जेएनयू डावं, वेगळं आणि महत्त्वाचं का आहे?

By admin | Published: February 19, 2016 02:59 PM2016-02-19T14:59:45+5:302016-02-19T15:20:40+5:30

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना 1968-69 साली झाली. तो काळ असा होता की, जेव्हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अर्थ-राज-समाजकारण एका स्थित्यंतराच्या अवस्थेतून जात होतं.

JNU Dove, why is it different and important? | जेएनयू डावं, वेगळं आणि महत्त्वाचं का आहे?

जेएनयू डावं, वेगळं आणि महत्त्वाचं का आहे?

Next

 

 
 
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना 1968-69 साली झाली. तो काळ असा होता की, जेव्हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अर्थ-राज-समाजकारण एका स्थित्यंतराच्या अवस्थेतून जात होतं. शीतयुद्धाच्या प्रभावाखाली असलेल्या या काळात युरोपातही तरु ण विद्याथ्र्याची आपापल्या सरकारविरोधात आंदोलनं चालू होती. अमेरिकेत व्हिएतनामविरोधी वातावरण पेटलेलं होतं. आफ्रिकी-अमेरिकी जनतेचा आपल्या हक्कांसाठी संघर्ष चालू होता. जगभरात जुन्या नेत्यांचा, पिढीचा प्रभाव ओसरू लागला होता. दुस:या महायुद्धानंतर जन्माला आलेली नवी पिढी जुनाट, परंपरागत समाजाला अनेक नवनवे धक्के देत होती. या बदलत्या काळाचं प्रतिबिंब त्या काळातल्या सिनेमा, साहित्य, संगीतात अगदी ठळकपणो दिसून येतं. इकडे भारतीय राजकारणात  त्याकाळी ‘गुंगी गुडिया’ मानल्या जाणा:या इंदिरा गांधी कॉँग्रेस पक्षावर आणि सरकारवर आपला जम बसवण्याच्या प्रयत्नात होत्या. कॉँग्रेस पक्षातील प्रस्थापितांना इंदिरा गांधींचं नेतृत्व मान्य होत नव्हतं. याच काळात अनेक नव्या समाजघटकांना लोकशाहीतील आपल्या महत्त्वाची जाणीव जागृती होऊ लागली होती. दलित पॅँथर, स्त्रियांच्या चळवळी याच काळात जोर पकडू लागल्या होत्या. अशा पूर्णपणो प्रस्थापितविरोधी वातावरणात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा जन्म झाला होता. 
 
*अतिशय खळबळजनक कालखंडात जन्माला आलेल्या या विद्यापीठाला आजूबाजूच्या राजकीय सामाजिक अस्वस्थतेपासून अलिप्त राहणं शक्यच नव्हतं. त्यातच सुरु वातीपासून या विद्यापीठात अतिशय उत्तम शिक्षक आणि बुद्धिमान विद्यार्थी येत गेले. रोमिला थापर, सर्वपल्ली गोपाल, शिशिर गुप्ता यांच्यासारखे आपापल्या विषयात मानदंड मानले जाणारे शिक्षक विद्यापीठात शिकवत होते. तिथे सुरु वातीच्या काळात येणारे अनेक विद्यार्थीसुद्धा तसेच बुद्धिमान होते. त्यापैकी अनेक जण पुढे देशाच्या राजकारणात (उदा. प्रकाश करत, डी. पी. त्रिपाठी), प्रशासन आणि परराष्ट्र सेवेत (ललित मानसिंग, सध्याचे परराष्ट्र सचिव जयशंकर), माध्यमांमध्ये (पी. साईनाथ), विद्यापीठांमध्ये गेले. असे उत्तम शिक्षक आणि विद्यार्थी असल्याने या विद्यापीठाचे देशाच्या शैक्षणिक क्षेत्नात कायमच भरीव योगदान राहत आले. जेएनयूत प्रवेश मिळणं ही त्यामुळेच एक प्रकारची अचिव्हमेण्ट मानली जाऊ लागली.
 
