IGNiTE
By admin | Published: January 7, 2016 10:33 PM2016-01-07T22:33:21+5:302016-01-07T22:33:21+5:30
स्थानिक प्रश्नांवर उत्तरं शोधून ती प्रत्यक्षात आणणा:या ‘इनोव्हेटिव्ह’ मुलांचा राष्ट्रय सन्मान
Next
>
स्थानिक प्रश्नांवर उत्तरं शोधून
ती प्रत्यक्षात आणणा:या
‘इनोव्हेटिव्ह’ मुलांचा
राष्ट्रय सन्मान..
आपण हार नाही मानू शकत,
आपल्या समस्यांसमोर गुडघे नाही टेकवू शकत,
काहीही झालं तरी आपल्या समस्यांना
आपल्यावर मात करायची परवानगी आपण नाहीच देऊ शकत!
***
स्वप्नं पाहा.
आणि ती स्वप्नं पूर्ण व्हायच्या आत
नवीन स्वप्नं पाहा.
**
माणसासमोर अडचणी, आव्हानं हवीतच,
ती असतील तरच त्यातून वाट काढत
मिळवलेल्या यशाचा आनंद ख:या अर्थानं
साजरा करता येऊ शकेल, तरच त्याची किंमतही कळेल!
**
***
- ही सारी प्रेरणादायी वाक्यं आहेत महान शास्त्रज्ञ, शिक्षक आणि भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची!
स्वप्न पाहा, नवा विचार करा, तो प्रत्यक्षात आणा आणि आपल्या मनाला प्रज्वलित करून त्या प्रकाशात पुन्हा जग बदलायचं स्वप्न पाहा असं तरुण मुलांना सांगणारे, त्यांच्यासाठी प्रेरणास्रोत बनलेले डॉ. कलाम.
इग्नाइट अवॉर्ड्स हे त्यांच्याच नावानं दिले जाणारे पुरस्कार आहेत.
नॅशनल इनोव्हेशन फाउण्डेशनच्या वतीनं 2क्क्8 पासून दिले जाणारे हे पुरस्कार तरुण संशोधकांना दिले जातात. बारा वर्षार्पयतचा एक गट, सतरा वर्षार्पयतचा दुसरा. 2क्15 चे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. देशभरातून आलेल्या 28 हजार इनोव्हेशन्समधून फक्त 31 इनोव्हेशन्सना आणि सारख्या कल्पना असलेल्या 41 मुलांना या पुरस्कारानं गौरविण्यात आलं!
देशातील तळागाळातल्या, अगदी आदिवासी भाग ते खेडीपाडी, अंदमान निकोबार ते ईशान्य भारत, तामिळनाडूतली खेडी ते काश्मिरातली खेडी अशा अनेक सुदूर, दुर्गम भागातूनही सहभागी झालेल्या मुलांना पुरस्कार मिळाले, ते केवळ त्यांच्या वेगळ्या विचार करण्याच्या क्षमतेसाठी आणि वैज्ञानिक दृष्टीसाठी!
या मुलांमधे मेट्रो शहरातले, इंग्रजी मीडियमवाले आहेत तसे छोटय़ा शहरातली आणि अगदी जिल्हा परिषदेच्या शाळांमधे मातृभाषेत शिकणारी आदिवासी पाडय़ातलीही मुलंमुली आहेत!
त्या मुलामुलींची त्यांच्या वेगळ्या कल्पनांसह एक विशेष भेट या अंकात.
नेमकं त्यांना सुचला कसा हा प्रयोग हे सांगणारी, त्या प्रयोगाच्या मागच्या मेहनतीची आणि प्रयत्नांच्या शर्थीचीही!
‘इनोव्हेशन इज द की ऑफ फ्युचर’ असं माननीय राष्ट्रपती सांगतात आणि नव्याची कास निष्ठेनं धरा असा संदेशही देतात, त्या संदेशाची एक प्रतही आहे या अंकात.
