इट्स ओके, बात करो!
By admin | Published: April 10, 2017 05:49 PM2017-04-10T17:49:08+5:302017-04-10T18:03:20+5:30
देशभरातील तरुणांना मानसिक आजारासंदर्भात मदत आणि माहिती देणारी एक वेबसाईट
देशभरातील तरुणांना मानसिक आजारासंदर्भात मदत आणि माहिती देणारी एक वेबसाईट
डिप्रेशन आलं असेल तर बोला, लपवू नका, गप्प बसू नका, लाजू नका, सांगा, मदत मागा..
अशा अर्थाच्या कॅम्पेन देशभर सध्या सुरु आहेत. जागतिक आरोग्य दिन नुकताच साजरा झाला आणि डिप्रेशनविषयी जनजागृती हीच त्याची यंदा थीम होती. जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीनुसार ७.५% भारतीयांना किरकोळ आणि गंभीर स्वरुपाच्या मानसिक आजारांनी ग्रासलेलं आहे. आणि त्यांना मानसिक मदतीसह औषधोपचाराचीही गरज आहे. अलिकडेच लोकसभेत मानसिक स्वास्थ्य सुरक्षा विधेयक २०१६ मंजूर झालं. पब्लिक हेल्थ फाऊंडेशनच्या वतीने त्याच अनुषंगानं तरुण मुलांसाठी मानसिक स्वास्थ्य जनजागृती चळवळ आणि त्यासंदर्भात एक वेबसाईट सुरु करण्यात आली आहे.
त्यांची थीम आहे ओके टू टॉक, हिंदीत इट्स ओके, बात करो अशी टॅग लाईन आहे. या जनजागृतीसाठी वेबसाईटसह सोशल मीडीया, फेसबुक, इन्स्टाग्राम यांचाही उपयोग केला जाणार आहे. त्यानुसार ९ तरुणांनी आपल्या कथा इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या दिसतात.
आपण सारेच रोजच नकारात्मक भावना, औदासिन्य, निराशा यांचा सामना करत असतो. त्या भावना हाताळून त्यांचा निचरा करणं शिकायला हवं. गरज असेल तेव्हा मानसोपचार घेवून त्यातून बाहेरही पडायला हवं.
म्हणून तर देशभरातील तरुण मुलांसाठी ही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. तिथं आपल्या मानसिक आरोग्यासंदर्भात प्रश्न विचारता येतील, त्याचं स्वरुप सांगता येईल. आणि मानसिक आजारासंदर्भात, उपाययोजनांविषयीची माहिती, त्यासंदर्भातले गैरसमज, भीती, भयगंड यासाऱ्यचाी माहिती मिळू शकेल. ब्लॉग्ज, फोटो, व्हिडीओ, संगीत अशा विविध स्वरुपात ही माहिती असेल.
देशभरातील तरुणांसाठी मोबाईलवर माहिती मिळेल अशी ही व्यवस्था आहे.
अधिक माहितीसाठी
http://itsoktotalk.in/
ही वेबसाईट पहाता येईल.
-आॅक्सिजन टीम