केळी मी खाईन सालं तुम्ही उचला!
By admin | Published: December 11, 2015 02:10 PM2015-12-11T14:10:49+5:302015-12-11T14:10:49+5:30
आपला कचरा दुस:यानं साफ करावं, हे वाटणंच अनैतिक आहे, असं सांगणारा एक दोस्त.
Next
>मी औरंगाबादच्या एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजमधे असिस्टण्ट प्रोफेसर आहे.
शहरापासून तसा बराच बाहेर, लांब राहतो.
ज्या भागात माझं घर, त्या भागात कचरा नेण्याची काही व्यवस्था मी राहायला आलो तेव्हा नव्हती. मनपाची घंटागाडीही येत नसे. मग परिसरातले इतर लोकही जिथं जागा मोकळी असेल तिथं कचरा नेऊन टाकत. मीही प्लॅस्टिकच्या पिशवीत कचरा भरून त्याच कच:याच्या ढिगा:यात कचरा नेऊन टाकायचो.
पण हे करताना मला स्वत:लाच फार लाज वाटायची. खूप त्रस व्हायचा, की आपण असा बाहेर कचरा कसा फेकतो? मग त्यावर उपायही मी शोधायला लागलो. कच:यापासून खत कसं बनवायचं याचा अभ्यास करू लागलो. ओला कचरा, सुका कचरा याची वर्गवारी कशी करतात याचा विचार सुरू झाला. इंटरनेटवर गेलो, तिथं सर्च केलं. त्यातून काही उपाय केले. मग प्लॅस्टिकच्या बादल्या आणल्या, त्याला छिद्रं पाडली. पण तो प्रयोग फसला. मग मडके आणले, त्यातही कचरा घातला, पण त्याला छिद्र न केल्यानं काही प्रॉब्लेम झाले. अळ्या होणं, वास येणं असे प्रश्न निर्माण झालेच.
तरी मी प्रयोग करत होतोच. मायक्रोबॅक्टेरिया कल्चर होण्यासाठी निम पावडर, हळद वापरून पाहिले.
दरम्यान, मी या विषयाच्या मागेच लागलो. एक सिव्हिक रिस्पॉन्स टीम नावाच्या एनजीओशी बोललो. काही सव्र्हे केले त्यांच्यासोबत आणि मनपाशीही बोललो.
या सा:यात माङया एक गोष्ट लक्षात आली की, आपण करत असलेल्या कच:याची जबाबदारी आपण स्वत: घेतल्याशिवाय काही पर्याय नाही. कितीही प्रयत्न केले तरी एकटी महानगरपालिका शहरातल्या सर्व कच:याची जबाबदारी नाही घेऊ शकत. एकटय़ा औरंगाबाद शहरात रोज 5क्क् टन कचरा तयार होतो. आणि मुळात तुमचा कचरा रोज कुणीतरी साफ करणं, कुणीतरी तुमचं खरकटं कुठंतरी नेऊन टाकणं हेच रिअॅलिस्टिक तर नाहीचे पण अनैतिकही आहे असं मला वाटतं!
आपलं घर, आपला परिसर आणि शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. आपण केलेल्या कच:याची जबाबदारी आपण दुस:यावर कशी काय ढकलू शकतो? म्हणजे केळी आपण खायची आणि त्या केळीची सालं घराबाहेर टाकायची आणि त्या सालाची जबाबदारी मनपानं उचलावी, त्याची विल्हेवाट लावावी हे म्हणणंच किती चूक आहे?
असा ऑरगॅनिक कचराच आपल्या घरात जास्त तयार होतो. त्यात 5क् टक्के पाणीच असतं. म्हणजे हा एवढा जड कचरा आपण पेट्रोल जाळून, मनुष्यबळ वापरून लांब कुठंतरी नेऊन टाकतो.
त्याची विल्ेवाट लावली जाते किंवा थोडय़ा ठिकाणी व्यवस्थापनाचा विचार केला जातो.
कच:याचं हे व्यवस्थापन आपण घरच्या घरी करू शकतो.
जेवढा कचरा आपल्या लेव्हलला जिरवणं शक्य आहे, तेवढा आपण जिरवायला हवा. प्लास्टिक, बायोमेडिकल वेस्ट यांसारख्या गोष्टी अपवाद! ते घराबाहेर जाऊ शकेल, पण घरात जो कचरा विघटन होऊ शकेल तो आपण करणं, ही आपली जबाबादारी आहेच. कच:याच्या प्रश्नावर आपण आपल्या पातळीवरच उत्तर शोधणं ही आता गरज आहे, असं मला वाटतं!
आणि तसंच एक उत्तर मी शोधलं.
तीन माठ घेऊन त्यांना छिद्र पाडून मी स्वत: एक खत तयार करणारं मॉडेल तयार केलं. तेही असं की, जे छोटय़ा घरात वापरता येईल. मी स्वत: वनबीचके प्लॅटमधे राहतो, त्यामुळे अशा छोटय़ा घरात राहणा:यांसाठी हे मॉडेल असावं असा मी विचार करत होतो. त्यामुळे हे तीन माठांचं मॉडेल बाल्कनीत ठेवता येतं. त्याला दिवसाकाठी तासभर तरी ऊन मिळावं, हवा खेळती राहावी बाकी काय. मातीचे मडके असल्याने त्याला तुम्ही गेरूचा रंग देऊ शकता किंवा डिझाइन काढून डेकोरेटही करू शकता. ते इतकं देखणं दिसतं की, ते कच:याचं युनिट आहे, हे कुणाला कळणारही नाही!
- त्रिशूल कुलकर्णी
trishulkulkarni@gmail.com