*जेएनयूच्या या बुद्धिमान, संवेदनशील आणि राजकीयदृष्टय़ा जागृत वातावरणात सत्तर आणि ऐंशीच्या दशकात एक प्रकारचा डावीकडे झुकलेला आदर्शवाद विकसित होत गेला. विद्यापीठ दिल्लीत असल्याने तेथील चर्चाना, अभ्यासाला, आदर्शवादाला कायम राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय संदर्भ असत. त्यातूनच विद्यापीठातील शिक्षक आणि विद्यार्थी त्यावेळेस दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदी गो:या राजवटीविरु द्ध आंदोलनं, पॅलेस्तिनी  अरबांचा लढा, आफ्रिकेतील पोर्तुगीज साम्राज्यवादविरोधी, व्हिएतनाम युद्धाविरोधी मोर्चे यात सक्रि य सहभाग घेत असत. आंतरराष्ट्रीय पातळीवर या सर्व लढय़ांना सोव्हिएत रशियाचा पाठिंबा मिळत असे. 
* त्या काळात देशातील वातावरणसुद्धा डावीकडे झुकलेले होते. परिणामी सर्व प्रकारच्या (आर्थिक आणि धार्मिक मूलतत्त्ववादी) उजव्या प्रवृत्तींना विरोध हे जेएनयूच्या वैचारिक अवकाशाचं एक महत्त्वाचं वैशिष्टय़ बनलं. जेएनयूत लेफ्ट लिबरल (डाव्या उदारमतवादी) विचारवंतांचे गट तयार होत गेले. सौम्य डावे ते अति कडवे अशा सर्व छटांचे पुरोगामी आणि डावे गट तिथे तयार झाले. त्यांच्यात नेहमीप्रमाणो अनेक विषयांवर मतभेद होत राहिले. मात्न या सगळ्यांचे उजव्या प्रवृत्तींना विरोध करण्याबाबत एकमत राहिले. डाव्यांची शक्ती विविध लहान सहान गटांत विभागली जाऊनसुद्धा डाव्यांना सशक्त आव्हान देऊ शकेल असा उजव्यांचा गट उजव्यांच्या जेएनयूत कधीच तयार होऊ शकला नाही. त्यामुळे अभाविपसारखी विद्यार्थी संघटना कधीच जेएनयूत मूळ धरू शकली नाही.
 
* जेएनयूचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तिथले विद्यार्थी संघटनांचे राजकारण. देशातील सर्व विद्यापीठांना हेवा वाटावा अशी परंपरा जेएनयूच्या विद्यार्थी राजकारणाला आहे. जेएनयूतल्या निवडणुका विद्यार्थीच पार पाडतात. त्यासाठीची एक व्यवस्थित यंत्नणा जेएनयूत वर्षानुवर्षाच्या परंपरेतून तयार झालेली आहे. तिथं होणा:या  निवडणुका हा दिल्लीतील चर्चेचा विषय असतो. तेथील विविध संघटनांचे अध्यक्षीय उमेदवार अमेरिकी निवडणूक प्रणालीप्रमाणो एकमेकांशी जाहीर चर्चा करतात. या चर्चा रात्न रात्न चालतात आणि त्या ऐकायला दिल्लीतील विद्यापीठाच्या बाहेरील लोकसुद्धा येतात. जेएनयूतल्या विद्यार्थी राजकारणाचे राजकीय पक्षांशी घनिष्ठ संबंध असतात. त्यामुळे प्रचार कसा करावा इथपासून ते अध्यक्षीय उमेदवार कोण असावा इतर्पयत राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप असतो. या निवडणुका हा इथला एक अतिशय इंटरेस्टिंग इव्हेण्ट असतो.
 
* कोणत्याही प्रकारच्या सेन्सॉरशिपचा विरोध इथे होतो. त्यामुळे पुस्तके, सिनेमे, अन्नपदार्थ यावरील बंदीच्या विरोधात इथे कायम आवाज उठवला जातो. अतिशय स्फोटक विषयांवर चर्चा होतात, फिल्म्स दाखवल्या जातात. तिबेट, इस्रायल, अमेरिका, काश्मीर, ईशान्य भारत, नक्षलवाद, अण्वस्त्ने, फाशीची शिक्षा अशा विषयांबाबत प्रस्थापित मताला विरोध करणारे, वादग्रस्त भूमिका घेणारे गट जेएनयूत नेहमीच राहत आले आहेत. 
 
* जेएनयूच्या या वातावरणात एक प्रकारचा प्रस्थापित विरोध ठासून भरलेला आहे. दुस:या बाजूस डाव्या आणि पुरोगामी गटांना वैचारिक ऊर्जा देणारे केंद्र म्हणून जेएनयू कायमच भाजपा आणि संघाच्या रडारवर आहे. त्यातच 2क्14 मध्ये मोदी सरकार आल्यापासून जेएनयू वेगवेगळ्या परंतु चुकीच्या कारणामुळे चर्चेत आहे. 
 
 
- संकल्प गुर्जर
साऊथ एशियन युनिव्हर्सिटी, दिल्ली
 

Web Title: JNU Dove, why is it different and important?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.