येत्या वर्षात तुमचं करिअर ‘बूस्ट’ करायचं असेल, तर ‘मस्ट’ अशी कोणती SKILLS आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 08:00 AM2020-01-16T08:00:00+5:302020-01-16T08:00:02+5:30

तरुण हातांना काम नाही आणि आज हातात जे काम आहे ते उद्या टिकेलच याची कोणतीही शाश्वती नाही. अशा वातावरणात आहे तो जॉब टिकवणं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यशस्वी करिअर करणं हे एक आव्हान असू शकतं. नव्हे ते आहेच! पण मग ते आव्हान स्वीकारायचं तर आपल्याकडे काही खास कौशल्यं हवीत? तेच  सांगणारा  ऑक्सिजनचा  विशेष  अंक ! 

If you want to 'boost' your career next year, must learn these SKILLS ! | येत्या वर्षात तुमचं करिअर ‘बूस्ट’ करायचं असेल, तर ‘मस्ट’ अशी कोणती SKILLS आहेत?

येत्या वर्षात तुमचं करिअर ‘बूस्ट’ करायचं असेल, तर ‘मस्ट’ अशी कोणती SKILLS आहेत?

Next
ठळक मुद्देआपण नुस्ती ढोर मेहनत करतो याला अर्थ नाही तर मेहनतीसह उत्तम संपर्क, उत्तम टीम स्पीरीटही महत्वाचं ठरेल.

