सुंदर मी होणार!

By admin | Published: June 22, 2016 01:53 PM2016-06-22T13:53:38+5:302016-06-22T13:53:38+5:30

नायक नायिका जसे सुंदर दिसतात, तसेच आपणही सुंदर दिसावे, असे प्रत्येकाला वाटत असते. आणि मग त्यासाठी तासनतास वेळ दळवतात तो मेकअपमध्ये.

I will be beautiful! | सुंदर मी होणार!

सुंदर मी होणार!

Next
>- रवींद्र मोरे
सुंदर दिसणे कोणाला आवडणार नाही. आज प्रत्येक तरुण-तरुणी ग्लॅमरस जगतातील नायक-नायिकांसारखे दिसण्यासाठी ते वापरत असलेले सौंदर्य प्रसाधने, त्यांनी परिधान केलेले कपडे, त्यांची राहणीमान, केसांची ठेवण, दागदागिने आदी बाबींचे अनुकरण करताना दिसत आहेत. ते जसे सुंदर दिसतात, तसेच आपणही सुंदर दिसावे, असे प्रत्येकाला वाटत असते. आणि मग त्यासाठी तासनतास वेळ दळवतात तो मेकअपमध्ये. 
मग खरे सौंर्द्य म्हणजे काय? सुंदर दिसण्यासाठी मेकअप किती महत्त्वाचा आहे, त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊ... 
खरे सौंदर्य हे चेहऱ्यावर किंवा शरीरावर नसून मनात आहे, असे आपण कितीही म्हणत असलो, तरी एखादी सुंदर मुलगी किंवा सुंदर मुलगा बाजूने जरी गेला, आणि आपल्या मनात चलविचल होणार नाही, हे नवलच. आपण काम करीत असलेल्या ठिकाणी किंवा कार्यालयात एखादी सुंदर मुलगी असेल तर काम करण्याची गती तर वाढतेच शिवाय दिवस कसा उल्हासित गेल्यासारखा वाटतो. आणि विशेषत : मनात प्रसन्नता कायम राहते. म्हणून आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटत असते. आणि तेही इतरांचे मन प्रसन्न करण्यासाठी. विशेष म्हणजे पुरूषांपेक्षा स्त्रिया मात्र आपले सौंदर्य टिक विण्यासाठी किंवा सुंदर दिसण्यासाठी अधिक भर देत असतात. एखादी पार्टी, संमेलन, विवाह सोहळा आदी कार्यक्रमात महिलावर्ग तर सौंदर्याने नटलेल्याच दिसतात. आणि त्या सुंदर दिसणारच, कारण त्यांना सौंदर्याची देणगीच मिळालेली असते. 
मात्र एका निरीक्षणातून असे आढळून आले आहे की, धावपळीच्या जगण्यात महिलांना मेकअपसाठी हवा तसा वेळ देता येत नाही. त्यामुळे काही संशोधनातून मेकअपसाठी साध्यासोप्या ट्रिक्स समोर आल्या आहेत. 
 
अशी घ्या चेहऱ्याची काळजी : 
* चेहऱ्यावर डाग वांगाचे ठिपके, काळी वर्तळे, उठवून दिसणाऱ्या शिरा, पुटकुळ्या, जन्मखुणा हे सर्व लपविण्यासाठी बाजारात अनेक सौंदर्य प्रसाधने उपलब्ध आहेत. त्यात सहज आणि सोप्या पद्धतीने वापरले जाणारे कन्सीलरमुळे चेहऱ्याची त्वचा नितळ दिसू लागते. कन्सीलर हे फाउंडेशन पेक्षा घट असते. ते क्रिमी लिक्विड, स्टिक आणि क्रीम या स्वरूपात मॅट फिनीशमध्ये मिळते. आपण रोज सुंदर दिसण्यासाठी वापरत असलेले फाउंडेशन आणि कन्सीलरचा योग्य वापर केल्यास चेहऱ्यावरील दोष लपविले जाऊ शकतात. 
 
चेहरा टवटवीत दिसण्यासाठी काही टिप्स :
आपला चेहरा दिवसभर टवटवीत राहावा, नेहमी तजेलदार दिसावा असे सर्वांनाच वाटत असते. मात्र त्यासाठी नेमकी कोणती युक्ती वापरावी हे बऱ्याच जणींना माहित नसते. 
* चेहरा नेहमी तजेलदार दिसावा यासाठी भरपूर प्रमाणात फलाहार घ्यावा. 
* जेवणातही फळभाज्यांचे प्रमाण जास्त असावे.
* रासायनिक द्रव्ये असलेली पेये, म्हणजेच कोल्डड्रींक्स, फास्ट फूटचे सेवन टाळावे.
* धुम्रपान, मद्यसेवन टाळावे.
* उन्हात घराबाहेर पडताना चेहरा स्कार्फ ने झाकावा, परसट हॅट, फुल बाह्यांचा
शर्ट, सनकोट इ.चा वापर करावा. 
* योग्य सनस्क्रीनचा वापर करावा. 
* वारंवार कपाळावर आठ्याकाढणे, राग व्यक्त करणे, यामुळे सुद्धा कपाळावर घड्या पडून व्यक्ती वृद्ध दिसू लागतो. म्हणून ह्या सवयी टाळाव्यात.  
* चेहरा टवटवीत ठेवण्यासाठी स्वच्छ पाण्याने धुवावा. 
* प्राणायाम, विशेषत:चेहऱ्याच्या व्यायामाच्या विशिष्ट प्रकारांचा वापर केल्यास निश्चितच फायदा होतो.

Web Title: I will be beautiful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.