ऐन थंडीत आइस्क्रीम

By admin | Published: December 11, 2015 02:05 PM2015-12-11T14:05:50+5:302015-12-11T14:05:50+5:30

त्याला बावळटपणा कसा म्हणता येईल?

An ice-cold ice cream | ऐन थंडीत आइस्क्रीम

ऐन थंडीत आइस्क्रीम

Next
>दरवर्षी अशी वाजतगाजत ती येते.
आणि मग ‘तिच्या’ येण्यावरून आमचं दोघांचं हमखास ‘वाजतंच’!
माझं तिच्यावरचं प्रेम, तिच्या येण्यानं माङया मनाला येणारं उधाण हे सारं ‘त्याला’ कळत नाही.
आणि त्याचा तो अतिच प्रॅक्टिकल अॅप्रोच मला समजत नाही.
तो म्हणतो, मान्य करून टाक ना, की तुझा असला बावळट रोमॅण्टिसिझम हा तद्दन फिल्मी आहे, आणि वाढत्या वयाबरोबर तो कमीच होईल!
मी म्हणते, असं कसं, काय सांगावं, तो वाढेलही, माङया म्हातारपणीही या रोमॅण्टिसिझममुळेच मला एकदम तरुण वाटेल. आणि या सगळ्या (आत्ता तुला बावळट वाटणा:या) आठवणीच उद्या आपल्या नात्यातली बहार कायम ठेवतील.
- असे किती वाद!
पण शेवटी ना तो ऐकतो, ना मी ऐकते!
दर हिवाळ्यात हीच कथा, माझी आणि त्याची.
आणि माङया-त्याच्यासारख्या अनेकांची!
हिवाळ्यात मला वाटतं, मस्त संध्याकाळी आइस्क्रीम खायला जावं, रात्री उशिरानं कोल्डड्रिंक प्यावं, ऐन थंडीत कोल्ड कॉफी प्यावी.
रात्री बाइकवरून लॉँग ड्राइव्हला जावं.
पण हे ‘असलं’ काही त्याला बावळट वाटतं. त्याला होणा:या सर्दीची काळजी. तो म्हणतो, या सा:या बावळट फिल्मी कल्पनांना तू रोमॅण्टिक म्हणते तेच मला मान्य नाही.
त्याचं लॉजिक सिंपल, निसर्गाच्या विरोधात जाऊन काही करायचं नाही. आइस्क्रीम उन्हाळ्यात, हिवाळ्यात फार तर गरमागरम चहा!
त्यावरून जे ‘वाजतं’ ना, वाजणा:या थंडीपेक्षा जास्त जोरात असतं!
पण हीच तर मजा आहे, वर्षातून येणा:या या थंडीची. तिच्या उबदार प्रेमाची आणि गोधडीत लपेटून, तोंडावर पांघरुण गुरगुटून मस्त उशिरार्पयत मारलेल्या गप्पांची!
हे सारं कॉलेजच्या काळातच होतं किंवा प्रेमात पडल्यावर!
त्यापूर्वी काही कौतुक नसतं या थंडीचं. पण ते वाढतं आयुष्यात प्रेम वाजतगाजत आल्यावर आणि त्या प्रेमापुढे लॉजिक हरवून बसल्यावर!
म्हणून तर यंदाच्या थंडीतही आमची अशी भांडणं होणार हे मी मनाशी ठरवून टाकलं आहे. पण त्या भांडणालाही काळजीची ऊब आहे.
म्हणून वाटतं, थंडीला म्हणावं, बाई गं ये, आणि राहा जरा आल्यासारखी!
म्हणजे तुङया सोबतीनं पानगळतीच्या या मौसमातही मनाला नवा बहर येईल.
 
- अंकिता पाटील, पुणो

Web Title: An ice-cold ice cream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.