निर्माण होणार नाहीत याची दक्षता ठेवा.
* एवढे करूनसुद्धा काही वेळा तुम्ही इतरांच्या वाईट नियोजनाचे बळी पडू शकता. तुमच्या ही गोष्ट लक्षात येताच त्या व्यक्तीला जाब विचारा. तुम्हाला जे जाणवते आहे हे स्पष्टपणो सांगा व त्याच्या वागणुकीची जाणीव शांत शब्दात करुन द्या. असे केल्याने ती व्यक्ती बरेचदा आपोआपच मागे सरते. आणि नाहीच सरली तर ऑफिसमध्ये ही गोष्ट उघड झाल्याने त्यांचे सगळे नियोजन व्यर्थ ठरू शकते.
* माणसांना पारखण्याची कला लवकरात लवकर आत्मसात करा. ऑफिसमध्ये कोण आपले हितचिंतक आहेत व कोण राजकारणी, हे जितक्या लवकर ओळखू शकाल तितके तुमच्यासाठी चांगले ! त्यातूनही सा:यांशी जुळवून घेत काम करावं लागणं हे स्किल ! प्रय} केले तर ते नक्की जमतं !
 
गॉसिप बंद, कान बंद !
 
गॉसिप करायला सगळ्यांनाच आवडतं, त्याला अपवाद कुणीही नाही.
मात्र तरीही कार्यालयीन शिस्तीचा भाग म्हणून आपण किती इकडचं-तिकडं करणार, किती चुगल्या लावणार याची एक सीमा असते.
त्यामुळे कशाचीही पर्वा न करता तुम्ही गॉसिप करत असाल तर काही सभ्यतेचे नियम तरी किमान लक्षात ठेवाच !
1) कुणाच्याही व्यक्तिगत आयुष्याविषयी कधीही, कुणाहीकडे गॉसिप करू नका. 
2) उगीच अपु:या आणि अर्धवट माहितीने वावडय़ा उठवू नका.
3) कुणाचा अपमान होईल, व्यंगावर टीका होईल, जिव्हारी लागेल अशा टिप्पण्या परोक्ष किंवा अपरोक्षही करू नका.
4) बॉसविषयी काहीही माहिती पसरवू नका. तुम्हाला कितीही काहीही सिक्रेट माहिती असलं तरी गप्प बसा.
5) सगळ्यात महत्त्वाचं, स्वत:च्या व्यक्तिगत आयुष्याची धुणी ऑफिसात धुवू नका.
 
- समिंदरा हर्डिकर-सावंत
 

Web Title: How to survive in office politics?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.