तुमची पर्सनॅलिटी कशी आहे? विचारा स्वतःला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 05:39 PM2019-03-26T17:39:44+5:302019-03-26T17:39:59+5:30
इतरांची पर्सनॅलिटी कशी आहे याचा आपण फार विचार करतो मात्र आपलं व्यक्तिमत्व कसं आहे? हे तपासतो का?
समिंदरा हर्डीकर-सावंत
‘पर्सनॅलिटी’ हा फार परवलीचा शब्द. अमूकची डॅशिंग आहे, तमूकची अॅट्राक्टिव्ह आहे, ढमूकची एकदम इम्प्रसिव्ह आहे अशी चर्चा सतत होते. आपण इतरांची ही पर्सनॅलिटी अर्थात व्यक्तिमत्व फार बारकाईनं पाहतो, त्यातलं आपल्याला काय आवडतं हे तपासतो. आपल्याला आवडणार्या माणसांच्या व्यक्तिमत्वातल्या अनेक गोष्टी कॉपी करुन तसं वागण्याचा प्रय} करतो. मात्र आपलं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे, आपण कसे आहोत हे आपण कधी तपासतो का?
आपण काय बोलतो, काय करतो, कुठल्या गोष्टींकडे आकर्षित होतो, या सर्व निर्णयांवर आपलं व्यक्तिमत्त्व आकार घ्यायला लागतं. काही गोष्टी जन्मतर् मिळतात, मात्र व्यक्तिमत्व उत्तम घडवताही येऊ शकतं. आणि त्यापुढं जाऊन आपण कोणतं करिअर निवडतो यावरही आपल्या व्यक्तिमत्वानं प्रभाव पडतो.
आपलं व्यक्तिमत्त्व आणि आपण करत असलेलं काम यात विसंगती असेल तर आपण आपल्या व्यावसायिक जीवनात सतत असमाधानी राहतो. अर्थात, आपल्या आवडीचं करिअर जरी आपण निवडलं, तरी त्याची रेशीम गाठ आपल्याला आपल्या व्यक्तिमत्त्वाबरोबर बांधता आलीच पाहिजे.
मात्र ही सांगड घालायची कशी?
काही साधेसरळ उपाय, काही गोष्टी नियमित केल्या तर आपण आपल्या व्यक्तिमत्वाला योग्य आकार देऊ शकू.
1. सर्वप्रथम आत्मपरीक्षण करा. आपलं व्यक्तिमत्व कसं आहे हा प्रश्न आपणच स्वतर्ला विचारायला हवा. आपल्या मधले महत्त्वाचे गुण कोणते, याची यादी करा. तुम्ही शांत स्वभावाचे आहात की तापट, अबोल आहात की बडबडे, लोकांबरोबर पटकन मिसळता की ओळख व्हायला वेळ लागतो, विचारपूर्वक निर्णय घेता की जे सुचेल ते करुन मोकळे होता?हे असे प्रश्न स्वतर्ला, आपल्या अवतीभोवतीच्या माणसांना विचारा, स्वतर्ला समजून घ्या.
2. स्वतर्ला समजून घेण्याची ही प्रक्रि या अचूक आणि शास्त्नोक्त मार्गानं करायची असेल तर मानसशास्थ तज्ज्ञांची मदत घ्या. विविध व्यक्तिमत्व चाचण्या असतात, त्या करा. तुम्ही ऑनलाइन सर्च केलं तर काही मोफत व्यक्तिमत्व चाचण्याही उपलब्ध आहेत, त्या करुनही स्वतर्विषयी अंदाज घेता येईल.
3. एकदा लक्षात आलं की, हे आपले गुण आहेत. हे दोष. आपला स्वभाव अमूक प्रकारचा आहे आणि ही बलस्थानं आहेत हे लक्षात आलं की, त्याला अनुरुप कामांची करिअर म्हणून निवड करा. तसं झालं तर तुमच्या करिअरला त्याचा उपयोग होईल.
*हे सर्व आकलन करून झाले, की कुठे आणि कसे बदल स्वतर्त करायचे हे ठरवा. स्वतर्त बदल करणं हे सोपं नाही. त्यासाठी विलक्षण चिकाटी, जिद्द, यासह वेळही द्यावा लागतो.
त्यामुळे जितक्या लवकर सुरुवात कराल तितकं आपलं व्यक्तिमत्व उत्तम बनवाल आणि यशस्वी व्हाल!
(लेखिका क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत.)