कोरोनाकाळात नोकरी टिकवायची तर आपलं काम दिसलं पाहिजे, ते कसं दिसावं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 05:22 PM2020-07-16T17:22:50+5:302020-07-16T17:23:58+5:30
काम बोलेल, तुम्हीही बोला!
- निशांत देवरे
आता काळ असा आला आहे की, काम करण्यापेक्षा ते काम चार लोकांना दिसणं, ते नीट ‘दाखवता’ येणंही फार महत्त्वाचं झालं आहे.
हार्डवर्क नाही तर स्मार्टवर्कचा जमाना आहे हे तर आपण कोरोनापूर्वकाळापासून ऐकत आहोतच.
आणि आता तर सगळंच ऑनलाइन. त्यात पीपीटी करा, व्हिडिओ करा, झूम मीटिंग, वेबिनार यात झळका.
अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की हे सारं करणारे, सर्वत्र झळकणारे, साहेबाला सतत आयडिया देणारे आणि त्याच्या नजरेत येणारे नक्की काम कधी करतात.
कारण आपण तर कामच करत असतो आणि ते काम प्रेङोण्ट करणं राहूनच जातं.
पुढे पुढे करणारे, काम दाखवून देणारे पुढे जातात आणि नुस्तं काम करणारे कुणाला दिसतही नाही हे वास्तव जितकं काल खरं होतं, तितकंच आजही खरं आहे. पण आज त्यावर उत्तर शोधलं नाही तर वर्क फ्रॉम होमच्या या जमान्यात इमिजिएट बॉससह कुणालाच आपलं काम दिसणार नाही आणि ओङयाचा बैल बनून राहण्यापलीकडे आपल्या हातात दुसरं काहीही येणार नाही.
कोरोनासह जगताना सगळं प्रोफेशनल जगणंच ऑनलाइन गेलं आहे. त्यात आता प्रेङोंटेशन स्किल या कौशल्याला मोठं महत्त्व येणार आहे. जो दिसेल तो टिकेल, जो दिसणार नाही तो मागे पडेल असं एकूण चित्र आहे.
गुणवत्ता असणं तर महत्त्वाचं आहेच; पण या स्पर्धेत जिथं नोक:यांवरच गंडांतर आलेलं आहे, तिथं आपल्याच गुणवत्तेला, मेहनतीला न्याय द्यायचा असेल तर आपल्या कामाची चर्चा व्हायला पाहिजे. ते दिसलं पाहिजे.
कामाचा दर्जा अजिबात कमी न करता, आपल्या कामाचाच एक भाग म्हणून आता या प्रेङोंटेशन स्किलकडे पहावे लागेल. ते येत नसेल तर शिकून घ्यावं लागेल. कोर्सेरासारख्या साइट्सवर त्यासंदर्भातही प्रशिक्षण मिळू शकतं. तेही मोफत.
त्यामुळे नव्या काळात नुसतं टिकायचंच नाही तर जोमानं वाढायचं असेल तर आपल्याला नवीन स्किल शिकूनच घ्यावी लागतील.
नुसतं उत्तम पीपीटी करणं, आपला प्रोजेक्ट काय, विषय काय आहे ते मांडणं इथंच काम संपत नाही तर इथं आता ते सुरूहोणार आहे.
ते तंत्र शिकून त्यापद्धतीनं प्रेङोंटेशन करणं ही नव्या काळात आवश्यक गोष्ट आहे. ती शिकून घ्यायलाच हवी.
त्यासाठी काही गोष्टी आता घोटून अंगीकाराव्या लागतील.
1. बोला. सांगा. आपण जे काम केलं ते साहेबाच्या लक्षात येईल, असं नम्रपणो मांडा. दाखवा. शोशाईन नाही केली तरी केल्या कामावर प्रतिक्रिया, प्रतिसाद मागा.
2. नव्या कल्पकतेनं कामाची मांडणी करा. जे विषय कुणी करत नाही, त्याला हात घाला.
3. संवाद कला. न बोलून सोनंही विकलं जाणार नाही, त्यामुळे बोलून, लोकांना आपलंसं करून, आपल्या कल्पना विकता यायला हव्यात.
4. आत्मविश्वास ठेवा. जी कौशल्यं कमावली, त्यावर भरवसा ठेवा. त्यांच्या जोरावर आगे बढो असं सांगा स्वत:ला.
5. स्पष्ट, खणखणीत बोला. तुमची बॉडीलॅँग्वेज तुमच्या विषयी बरेच काही सांगून जाते.
6. सगळ्यात महत्त्वाचं आपलं काम दिसणं ही आपली जबाबदारी आहे, हे नव्या काळात विसरू नका.