भाषा, वय, शिक्षण, जात, धर्म या कशाचाही अडसर न येऊ देता, वेगळ्या विचाराचं, नवनिर्मितीचं आणि वैज्ञानिक दृष्टीचं हे व्रत जे या मुलांनी जपलंय, त्याचा वारसा आपल्याही र्पयत यावा.
म्हणून हा प्रयत्न...
- ऑक्सिजन टीम
------------------------------------
नावीन्याची आस हीच प्रेरणा..
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यापासूनच प्रेरणा घेत 2क्क्8 पासून ही ‘इग्नाइट’ नावाची राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा सुरू झाली. देशातील तळागाळातल्या मुलांच्या कल्पकतेला आणि नवनिर्मितीला वाव मिळावा म्हणून डॉ. कलाम नेहमी तरुण मुलांना प्रेरणा देत. त्यांच्या नावे हा पुरस्कार तरुण संशोधकांना आणि कल्पक मुलांना मिळणं ही गौरवास्पद गोष्ट आहे.
जी मुलं वेगळा विचार करतात, संशोधन करतात, ज्यांना नावीन्याची आस आणि प्रश्न सोडवण्याची तळमळ आहे, त्यांची या देशाला कदर आहे हाच संदेश या पुरस्कारातून मिळतो. त्यातून मुलांच्या कल्पकतेला नक्की बळ मिळेल!
- डॉ. रघुनाथ माशेलकर
अध्यक्ष,
नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन
---------------------------------------------
वेदनेतून सहयोगाची ऊर्मी...
क्रिएटिव्ह, इमपेशंट, इमॅजिनेटिव्ह मुलं ही देशाची अत्यंत मौल्यवान संपदा.
सहवेदना, सृजनशीलता, सहयोग या तीन गोष्टी उत्तम नागरिक होण्यासाठी मदत करतात. अशी मुलं फक्त देशाचेच नाही, तर जगाचेही उत्तम नागरिक होतात.
याच सूत्रतून डॉ. कलामांनी काम सुरू केलं आणि आता ‘इग्नाइट’ पुरस्कार त्यांच्या नावे दिले जात आहेत.
या पुरस्कारासाठी दाखल झालेल्या सर्व प्रवेशिका पाहिल्या तर एक लक्षात येतं की, क्रिएटिव्ह आयडियांमधून आपण आपली सामाजिक कल्पकता वाढवतो. यातलाच एक पुरस्कार विजेता काश्मीरचा मोहंमद तौफिक. त्याची शाळा सुटली पण शरीराच्या वेदनेनं त्याच्या कल्पकतेवर मात केली नाही. उलट त्या वेदनेतही तो हाच विचार करत होता की, रोज घरात दिसणा:या प्रश्नाचं उत्तर कसं शोधता येईल?
पावसाळ्यात आपण भिजतो शाळेत जाताना म्हणून नवीन छत्रीचा हट्ट त्रिपुरातला तरणा करत नाही, तर सगळ्यांना एकत्र शाळेत जाता येईल अशी छत्रीच तो तयार करतो. आपल्या अवतीभोवतीच्या समस्येवर फक्त स्वत:साठी नाही तर सगळ्यांसाठी उत्तरं शोधणारी ही मुलं, त्यांचं मनही मोठं आहे आणि सहवेदनेची जाणीवही! आणि कल्पकताही.
ती मारून न टाकता वेगळा विचार करण्याची, नव्यानं जग पाहण्याची, ज्यांच्याकडे आपल्यापेक्षाही कमी साधनं आहेत त्यांना मदत करण्याची ही वृत्ती या मुलांची खरी ताकद आहे. सगळ्याच मुलांची खरी पुंजी आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांचे अधिरेपण!
आहे ते चालवून न घेता, अधीर होत त्यांनी उत्तरं शोधली आहेत. त्यातून आपल्या समाजाचे अनेक प्रश्न तर सुटू शकतीलच; पण कल्पकतेला, आनंदाला प्रोत्साहन मिळेल हेदेखील महत्त्वाचं आहे!
ही कल्पकता, नव्याची आस आणि ही अधिरता वाढीस लागावी, याच शुभेच्छा!