- ऑक्सिजन टीम

2020 उजाडलं. जगभर चर्चा अशी की, मंदी आहे.
आहे त्याच हातांचं काम जाईल, नवे रोजगार निर्माण होत नाहीत. कामाचं स्वरूप बदलतं आहे.
ऑटोमेशन इतक्या मोठय़ा प्रमाणात होत आहे की, त्यामुळे माणसांची कामं मशीन करतील आणि माणसांच्या हातचं काम जाईल.
-आधीच तरुण हातांना काम नाही आणि आज हातात जे काम आहे ते उद्या टिकेलच याची कोणतीही शाश्वती नाही.
अशा वातावरणात आहे तो जॉब टिकवणं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यशस्वी करिअर करणं हे एक आव्हान असू शकतं. नव्हे ते आहेच!
पण मग ते आव्हान स्वीकारायचं तर आपल्याकडे काही खास कौशल्यं हवीत.
ती कौशल्य असतील तर त्यांना धार काढायला हवी, नसतील तर शिकून घ्यायला हवीत.
- तर अशी कौशल्यं कोणती?
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संस्थेनं ‘फ्यूचर ऑफ वर्क स्कील्स फॉर 2020’ हा अहवाल खरंतर 2016 मध्ये  प्रसिद्ध केला होता. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार तेव्हाच त्यांनी जगभरातल्या बदलत्या वर्ककल्चरसाठी 10 मुख्य सूत्रं ‘की स्किल्स’ अधोरेखित केली होती. आणि 2020 उजाडतानाच ती हाताशी असली म्हणजे यंदाच नाही तर भविष्यातही करिअरच्या वाटेवर जाणारी गाडी सुसाट पुढे काढता येऊ शकेल.
केवळ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच नव्हे तर व्यावसायिक नेटवर्किगमध्ये आघाडीवर असलेल्या लिंक्डीन या सोशल मीडिया साइटनेही आपल्याकडे येणार्‍या जॉब्ज आणि सीव्हींचा अभ्यास करून 2020 साठी 5 प्रमुख कौशल्यं सांगितली आहेत.
लिंक्डीनच्या यादीनुसार येत्या वर्षात क्रिएटिव्हिटी हे सगळ्यात मोठं सॉफ्ट स्किल ठरणार आहे. याशिवाय एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा, परस्पर सहकार्य, अ‍ॅडप्टिबिलिटी-जुळवून घेण्याची क्षमता, भावनिक बुद्धिमत्ता
ही पाच महत्त्वाची सॉफ्ट स्किल्स ठळकपणे यशस्वी होताना दिसत आहेत.
**
विशेष म्हणजे अगदी अलिकडच्या काळार्पयत स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स असा भेद सरसकट केला जायचा. तो आजही आहे. मात्र हातातलं महत्वाचं कौशल्य, त्यासाठीची बुध्दीमत्ता यांचीच चर्चा व्हायची. 
आता म्हणता म्हणता काळ इतका बदलला की, करिअरमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर एकवेळ आयक्यू म्हणजे इंटिलिजण्ट कोशण्ट कमी असेल तर चालेल पण इक्यू म्हणजेच भावनांक-इमोशनल कोशंट महत्वाचा ठरु लागला आहे.
ज्यांना करिअरमध्ये उंच भरारी घ्यायची, जी महत्वाकांक्षी माणसं आहेत, ते केवळ बेकंबे करत आपल्याला जे येतं त्याच्याच पाटय़ा टाकत बसत नाहीत. तेच ते काम करण्याला आणि मला एकच काम येतं, तेच मी तसंच जुन्या पद्धतीनं करत राहीन असं म्हणण्याला नवीन काळात काहीही स्थान उरलेलं नाही.
मुळात काळच असा की एकाच ऑफिसात बसून एकाच प्रकारची माणसं एकत्र काम करतील अशी शक्यताही आता उरलेली नाही. वेगवेगळ्या ठिकाणी राहून, डिजीटल माध्यमाद्वारे आता कामं केली जातात.
आणि ते सारं निभावून न्यायचं तर कामासोबतच आता परस्परांशी जमवून घेण्याच्या कौशल्यापासून नवीन काही शिकण्यार्पयत आणि जुनं विसरुन नवा अ‍ॅटिटय़ूड स्वीकारण्यार्पयत अनेक गोष्टी शिकाव्या लागतील.
जो सतत नवीन गोष्टी शिकत राहील त्याला नव्या काळात अधिक संधी आहे.
आपण नुस्ती ढोर मेहनत करतो याला अर्थ नाही तर मेहनतीसह उत्तम संपर्क, उत्तम टीम स्पीरीटही महत्वाचं ठरेल.
या नव्या स्पर्धेच्या काळात हे सारं आपल्याला जमायला हवं, शिकायला हवं.
त्यासह अजून काही गोष्टीही ध्यानात ठेवायला हव्यात ते म्हणजे आपण सतत स्वतर्‍कडे लक्ष देऊन स्वतर्‍वर काम करत राहणं.
ते करायचं तर काय करायचं?
ही नवी कौशल्यं नेमकी कोणती? ती का महत्त्वाची आहेत?
ही कौशल्यं आत्मसात करायची तर काय करावं लागेल,  हे सांगणारा हा विशेष अंक..

*********************

नवी कौशल्य शिकताना
‘हे’ विसरु नका.

1. स्वतर्‍कडे पहा. कोण चुकतंय, कसं वागतंय, काय करतंय, आपला संबंध नाही. आपला फोकस आपल्यावर!

2. हातात काम घेतलं की तडीस न्या, त्यात चालढकल नको. आज करु-उद्या करु असं करणं साफ चूक.

3. कुणालाच आणि कशालाच गृहित धरु नका. कुणाविषयी शंका, संशय असेल तर त्या व्यक्तीशी बोलून शंका निरसन करा. मनात कुढू नका. 

4. नेटवíकंगच्या मागे लागू नका. नेटवर्किगपेक्षा रिलेशनशिपवर भर द्या. नाती जपा. टिकवा. वाढवा.

5. इतरांचं ऐका. एकाच गोष्टीकडे पाहण्याचे अनेक दृष्टीकोन असू शकतात. हे मान्य करा. ते स्वीकारण्याची तयारी ठेवा.

6. मुळात आपण नोकरी/व्यवसाय कशासाठी करतोय? आपलं लाइफ पर्पज काय? आयुष्याचं ध्येय काय? या प्रश्नाचं उत्तर शोधा. त्यादिशेनं प्रवास करा.
 

 

Web Title: If you want to 'boost' your career next year, must learn these SKILLS !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.