इन्फेक्शन होणारच!
By admin | Published: July 9, 2015 07:20 PM2015-07-09T19:20:48+5:302015-07-09T19:20:48+5:30
घाम, वजन आणि घट्ट जीन्स...इन्फेक्शन होणारच!
Next
- डॉ. केतकी गोगटे
त्वचाविकारतज्ज्ञ
घाम, वजन आणि घट्ट जीन्स
इन्फेक्शन होणारच!
जीन्स घातल्यामुळेच आजार होतात असं नाही सांगता येणार. पण घट्ट कपडे घातल्यामुळे काही त्वचाविकार नक्की येतात. आपल्याकडचं जे वातावरण आहे त्यामुळे घाम खूप येतो. तो घाम येऊन जर तिथं कपडा घासला गेला तर काही त्वचाविकार होऊ शकतात. घट्ट जीन्स, न धुता सतत वापरल्यानं आणि घाम शोषला न जाता घर्षण होत राहिल्यानं फंगल इन्फेक्शन होतं. जीन्सच नव्हे तर सलवारच्या नाडय़ा, पेटिकोट हे करकचून बांधल्यानं कंबरेला असं इन्फेक्शन आपल्याकडे सर्रास होताना दिसतं.
अनेक मुली घट्ट जीन्स वापरतात. आपल्या साईजपेक्षा कमी मापाची जीन्स वापरण्याचाही अनेकींना सोस असतो. पण घट्ट जीन्स आणि जास्त वजन यामुळे त्रस होऊ शकतो.
विशेषत: उन्हाळा आणि पावसाळ्याचे दिवस जेव्हा दमट हवामान असतं तेव्हा जीन्ससारख्या जाड-घट्ट कपडय़ांमुळे त्रस होतो. कारण घाम येण्याचं प्रमाण जास्त असतं.
त्यामुळे सैलसर, घाम शोषून घेणारे कपडे वापरणं या काळात महत्वाचं. नाहीतर मग त्वचाविकार होऊ शकतात.