मान जा ऐ खुदा, मै जादा नहीं मांगता.

By admin | Published: October 23, 2014 03:33 PM2014-10-23T15:33:29+5:302014-10-23T15:33:29+5:30

येस बॉस नावाचा शाहरुख खानचा सिनेमा खूप वर्षापूर्वी आला होता.

I do not ask, I do not ask for more. | मान जा ऐ खुदा, मै जादा नहीं मांगता.

मान जा ऐ खुदा, मै जादा नहीं मांगता.

Next
येस बॉस नावाचा शाहरुख खानचा सिनेमा खूप वर्षापूर्वी आला होता.
टीव्हीवर लागतो येताजाता, मला नेहमी वाटतं त्या सिनेमातला ‘राहुल’ आहे ना, तोच आहे मी.
त्याच्यासारखीच माझी मोठमोठी स्वपAं आहेत.
मला हवाय गाडी-बंगला-पैसा-देखणी बायको-यश-मान-सन्मान.आणि ताकद म्हणजेच पॉवर.
राहुल म्हणतो ना ते गाणं,
ते माझंच तर गाणं आहे.
‘चांद तारे तोड लाऊं, 
सारी दुनिया पर मै छाऊ, 
बस इतनासा ख्वाब है.
हे अगदी असंच, अगदी डिट्टो असंच वाटतं मला.
आणि राहुल जसं देवाला सांगतो ना, 
तसंच म्हणतो मीही नेहमी की,
 मान जा ए खुदा, इतनीसी है दुवा, 
मै जादा नहीं मांगता.
नाही खरंच फार काय मागणं नाही माझं.
हवंय तरी काय मला.
सारी दौलत, सारी ताकद,
सारी दुनिया पर हुकूमत
एवढंच तर हवंय मला !
आणि कोण म्हणतं मला ही मोठी स्वपAं पाहण्याचा अधिकार नाही? का नाही पहायची मी मोठी स्वपA?
जो तो मला येताजाता सांगतो की, अमक्याची गोष्ट वाच, तो बघ, किती सामान्य होता, बघ आज कुठं जाऊन पोहचला.
बघ त्याच्याकडे किती यश आहे, बघ त्याचं कर्तृत्व.
हे जर त्याला जमतं, तर तुला का नाही.?
सतत माङया मनावर बिंबवलं जातंच ना की, तू सामान्य म्हणून जन्माला आलास पण सामान्य म्हणून मरू नकोस.
आणि नाहीच मरायचं मला सामान्य म्हणून.
अवतीभोवतीची जी माणसं आहेत, त्यांना जर मोठं होण्याचा हक्क आहे तर मलाही आहे.
आज त्यांची यशाची ‘स्टोरी’ आहे, उद्या माङयाही यशाची अशीच एखादी स्टोरी लोकांनी वाचावी, ऐकावी, कौतुकानं शेअर करावी असं मलाही वाटतं.
अगदी साधं उदाहरण पहा अवतीभोवतीच्या यशोगाथा आम्ही वर्तमानपत्रत वाचतो.
आपल्या देशातल्या लोकशाहीची ताकद पहा, एकेकाळी चहा विकणारा, कष्टकरी घरातला एक तरुण केवळ आपली गुणवत्ता, मेहनत यांच्या जोरावर आपल्या देशाचा पंतप्रधान होतो,
कुणी एक दिल्लीतल्या मध्यमवर्गीय घरातला मुलगा सिनेमात काम करायचं म्हणून मुंबई गाठतो, इथं केवळ स्वत:चं स्थानच निर्माण करत नाही तर बॉलिवूडचा बेताज बादशहा बनतो, अमाप संपत्ती जमवतो. इतका पैसा कमवतो की, त्याचं ते यश पाहून लोकांचे डोळे पांढरे व्हावेत.
हे असं ‘अॅस्पायरिंग’ वातावरण आहे माङया अवतीभोवती.
हे वातावरण मला गप्पा बसू देत नाही, या वातावरणानं माङयाही शिडात हवा भरली जाते.
मलाही पडतात स्वपAं, मोठं होण्याची, फेमस होण्याची !
 
******
पण.??
हे इतकं सोपंय का हो?
स्वपA पहा, स्वपA पहा, मोठं व्हा, पुढं सरका, लढा, जिंका हे असं सांगणं सोपंय.
पण त्या स्वपAांची किंमत मोजावी लागते हे कोण सांगतं का?
आपली स्वपAं फार मोठी आणि आपल्या पायातल्या बेडय़ा त्याहून मोठय़ा, दोन्हीपैकी काहीतरी एक नक्की तुटणार हे आपल्याला कळतं पण वळत नाही.
उडावंसं वाटतं पण ङोप घेववत नाही,
अशावेळी काय करायचं असतं हे मला कुणी सांगेल का?
माझी स्वपA आणि वास्तव,
माङयाच मर्यादा, आणि त्या मर्यादांमुळे येणारं खुजेपण यामुळं माझी तडतड होते.
खूप तगमग होते हे मी कुणाला सांगू.?
 
******
अर्थात का सांगावं मी हे सारं कुणाला?
कारण वाट कितीही कठीण असली आणि माझी स्वपAं कितीही अवास्तव आणि अशक्य वाटत असली तरी ती माझी आहेत.!
हो, माझी स्वपAं खरंच फक्त माझी आहेत!
आणि ती मला जानसे प्यारी आहेत.
कबूल आहे मला माझी ही तडतड.
कबूल आहे माझं हे धावणं,
पण नामंजूर आहे, आहे त्यात समाधान मानून
मोचूळ कोमट आयुष्य जगणं!!
आय वॉण्ट टू मेक इट लार्ज.
रिअली बिग!
अॅण्ड व्हॉटएव्हर इट कॉस्ट, आय विल नॉट गिव्ह अप !
 
******
मला अवतीभोवती एवढय़ा संधी दिसत आहेत,
मला दिसतंय की, थोडे प्रय} आणि काही पावलं मी पुढे सरकेन.
मला नको आहेत कुणाचे उपकार आणि सहानुभूतीच्या सबसिडय़ा,
मला माझी लढाई स्वत: लढून 
स्वत:च जिंकायची आहे.
आणि म्हणून म्हणतो,
मला माझी स्वपAं जान से प्यारी आहेत.
अमिताभ बच्चन म्हणतात ना कवितेत,
अगदी ते आणि तेच सांगतो मी स्वत:ला.
तू न रुकेगा कभी,
तू न  थमेगा कभी,
कर शपथ, कर शपथ.
अग्निपथ, अगिAपथ, अगिAपथ

 

Web Title: I do not ask, I do not ask for more.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.