जिवाभावाचा भाऊ व्हिलन कसा असेल?
By admin | Published: August 27, 2015 06:34 PM2015-08-27T18:34:41+5:302015-08-27T18:34:41+5:30
निमित्त होतं एका बातमीचं, भावानं बहिणीचा खून केल्याचं, ती आपलं ऐकत नाही अशा क्षुल्लक कारणातून हा खून झाला.त्यातून काही प्रश्न समोर आले की...
Next
निमित्त होतं एका बातमीचं, भावानं बहिणीचा खून केल्याचं, ती आपलं ऐकत नाही अशा क्षुल्लक कारणातून हा खून झाला.
त्यातून काही प्रश्न समोर आले की, खरंच मुलं घरात बहिणींवर दादागिरी करतात का? की हे चित्र बदललंय? दादाताईची मैत्रीच झाली आहे?
‘घरोघरची दादागिरी’ या त्या वाचकचर्चेला मुलींपेक्षा मुलांचाच प्रतिसाद अधिक आला हे विशेष!
एरवी मुली इमोशनल कहाण्या भरभरून लिहितात. पण यावेळेस तरुण मुलांची पत्रं जास्त होती. कदाचित मुलांना या विषयावर बोलायचंच होतं. त्यातून त्यांना कधी नव्हे ती ही संधी मिळाली!
ही सारी पत्रं वाचताना लक्षात येतं की, आजही मुलांचं आपल्या बहिणींवर जिवापाड प्रेम आहे. आपल्या बहिणीसाठी आपण काय वाट्टेल ते करू शकतो, करायलाच हवं ही भावना आहे!
पण त्या भावनेला जबाबदारीचं ओझं चिकटलेलं आहे. बहिणीचं लगA होत नाही तोर्पयत ती आपली म्हणजे वडिलांची आणि आपली जबाबदारी आहे असाच एकूण मुलांचा सूर!
ती जबाबदारी त्यांच्या डोक्यावर समाज देतो, नातेवाईक देतात, घरातली आर्थिक परिस्थिती देते आणि पूर्वापार भावानं अमुक पद्धतीनंच वागायचं असतं हा समजही देतो.
त्या ओङयाखाली म्हणा किंवा त्या भावनेतून मिळणा:या आपण सुपीरिअर आहोत या भावनेपोटी म्हणा, तरुण मुलं स्वत:ला एकदम बहिणीचा पाठीराखा याच भूमिकेतून पाहतात. आपण बहिणीचे रक्षक आहोत, तिची जबाबदारी, बरंवाईट, घराण्याची इज्जत हे सारं आपल्यावरच आहे, असा भावनिक भार स्वत:हून उचलतात.
त्यात त्यांच्या डोक्यावर असतं समवयीन मित्रंचं ओझं.
मित्र म्हणतात, तुझी बहीण बघ, तिच्याकडे लक्ष ठेव. ती अमक्याशी बोलते. तिला तुझा धाक नाही, तुझं घरात काही चालत नाही, अशानं तुमचं नाक कापलं जाईल. किंवा, तुझी बहीण जास्त अॅडव्हान्स आहे.
हे सारं ऐकणं मुलांना आजही फार अपमानास्पद वाटतं असं ही पत्रं सांगतात.
त्यामुळे घरात तरुण जबाबदार मुलासारखं वागत ते बहिणींच्या रक्षणासाठी पहारे लावतात.
अनेक भाऊ पत्रत लिहितात, जातं काय समानतेच्या बाता मारायला, पण जग कसंय? बहिणीला काही झालं किंवा तिचं काही बरंवाईट झालं तर कोण जबाबदार? घरचे मला विचारतील की, तू काय करत होतास? त्यावेळी काय उत्तर द्यायचं?
ैआणि त्यातून आपण बहिणीपेक्षा ‘सरस’ असल्याच्या भूमिकेतून सारे भाऊ तिला मदत तरी करतात, सल्ले तरी देतात, ओरडतात, लक्ष ठेवतात, मागेमागे असतात, मित्रंना लक्ष ठेवायला सांगतात.
हेतू चांगला असतो. पण परिणाम?
बहिणी वैतागतात. अबोले धरतात.
त्यांना नको होते ही दादागिरी!
