उंची कमी आहे म्हणून स्वत: वर वाट्टेल ते उपचार करून घेताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 03:25 PM2018-07-12T15:25:34+5:302018-07-12T15:27:00+5:30

मुळात आपली उंची कमी आहे याचा अनेकांना न्यूनगंड असतो. मुलं-मुली बुटक्या, वांग्या म्हणून चिडवून अपमान करण्याचं प्रमाण तर प्रचंड आहे.

Is It Possible To Increase Your Height? | उंची कमी आहे म्हणून स्वत: वर वाट्टेल ते उपचार करून घेताय?

उंची कमी आहे म्हणून स्वत: वर वाट्टेल ते उपचार करून घेताय?

googlenewsNext
ठळक मुद्देटीव्ही, वर्तमानपत्नातून येणार्‍या उंची वाढवण्याच्या भ्रामक जाहिरातींना भुलून चुकीचे व अघोरी उपाय केले जातात.

- डॉ. यशपाल गोगटे

वाढ व विकास. हे दोन्हीही मुलांच्या प्रगतीसाठी गरजेचे आहे. वाढ म्हणजे आकारात भर पडणं, याउलट विकास म्हणजे नवीन कौशल्य अवगत करणं. सर्वसाधारणपणे शारीरिक असते ती वाढ व बौद्धिक किंवा मानसिक असतो, तो विकास. वाढ ही किशोरावस्था संपेर्पयत होते. विकास मात्न त्यानंतरही चालू राहातो. या शारीरिक वाढीत अनन्यसाधारण महत्त्व असते ते म्हणजे उंचीला! या उंचीचा वेग, उंची वाढीची कारणं या लेखात आपण बघू.  
मुळात आपली उंची कमी आहे याचा अनेकांना न्यूनगंड असतो. मुलं-मुली बुटक्या, वांग्या म्हणून चिडवून अपमान करण्याचं प्रमाण तर प्रचंड आहे. त्यानं अनेकांचा आत्मविश्वास ढासळतो. खरं तर आपल्या उंचीसंदर्भात काही शास्त्रीय माहिती हाताशी ठेवली तर असे मान-अपमान अजिबात वाटय़ाला न येता, आपण आपल्या उंचीविषयी समाधानी असू.
मुळात उंचीवाढीचा वेग हा वयानुसार बदलतो. शिशुअवस्थेत,  वयाच्या पहिल्या तीन वर्षात उंची झपाटय़ाने वाढते. त्यानंतर मात्न वयात येईर्पयत ती दरवर्षी 2 इंच, म्हणजेच 5 सेमीच्या दराने वाढते. वयात येताना [मुलींमध्ये 10 ते 14 वर्षे व मुलांमध्ये 12-16 वर्षे] ती पुन्हा झपाटय़ाने वाढू लागते. मुलींमध्ये पाळी  सुरू  झाल्यानंतर वाढीचा वेग कमी होतो, आणि वर्षभरात उंची वाढायची थांबते. मुलांमध्ये मात्न ती उशिरा, म्हणजे 16 वर्षार्पयत  वाढत राहाते. मात्न काहीवेळा वयात येण्याची प्रक्रिया लवकर किंवा उशिरा झाल्यास उंची लवकर किंवा उशिरा वाढू शकते.
शारीरिक वाढ ही आनुवांशिकता [आई-वडिलांची उंची], जन्माच्या वेळीचं वजन, तसेच आहार यावर अवलंबून असते. कुठलीही दुर्धर शारीरिक किंवा मानसिक समस्या ही बालकाच्या अंतिम उंचीवर विपरीत परिणाम करू शकते. अनेकवेळा हार्मोन्सची कमतरता किंवा अतिरिक्ततादेखील बुटकेपणाचं कारण असू शकते.
नैसर्गिकरीत्या उंची किती वाढू शकते याचंदेखील एक गणित असतं. आई-वडिलांच्या उंचीची सरासरी काढा. त्यात 6.5 से.मी. बेरीज केल्यास मुलाची भविष्यातील उंची व 6.5 से.मी. वजा केल्यास मुलीची भविष्यातील उंची कळते. या उंचीला मुलांनी 16 व्या वर्षी व मुलींनी 14 व्या वर्षी पोहोचणे अपेक्षित असते. 
 चांगली जीवनशैली व योग्य आहार घेतल्यास आपण आपल्या अपेक्षित उंचीपेक्षा 1-2 इंच अधिक उंची गाठू शकतो. दिवसभराच्या आहारात प्रथिने (डाळी, कडधान्य, शेंगदाणे, मांसाहार), कॅल्शियम (200 मिली दूध), लोह (हिरव्या पालेभाज्या) व ड जीवनसत्त्व (अर्धा तास उन्हात व्यायाम) यांचा समावेश उंचीसाठी पूरक ठरतो. धावणं, सायकल, स्ट्रेचिंग एक्सरसाइज इत्यादी सर्व व्यायामप्रकारांनं उंची वाढायला होते. मात्न लटकणे/ लोंबकळणे यानं उंची वाढत नाही. जिमनॅस्टीकने उंची वाढत नाही, हा गैरसमज आहे. अतिरिक्त वजन उचलण्याचे व्यायामप्रकार मात्र टाळावेत.
कुपोषण व रक्तात हिमोग्लोबीनची कमतरता ही उंची न वाढण्याची प्रमुख कारणं आहेत. जन्मतर्‍ कमजोर (2.5 किलोपेक्षा कमी वजन) असेल तर पुढे जाऊन कमी उंची असण्याची शक्यता असते. थायरॉईड किंवा ग्रोथ-हार्मोन्सच्या कमतरतेमुळेदेखील बुटकेपणा होऊ शकतो. ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता, तसेच इतर हाडांच्या आजारातही उंची कमी राहू शकते. वयात येण्याच्या सर्व आजारांचा उंचीवर परिणाम होतो. मुख्यतर्‍ लवकर वयात आल्यास उंची लवकर थांबू शकते.
ग्रोथ हार्मोन्सचं इंजेक्शन आता उपलब्ध असल्यामुळे शरीरात त्याची कमतरता असणार्‍या मुला-मुलींना वेळीच ट्रीटमेंट चालू केल्यास फरक पडतो. सर्व आजारात ग्रोथ हार्मोन्स इंजेक्शनची गरज नसते. मात्न काही आजारात ग्रोथ हार्मोन्स इंजेक्शन हा एकमेव उपाय असू शकतो. ग्रोथ हार्मोन्स इंजेक्शन देण्याचा निर्णय हार्मोन्सतज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सविस्तर चर्चा करूनच घ्यायला हवा.
एका विशिष्ट म्हणजेच साधारण 16-18 वयानंतर उंची फारशी वाढू शकत नाही. बरेचवेळा टीव्ही, वर्तमानपत्नातून येणार्‍या उंची वाढवण्याच्या भ्रामक जाहिरातींना भुलून चुकीचे व अघोरी उपाय केले जातात. 
तसं करणं म्हणजे जिवाशी खेळ. जीवनात यश संपादन करण्याचं उंची हे एकमेव मापक नव्हे. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा थोर कर्तृत्ववान व्यक्तींच्या यशोगाथा आपल्याला माहिती आहे. त्यामुळे उंची कमी असल्याचा बाऊ करून स्वतर्‍लाच त्रास देऊ नका..


 

Web Title: Is It Possible To Increase Your Height?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.