40 वर्षाच्या अखंड संघर्षानंतर इराणी महिलांनी जिंकलेला एक लढा

By meghana.dhoke | Published: December 19, 2019 07:30 AM2019-12-19T07:30:00+5:302019-12-19T07:30:02+5:30

फुटबॉल सामना पहायला स्टेडिअममध्ये जाणं, किती साधी गोष्ट. पण त्यासाठी त्यांना 40 वर्षे भांडावं लागलं.

iranian-women-allowed-football-match- after 40-years | 40 वर्षाच्या अखंड संघर्षानंतर इराणी महिलांनी जिंकलेला एक लढा

40 वर्षाच्या अखंड संघर्षानंतर इराणी महिलांनी जिंकलेला एक लढा

Next
ठळक मुद्देइराणी महिलांची ही लढाई किमान एका विजयार्पयत तरी पोहचली!

-मेघना  ढोके / कलीम  अजीम

ऑक्टोबर महिन्यातली गोष्ट. 40 वर्षानंतर इराणी तरुणींनी/महिलांनी फुटबॉल स्टेडिअममध्ये पाऊल ठेवलं.  फुटबॉल स्टेडिअममध्ये महिलांनी येऊन सामने पहायला घातलेली बंदी इराण सरकारनं उठवली.
एरव्ही वाचताना वाटेल की, त्यात काय आनंदोत्सव साजरा करण्यासारखं? मात्र फुटबॉलवेडय़ा इराणमध्ये महिलांना फुटबॉल पहायला स्टेडिअममध्ये जाता येत नव्हतं. एक संपूर्ण पिढीच या आनंदापासून वंचित राहिली. तरुण मुलींसाठी स्टेडिअममध्ये जाऊन मॅच पाहणं हे स्वपA वाटावं इतकं वास्तव अशक्य होतं.
मात्र एक दिवस ही बंदी उठली.
आणि इराणमधल्या तरुणी  स्टेडिअमकडे निघाल्या. जगभरात त्यांचे ते फोटो व्हायरल झालेत. एक मोठी लढाई जिंकून आनंदोत्सवच स्टेडिअममध्ये साजरा झाला.
10 ऑक्टोबरला राजधानी तेहरानच्या आझादी स्टेडिअममध्ये हजारो महिला/मुली दाखल झाल्या. 80 हजारांची बैठक क्षमता असलेल्या या स्टेडिअममध्ये चोहीकडे महिलाच महिला दिसत होत्या. रंगीबेरंगी कपडे परिधान करून, आपले चेहरे रंगवून, कलरफूल केशरचना करून आलेली ती उत्साही तरुणींची गर्दी होती. प्रत्येकीच्या हातात व खांद्यावर इराणचा राष्ट्रीय ध्वज होता. 
दोन दिवस आधीपासून फुलबॉल सामन्याची तिकिटं खरेदी करण्यासाठी महिलांच्या रांगा स्टेडिअमबाहेर दिसत होत्या. सुमारे 3500 महिलांनी स्वतर्‍ येऊन तिकिटं खरेदी केली. इराण विरुद्ध कंबोडिया या फुटबॉल मॅचचा आनंद यासार्‍यांनी लुटला.
त्यावेळी आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी अनेक मुलींच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यातली जहिरा पशेई नावाची 29 वर्षीय तरुणी सांगते, ‘शेवटी आम्हाला स्टेडिअममध्ये जाण्याची संधी मिळालीच. ही एक विलक्षण भावना आहे!’
शब्दांत मांडता येऊ नये अशीच या मुलींची त्याक्षणीची भावना होती कारण जो खेळ केवळ टीव्हीवर लांबून पाहिला, त्या खेळाच्या स्टेडिअममध्ये या मुली दाखल झाल्या होत्या.
इराणमध्ये सुमारे चार दशकांपासून महिला प्रेक्षकांना फुटबॉल व अन्य क्रीडा सामने स्टेडिअममध्ये जाऊन बघण्यास बंदी होती. 1979 साली इराणमध्ये खोमेणी यांच्या नेतृत्वाखाली राजकीय क्रांती घडून आली.


मात्र त्यानंतर महिलांवर बरेच र्निबध लादण्यात आले. त्यातलाच एक म्हणजे महिलांनी स्टेडिअममध्ये न जाणं. ही बंदी झुगारण्यासाठी 40 वर्षापासून लढा सुरू होता. या लढय़ाचा इतिहास फार जुना आहे. निषेध मोर्चे, आंदोलनं व निदर्शनं करून महिलांनी सरकारकडे सतत हे नियम शिथिल करण्याची मागणी केली होती.
सोदी सरकारने महिलांसाठी विविध कार्यक्षेत्ने खुली केल्यानंतर इराणमध्ये स्रियांच्या हक्काच्या विविध लढय़ांना बळ प्राप्त झालं. सौदी सरकारने ड्राईव्हिंग, सिनेमा, मल्टिनॅशनल कॉर्पोरेट कंपन्या, खेळ, एअर होस्टेस इत्यादी क्षेत्ने स्रियांसाठी खुली केली आहेत. पूर्वी या सर्वच क्षेत्नात महिलांना काम करण्यास बंदी होती.
गेल्या दोन वर्षापासून इराणमध्ये तरुणींनीही विविध मूलभूत हक्कासाठी बंडाचा पवित्ना घेतला होता. गेल्या वर्षी एप्रिलमध्येच पाच मुलींनी नकली दाढी-मिशा लावून पुरुषांचा वेश धारण करून फुटबॉल स्टेडिअममध्ये प्रवेश केला होता. इराणी सरकारविरोधातला हा प्रतीकात्मक निषेध होता. नंतर त्या मुलींना अटक झाली, त्यांच्यावर खटला भरण्यात आला. 
ऑगस्ट महिन्यात 23 वर्षीय सहर खोडयारी नावाच्या कॉम्प्युटर इंजिनिअर तरुणीने निळी केशरचना करून लपून स्टेडिअममध्ये प्रवेश मिळवला होता. सुरक्षा रक्षकांनी तिलाही ताब्यात घेतलं होतं. तिच्यावर कायदा मोडल्याचा खटला भरण्यात आला. सुनावणी सुरू असतानाच शिक्षेच्या भीतीने तिने स्वतर्‍ला पेटवून घेतलं. पुढे सात दिवसांच्या उपचारानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सहर नावाच्या ब्लू गर्लच्या मृत्यूनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर या धक्कादायक प्रकाराचे पडसाद उमटले. जगभरात या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात होता. फुटबॉलप्रेमीने सोशल नेटवर्किंगवर ब्लूगर्ल हा हॅशटॅग वापरून सहरला श्रद्धांजली अर्पण केली. त्याचबरोबर इराण सरकारने कायदे बदलण्याच्या मागणीची मोहीम सुरू झाली.
इराणी महिलांची ही लढाई किमान एका विजयार्पयत तरी पोहचली!

Web Title: iranian-women-allowed-football-match- after 40-years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.