मोबाइल/ सोशल मीडिया पाऊल घसरलं तर.

By Admin | Published: August 27, 2015 06:30 PM2015-08-27T18:30:49+5:302015-08-27T18:30:49+5:30

घरात शिरलेल्या एका नव्या तंत्रज्ञानामुळे बिघडतोय नात्याचा पोत. या सा:या चर्चेत एक स्पष्ट दिसतं की, एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय याचा अंदाज पूर्वी एकाच घरात राहणा:या बहीण-भावांना यायचा

If mobile / social media footprint goes down. | मोबाइल/ सोशल मीडिया पाऊल घसरलं तर.

मोबाइल/ सोशल मीडिया पाऊल घसरलं तर.

googlenewsNext

घरात शिरलेल्या एका नव्या तंत्रज्ञानामुळे बिघडतोय नात्याचा पोत.

या सा:या चर्चेत एक स्पष्ट दिसतं की, एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय याचा अंदाज पूर्वी एकाच घरात राहणा:या बहीण-भावांना यायचा. फार लपवालपवी नव्हती. आता तसं नाही. कारण सोशल मीडिया आणि मोबाइल.
ज्या बहिणीला आपण एखादा प्रश्न विचारला तर ती चिडते, थातुरमातुर उत्तरं देते. तीच बहीण फोनवर कुणाशी चॅट करते, तासन्तास कुणाशी बोलते हे भावांना कळत नाही.
त्यात अनेक भावांनी अशी भीती व्यक्त केली की, आम्हाला दिसतंय ना, की ऑनलाइन कसे गळ लावले जातात, काय काय व्हायरल होतं, चॅटचं कसं गॉसिपिंग होतं, कसली गलिच्छ चर्चा होते फोटोंवर!
म्हणून मग वाटतं की, आपल्या बहिणीनं या सा:यापासून दूर राहावं. सोशल मीडियावर वावरू नये असं नाही, पण तारतम्य ठेवावं. अनोळखी लोकांपासून सावध राहावं.
पण हे सारं बहिणींना सांगायला गेलं की त्यांचं भांडणच होतं. मग वाद होतो. बहिणींचं म्हणणं की, आम्हाला कळत नाही का?
ुमुद्दा छोटा असला तरी घरोघर हे भांडण आता पेटलंय. आणि त्यात आईवडील काहीच रोल घेऊ शकत नाहीत, हा मुद्दा आहे.
खेडेगावात तर अनेक मुलांनी लिहिलंय की, तासन्तास बसमधे किंवा बसस्टॉपवर मुलगी बोलताना दिसली तरी समाजात बदनामी होते. लगA ठरणं अवघड होतं.
भाऊ म्हणतात, स्पेसबिस प्रकरण कळतं. पण आपल्या बहिणीला वेळेत सावध करणं, भयाण गोष्टींपासून लांब ठेवणं हे आमचं कर्तव्यच आहे.
भयंकर इनसिक्युअर वाटतं या ऑनलाइन जगात, काय काय वाचायला मिळतं. मग जरा सावध राहा असं म्हणणं हे चूक कसं?
भावांचा प्रश्न वेगळा आणि मुलींचं स्वातंत्र्य वेगळं. एक नवाच अडकित्ता तयार होतोय!मोबाइल/ सोशल मीडिया
पाऊल घसरलं तर.

भावांचा प्रश्न वेगळा आणि मुलींचं स्वातंत्र्य वेगळं. एक नवाच अडकित्ता तयार होतोय!

Web Title: If mobile / social media footprint goes down.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.