.आहे मी गावठी!

By Admin | Published: October 16, 2014 07:34 PM2014-10-16T19:34:12+5:302014-10-16T19:34:12+5:30

हे सारं वाचून एक ट्यूब माझ्या डोक्यात पेटलीये ती तुमच्याशी शेअर करायची म्हणून हे पत्र लिहितोय. त्यासाठी आधी माझीच एक आठवण सांगतो.

I am my friend! | .आहे मी गावठी!

.आहे मी गावठी!

googlenewsNext

- अतुल घेवडे

मस्त वाटतं, खरंच सांगतो मस्त वाटतं, दर शुक्रवारी ‘ऑक्सिजन’ वाचून, एकदम एनर्जेटिक !
हे सारं वाचून एक ट्यूब माझ्या डोक्यात पेटलीये ती तुमच्याशी शेअर करायची म्हणून हे पत्र लिहितोय.
त्यासाठी आधी माझीच एक आठवण सांगतो. मी एका ठिकाणी इण्टरव्ह्यूला गेलो होतो. पुण्यात. चकाचक ऑफिस. मी डिप्लोमा इंजिनिअर आहे. आता बीई करतोय. कर्नाटकच्या सीमेला लागून असलेलं माझं गाव. मी पहिल्यांदाच पुण्याला गेलो होतो. त्याआधी पुणं कधी पाहिलंही नव्हतं.
मुलाखतीला गेलो. बसलो. पाहिलं तर अवतीभोवती सगळी हायफाय पोरं. एकदम इंग्रजी बोलणारी. भारीतले कपडे. मला जाम टेन्शन आलं. आमचं मराठीपण कन्नड वळणाचं. हेल काढून बोलतो आम्ही असं लोकं म्हणतात. हसतात आमच्या मराठीलाही. इंग्रजी-हिंदीपण जेमतेम.
मी जरा घाबरलोच होतो. पायात कापरं भरलं होतं.
पण दिली मुलाखत. सिलेक्टही झालो. नोकरीपण मिळाली.
या सगळ्यात माझ्यासोबत होता ऑक्सिजननं दिलेला कॉन्फिडन्स. आपण जसे आहोत तसे आहोत. आपल्याला जे येतं ते ठामपणे मांडायचं. न बिचकता बोलायचं. आणि न घाबरता आहे त्या परिस्थितीचा सामना आपल्या गुणवत्तेच्या जोरावर करायचा.
तेच मी केलं.
यापुढेही करीन.
एक मात्र नक्की,
आता मला कळून चुकलंय की, गावठी कुणी म्हटलं आपल्याला तरी मनाला लावून घ्यायचं नाही.
गावठी असणं यात कमीपणा काही नाही, आपली भाषा नाही तर आपली गुणवत्ता आपलं स्थान ठरवते.


TTMM म्हणजे काय?

TTMM म्हणजे  टेन्शन-टेंगळं-मस्ती- मॅजिक.
म्हणजे काय?
तर तेच जे जे तुमच्या मनात, जगण्यात, बोलण्यात, कट्टय़ावर धुमाकूळ घालतं, ते ते सारंच!
म्हणजे तेच सारं, जे तुमच्या डोक्यात वळवळलं, तुम्हाला छळायला लागलं की वाटतं, लिहावं, आणि पाठवून द्यावं ‘ऑक्सिजन’कडे!
मग वाट कसली पाहता.?
लिहा बिंधास्त.
आणि पाठवून द्या ‘ऑक्सिजन’कडे.
आम्ही वाट पाहू.
आणि तुम्ही लिहिलेलं एकदम ‘कडक’ असेल तर ते तुम्हाला या पानावर नक्की वाचायला मिळेल.
पत्ता?
ऑक्सिजन, लोकमत भवन, बी-३, एमआयडीसी अंबड, नाशिक, ४२२0१0

Web Title: I am my friend!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.