फुकटे चोर तुमचं वायफाय ढापताहेत हे कसं ओळखाल?

By admin | Published: August 7, 2014 09:22 PM2014-08-07T21:22:37+5:302014-08-07T21:22:37+5:30

वायफाय चोरीला जातंय?आजकाल किमान शहरात तरी घर तिथे इंटरनेट असं चित्र बघायला मिळतं

How will the free thief conceal your wifi? | फुकटे चोर तुमचं वायफाय ढापताहेत हे कसं ओळखाल?

फुकटे चोर तुमचं वायफाय ढापताहेत हे कसं ओळखाल?

Next
आजकाल किमान शहरात तरी घर तिथे इंटरनेट असं चित्र बघायला मिळतं. कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोन अशा विविध डिव्हाईसेसला इंटरनेटची गरज लागते. प्रत्येक डिव्हाईसेसला स्वतंत्र इंटरनेट कनेक्शन घेण्यापेक्षा संपूर्ण घरच ‘वायफाय’ झोन करावं  असं अनेक तरुण मुलांना वाटतं. घरात एकच इंटरनेट कनेक्शन घ्यायचं आणि वायफाय वापरत घरातील सर्वांनी वेगवेगळ्या डिव्हाईसेसवर करायचा असा हा ट्रेंड. 
उत्साहानं मग घर वायफाय केलं जातं, महिनाभर सर्व ऑल इज वेल चालतं मात्र महिना अखेरीस जेव्हा इंटरनेट युजेसचं बिल हातात पडतं तेव्हा मात्र बिलाची रक्कम  पाहून डोळे पांढरे होतात. घरातील सर्वांनी अगदी काटकसरीनं इंटरनेटचा वापर करूनसुद्धा एवढं बिल कसं आलं,  असा प्रश्न पडतो.  तेवढय़ात मग कोणीतरी सांगतो की, तुमचं वायफाय हॅक झालं असेल. म्हणजे काय तर तुमच्या कुटुंबाव्यतिरिक्त कुणीतरी बाहेरच्या व्यक्तीनं तुमच्या वायफायचा वापर करून मुबलक इंटरनेट वापरले असेल.
म्हणजे भुर्दंड तुम्हाला आणि त्याचा वापर
चकटफू. असं होत असेल तर मग काय करायचं?
 
- अनिल भापकर
 
 
वायफाय नेटवर्क मॉनिटर कसं करायचं?
तुमच्या घरातील वायफाय नेमकं कोण कोण वापरतं हे नेहमी ‘मॉनिटर’ करणं म्हणजेच त्यावर लक्ष ठेवणं आवश्यक असतं. तरच तुमच्या वायफायची होणारी चोरी तुम्ही टाळू शकता. या वायफाय मॉनिटरसाठी फिंग (ऋ्रल्लॅ) नावाचे स्मार्टफोन अँप्लिकेशन तुम्हाला मदत करू शकते. फिंग हे नेटवर्क टूल्स गुगल प्लेवर मोफत उपलब्ध आहे. एकदा का फिंग तुमच्या स्मार्टफोनवर डाउनलोड करून इन्स्टॉल झालं की, सर्वप्रथम वायफाय स्कॅन केल्यानंतर तुमच्या वायफायला कोण कोण कनेक्ट झालं होतं याची यादीच तुम्हाला ते दाखवतं.  तुमच्या  फॅमिली मेंबर्सच्या डिव्हाईसेसव्यतिरिक्त आणखी कोणी तुमचे वायफाय वापरत असेल तर तेही कळतं. तुमच्या फॅमिली  मेंबर्सच्या डिव्हाईसेसला तुम्ही नावं देऊ शकता म्हणजे फिंग जेव्हा तुमचे वायफाय नेटवर्क स्कॅन करील तेव्हा बाहेरचे युर्जस लगेच तुमच्या लक्षात येतील.
 
‘वायफाय’ सांभाळाल कसं? 
आजकाल वायफाय नेवटर्क हॅक करणं तसं फारसं अवघड राहिलेलं नाही. अनेक फुकटे चोर आपल्या परिसरातील वायफाय नेटवर्कचा शोध घेऊन ते वापरत असतात. अशावेळी आपल्या घरातील वायफाय नेटवर्कची सुरक्षा आपणच घेतली पाहिजे. त्यासाठी या काही गोष्टी कायम तपासून पहायला हव्यात.
१) तुमच्या वायफाय नेटवर्कला नाव द्या म्हणजे आयडेण्टिीटीच्या तसंच इतर सुरक्षेच्या दृष्टीनं ते सोपे होईल. 
२) तुमच्या वायफाय नेटवर्कचा पासवर्ड हा नेहमी बदलत राहावा. सुरक्षेच्या दृष्टीनं ते महत्त्वाचंच असतं. 
३) वायफाय राऊटरच्या सेटिग्ंजमधील सुरक्षा यंत्रणेचा म्हणजेच राऊटरमध्ये उपलब्ध फायरवॉलचा वापर करावा. 
४) सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणी घरी नसताना वायफाय राऊटर बंद करावा म्हणजे तुम्ही नसताना त्याचा गैरवापर होणार नाही.

 

Web Title: How will the free thief conceal your wifi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.