स्वतंत्र आणि शिक्षित होत चाललेल्या बहिणींना वाटतं की, आपण समर्थ आहोत. आपण आपली काळजी घेऊ शकतो. पण हेच भावांना पटत नाही.
भांडण होतंय ते या वळणावर!
काळाच्या एका विचित्र टप्प्यावर हे नातं येऊन ठेपलंय हे नक्की!
आईबाबा चुकवतात सगळं?
मुलामुलींमधे भांडणं आईबाबाच लावतात, असाही एक दावा..
अनेक पत्रंतून हा एक नवीनच मुद्दा समोर आला. आईबाबा भावा-बहिणीत भांडणं लावतात. काही घरात एक तर मुलीचे जास्त लाड होतात. मुलांना धारेवर धरलं जातं.
काही घरात उलटंच.
आईबाबाच भावांना विशेष हक्क देतात. मुलगी कॉलेजात गेली की मुलाला सांगतात, हिच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तुझी!
मुलीला सतत सांगतात, तो भाऊ आहे. त्याची काळजी घे. तोच तुझं पुढे माहेर. त्यातून मग एकमेकांविषयी आकस तयार होतो. त्यात मार्काची स्पर्धा, दिसण्याची स्पर्धा, कौतुक हे सारं तेल ओतत राहतं.
काही घरात तर काका-मामा हे मुलींना एकदम कमीच लेखतात. मुलांना बरोबरीनं वागवतात.
मग तरुण मुलांनाही वाटतं की, आपल्या बहिणीची अक्कल चुलीपाशीच. तिनं जास्त बोलू नये.
मग भांडण अटळ!
अनेक मुलींनी लिहिलं आहे की, केवळ आपल्याला पसंत नाही म्हणून आमच्या भावांनी आमच्या प्रेमात बिब्बा घातला. आणि स्वत: मात्र मुली फिरवतो.
पण आईबाबा त्यालाच सपोर्ट करतात.
आईवडिलांच्या दुटप्पी भूमिकेचे अनेक किस्से या पत्रत वाचायला मिळतात. त्यातून एका घरात राहून महिनोन्महिने अबोले अनेक भाऊबहीण धरतात.
पण या प्रश्नावर इलाज काही त्यांना सापडत नाही.
पङोसिव्ह भाऊ आणि जातपात
प्रेमात पडताना मुलींना सगळ्यात जास्त भीती वाटते ती भावाच्या संतापाची!
अनेक मुलींनी लिहिलं आहे की, आम्हाला कुणी आवडलं तरी प्रेमाबिमात आम्ही पडत नाही. कारण आम्हाला माहितीच आहे की, आमचा भाऊ आमचा तरी खून करील नाही तर त्याचा तरी!
प्रत्यक्षात तसं होत नसलं तरी या मुलींना भावाचा धाक आहे. खेडय़ापाडय़ात जातीपातीचं वास्तवच ही पत्रं सांगतात. आणि मुलंही लिहितात की, जातीच्या बाहेर बहिणीनं पळून जाऊन लगA केलं तर गावात तोंड दाखवता येत नाही. त्यामुळे तिनं असं काही करूच नये म्हणून धाकात ठेवावं लागतं. लक्षही ठेवावं लागतं. ती कुणाशी बोलते, काय बोलते, कुणाला फोन करते, मैत्रिणी कशा आहेत हे सारं आम्ही पाहतो. असं करू नये हे कळतं पण इलाज नाही. समाजवास्तव असं आहे की, भाऊ म्हणून आपल्या घरात असं काही होणं हेच आम्हाला फार अपमानास्पद वाटतं.
एका मुलानं तर पत्र लिहिलंय की, माझी बहीण पळून गेली. त्या मुलाला माझा विरोध नव्हता. पण आम्हाला गावात राहणं अवघड झालं इतके लोक बोलायचे. म्हणून मी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्त्येचा प्रयत्न केला होता. मलाच सगळे म्हणायचे की, तू बहिणीकडे लक्ष दिलं नाहीस!
अशा विचित्र ख:याखोटय़ा परिस्थितीत अडकलेले भाऊ मग प्रवाहपतीत होत बहिणींवर पहारे लावतात, असं ही पत्रं सांगतात.