- प्रो. अनिल के. गुप्ता
कार्यकारी अध्यक्ष,
नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन
--------------------------------------------
ना भाषेचे अडसर, ना भौगोलिक सीमांचे...
डॉ. माशेलकर म्हणतात तसं ‘माइण्ड टू मार्केट’ हा क्रिएटिव्ह मुलांसाठी एक आनंददायी प्रवास असावा. मुलांच्या मनात उगवणा:या, मूळ धरणा:या कल्पनांना उत्तम अवकाश मिळावं, त्या आकारास याव्यात म्हणून नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन मदत करतं. 2क्15 मध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी देशभरातून 2क् हजारांहून अधिक प्रवेशिका आल्या. त्यातून 18 राज्यांतील 27 जिल्ह्यांतल्या 41 मुलांच्या 31 कल्पनांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम ‘इग्नाइट’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनेक मुलांच्या कल्पना एनआयएफच्या लॅबमधे एमआयटी बोस्टनच्या इंजिनिअरिंग टीमच्या मदतीनं आकारास आल्या.
या सा:यात एक सूत्र दिसतं की, कल्पनांना शहरी-ग्रामीण असं बंधन नाही. उलट खेडय़ापाडय़ातल्या मुलांनी आपल्या रोजच्या जगण्यात येणा:या अडचणीतून मार्ग काढत अनेक कल्पक प्रयोग केले. भाषा, शिक्षण, सुविधा, वय यापैकी काहीच या मुलांच्या विचारप्रक्रियेत अडसर ठरलेलं नाही. उलट अधिक खुलेपणानं ही मुलं विचार करताना दिसली.
आणि ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे.
विज्ञान, शास्त्रीय दृष्टिकोन, परिस्थितीला पूरक आणि तरीही नावीन्यपूर्ण अशा प्रयोगांची ही साखळीच देशात नवनिर्मिती आणि कल्पकता यांची मोट बांधू शकेल अशी आशा आहे.
- डॉ. विपीन कुमार
संचालक आणि मुख्य इनोव्हेशन ऑफिसर,
नॅशनल इनोव्हेशन फाउण्डेशन
--------------------------------------
नॅशनल इनोव्हेशन फाउण्डेशन आहे काय?
‘हनी बी नेटवर्क’ अर्थात मधमाशी जसं पोळं विणते त्या तत्त्वावर उभारलेलं, केंद्र सरकार संलगA असं हे नॅशनल इनोव्हेशन फाउण्डेशन. मार्च 2क्क्क् मधे त्याची स्थापना झाली. देशात तळागाळात होणारे तांत्रिक नवर्निमिती उपक्रम, पारंपरिक ज्ञान यांचा मेळ घालत नवनिर्मितीला प्रोत्साहन देणं हे या फाउण्डेशनचं काम आहे.
देशभरातल्या अनेक संशोधकांची, नवर्निमितीवेडय़ा, ध्यास घेऊन संशोधन करणा:या तरुण आणि प्रौढही व्यक्ती आणि संस्थांची मोट बांधून त्यांच्या कामाला प्रोत्साहन, पाठबळ देण्याचं काम ही संस्था करते.
ग्रासरुट टू ग्लोबल या कल्पनेवर काम करत तंत्रशिक्षण, प्रयोग आणि कल्पक उपक्रमांना व्यासपीठ, पाठबळ ही संस्था देते.
2008 पासून ‘इग्नाइट अवॉर्ड्स’ला सुरुवात झाली.
या वर्षीपासून त्याचं ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम इग्नाइट अवॉर्ड्स’ असं नामकरण करण्यात आलं.
-------------------------------------------
इग्नाइट अवॉर्ड्स 2016 सहभागी व्हायचंय?
त्यासाठी नॅशनल इनोव्हेशन फाउण्डेशनच्या
वेबसाइटवर जा.
तिथं तुम्हाला आजवरचे पुरस्कार, त्यासाठीकरण्यात आलेलं काम, येत्या वर्षीच्या पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवण्यासाठीची माहिती असं सारं काही मिळू शकेल.
अधिक माहितीसाठी
http://nif.org.in/
-----------------------------------