माझ्याकडे डिग्री नाही, पण ज्ञान आहे. कसं वाटू?
By admin | Published: April 12, 2017 06:54 PM2017-04-12T18:54:08+5:302017-04-12T18:54:08+5:30
करिअरच्या संदर्भात अनेक तरुण आम्हाला अनेक प्रश्न विचारतात. एकदा एक विद्यार्थी आमच्याकडे आला. मनोज त्याचं नाव. त्याचा प्रश्न अतिशय वेगळा आणि महत्त्वाचा होता.
- पूर्वी दवे
(दिशा कौन्सेलिंग सेंटर)
करिअरच्या संदर्भात अनेक तरुण आम्हाला अनेक प्रश्न विचारतात. एकदा एक विद्यार्थी आमच्याकडे आला. मनोज त्याचं नाव. त्याचा प्रश्न अतिशय वेगळा आणि महत्त्वाचा होता.
त्याचं म्हणणं होतं, मुंबई विद्यापीठातून मी बीकॉमच्या पदवीचं शिक्षण घेतो आहे. मला शिक्षक बनायचं आहे. गणित विषय मला अतिशय आवडतो. त्यात मला चांगली गती आहे आणि हा विषय मी मुलांना उत्तम शिकवूदेखील शिकतो. हा विषय मी शाळेतल्या मुलांना शिकवतोही आहे, पण त्या विषयाची डिग्री माझ्याकडे नाही. हा विषय विद्यार्थ्यांना मला शिकवायचा तर आहे. मी काय करू?
त्याचं म्हणणं अगदी बरोबर होतं आणि आहे, पण कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये शिकवायचं तर त्यासाठी अधिकृत पदवी घेतलेली केव्हाही चांगलं. कारण त्यानंतर त्यात तुम्हाला प्रगतीचीही संधी असते.
आता मनोजच्या संदर्भात त्यानं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्याला बीएडची पदवी घेता येईल. बीएड केल्यानंतर शाळेतल्या मुलांना शिकवण्याची अधिकृत पात्रता त्याला मिळते. बीएडसाठी अगोदर बीएडची सीईटी द्यावी लागेल. बीएड हा सध्या दोन वर्षांचा फूलटाईम कोर्स आहे. उमेदवारानं मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले हवेत. त्यानंतर तो बीएडसाठी पात्र ठरू शकतो.