जेएनयू

By admin | Published: February 19, 2016 03:07 PM2016-02-19T15:07:57+5:302016-02-19T15:23:12+5:30

उदारमतवाद आणि पुरोगामी विचारांसाठी प्रसिद्ध असलेलं एक धगधगतं तरुण कॅम्पस. आंदोलनं, मोर्चे, निदर्शनं, निवडणुका यांच्यासह जगणारं हे जग नेमकं आहे कसं?

JNU | जेएनयू

जेएनयू

Next
- ऑक्सिजन टीम
 
उदारमतवाद आणि 
पुरोगामी विचारांसाठी
प्रसिद्ध असलेलं
एक धगधगतं तरुण कॅम्पस.
आंदोलनं, मोर्चे, निदर्शनं, निवडणुका यांच्यासह
जगणारं हे जग नेमकं आहे कसं?
 
जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी
अर्थात जेएनयू.
नवी दिल्लीतलं हे एक अत्यंत महत्त्वाचं विद्यापीठ, ज्याच्या तीन अक्षरी शॉर्टफॉर्ममध्ये अनेक ओळखी दडलेल्या आहेत. 
व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि डावा, पुरोगामी, उदारमतवादी विचार मांडणारं हे विद्यापीठ. तिथं प्रवेश मिळणं आणि त्या कॅम्पसमध्ये शिकणं हे भारतभरातल्या अनेक विद्याथ्र्याचं स्वप्न. आणि तो प्रवेश मिळालाच तर अत्यंत हुशार, गुणी असल्याचा टॅगही आपोआप त्या विद्याथ्र्याला चिकटतोच !
या कॅम्पसला आंदोलनं नवीन नाहीत, मोर्चे नवे नाहीत आणि सत्तेत कुणाही पक्षाचं सरकार असो, त्या प्रस्थापित सत्तेविरुद्ध कठोर भूमिका घेत आपली मतं स्वच्छ, थेट आणि कुणाचीही भीडभाड न ठेवता मांडणंही नवीन नाही !
उलट कायमच प्रस्थापित सत्तांच्या विरोधात भूमिका मांडत मागास, पिछडय़ा आणि शोषित समाजघटकांसाठी लढण्याचं, आवाज उठवण्याचं श्रेय या कॅम्पसला जातं !
मात्र आज हाच कॅम्पस वादाच्या तप्त ज्वाळांनी पेटून उठला आहे.
अफजल गुरू, मकबूल भट यांच्या समर्थनार्थ काही तरुण मुलांनी पत्रकं चिकटवली, सभा घेतली, घोषणा दिल्या. ‘भारत की बरबादी तक, काश्मीर की आझादी तक जंग करेंगे, जंग करेंगे.’ अशा घोषणाही कॅम्पसमध्ये काही मुलांनी दिल्या.
आणि त्यावरून वाद पेटला. युनियनच्या अध्यक्षासह काही विद्याथ्र्याची धरपकड करत सरकारनं देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले.
अजून हे प्रकरण चिघळलेलंच आहे.
जेएनयूचं काम बंद पाडण्यात आलं आहे.
युक्तिवाद दोन्ही बाजूनं होत आहेत, हे सारं रोजच्या बातम्यांमध्ये आपण वाचतो, पाहतो आहोतच !
स्वातंत्र्य, देशनिष्ठा आणि व्यक्तिस्वातंत्र्य याबाबतच चारीबाजूनं वाद तापले आहेत.
मात्र या अशा वातावरणात नेमकं हे जेएनयू काय आहे,
हे समजून घेण्याचा प्रय} या अंकात.
पान 4-5 वर
जेएनयू कॅम्पसमधला लाइव्ह रिपोर्ट
आणि पान 3 वर
फक्त देशाच्या व्यवस्थेवरच नाही, तर एकूण लोकशाही मूल्यांवर आणि देशनिष्ठेवरच टीका करणा:या या कॅम्पसमधल्या तरुण मुलांना काही प्रश्न विचारणारा एक रोखठोक लेख..
 
 

Web Title: JNU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.