I am Special....भेट की स्वत:लाच या दिवाळीत, मार एक घट्ट मिठी आणि सांग, आय अॅम स्पेशल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 06:00 AM2017-10-19T06:00:00+5:302017-10-19T06:00:00+5:30
भेट की स्वत:लाच या दिवाळीत, मार एक घट्ट मिठी आणि सांग, आय अॅम स्पेशल! व्हेरी स्पेशल!!
आय अॅम स्पेशल,
बीकॉज आय अॅम बॉर्न..
- हे वाक्य वाचलंत?
काय सांगतं ते आपल्याला?
ते म्हणतं,
आपण स्पेशल आहोत !
आपण म्हणजे?
‘मी’!
माझ्यातला ‘मी’!
मी स्पेशल आहे.
कारण मी जन्माला आलोय..
मी जगतोय, श्वास घेतोय..
माझ्यासारखा कुणीच नाही
या पृथ्वीतलावर..
मी फक्त माझ्यासारखा दिसतो..
माझ्यासारखाच हसतो.
जे माझ्याकडे आहे,
ते माझ्याचकडे आहे,
इतरांकडे काय आहे,
माझ्यापेक्षा काय वेगळं आहे,
जे माझ्याकडे आहे
ते त्यांच्याकडे आहे की नाही
हे पाहत
मी तुलना करत बसणार नाही!
उगीचच कुढणार नाही.
स्वत:वरच चिडणार नाही.
जेव्हा जेव्हा स्वत:चा राग येईल,
संताप होईल,
तेव्हा तेव्हा मी स्वत:ला
हेच सांगेन..
आय अॅम स्पेशल,
बीकॉज आय अॅम बॉर्न !
सतत दुसºयाच्या फुटपट्टीवर
मी नाहीच मोजणार स्वत:ला..
लाल रंगाची पिवळ्या रंगाशी
तुलना नाही ना होऊ शकत..
प्रत्येक रंग वेगळा.
प्रत्येक रंग स्पेशल.
प्रत्येकजण महत्त्वाचा !
तसा मीही महत्त्वाचा!
कारण मी जगतोय,
श्वास घेतोय..
मी आहे तसा मला स्वीकारतोय..
आणि सांगतोय स्वत:ला की
अरे, रोजचा दिवस तुझा आहे,
रोज डोक्यावर चमचमणारं
आकाश तुझं आहे,
काय रूसतो स्वत:वर?
काय दया करतोय स्वत:वर?
कोण म्हणतं तू लाचार आहे,
गरीबबिच्चारा आहेस,
हवी कशाला तुला कुणाची सहानुभूती?
कुणाचं सर्टिफिकीट?
त्यापेक्षा ऊठ की झडझडून,
सांग स्वत:ला की,
मी स्पेशल आहे.
ठरवलं तर जे हवं ते मी मिळवीन,
जे ठरवलं ते करीन..
मुख्य म्हणजे आनंदी राहीन,
मन म्हणेल तसं जगून पाहीन,
कधी चुकलाच रस्ता,
पडलोच खड्ड्यात
तर कान धरून माफी मागत
ओढून आणीन स्वत:लाच
योग्य रस्त्यावर
चार फटके देईल स्वत:लाच
आईच्या मायेनं..
आणि परत स्वत:तच जीव गुंतवत
नव्या प्रवासाला लागेल
- जमेल हे मला?
जमेल!
- नक्की जमेल!
कारण मित्रा,
तू स्पेशल आहेस..
खास आहेस..
भेट की स्वत:लाच
या दिवाळीत
मार एक घट्ट मिठी
आणि सांग,
आय अॅम स्पेशल !
व्हेरी स्पेशल!!