जिम लावताय? या गोष्टी तपासल्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 03:39 PM2018-11-22T15:39:53+5:302018-11-22T15:40:18+5:30

जिम लावलं की झटकेपट रिझल्ट हवेत म्हणून नेमक्या काय काय चुका होतात?

joined Jim? Have you checked these things? | जिम लावताय? या गोष्टी तपासल्या का?

जिम लावताय? या गोष्टी तपासल्या का?

Next
ठळक मुद्दे यावर्षी जिम लावणार असाल, व्यायामाला सुरुवात करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा!

- प्रज्ञा केळकर-सिंग

थंडीची चाहूल लागली की, पहिला विचार आपल्या मनात येतो, आता व्यायाम करायला हवा! यंदा करायचंच फिटनेसवर काम अशी ऊर्मी मनात अशी उसळी मारते की लगेच जवळपास जिम आणि व्यायामशाळांची शोधाशोध सुरू होते. कुणाला कधीची सायडिंगला लावलेल्या सायकलची याद येते तर कुणी धावणं हाच सर्वोच्च व्यायाम हे ग्यान गूगलवर प्राप्त करून आता उद्यापासून पळूच असं म्हणू लागतं. कुणी योगक्लासला लगेच अ‍ॅडमिशन घेऊन टाकतं; मात्र व्यायाम निवडताना आपण योग्य तेच करू आणि चुकीचा मार्ग अवलंबला जाणार नाही, चुकीचं डाएट घेतलं जाणार नाही, व्यायामाचा निर्णय हा केवळ अळवावरचं पाणी ठरणार नाही, याची काळजी पण घ्यायलाच हवी.
व्यायाम मोहिमेचा अनेकदा घात होतो तो याच टप्प्यावर!
जिमला जायला सुरु वात केल्यानंतर आपल्यासारख्याच अनेक जणांना व्यायाम करताना पाहून नक्कीच प्रोत्साहन मिळतं. मात्न, एरव्ही नियमित व्यायामाची सवय नसल्यानं दोन-तीन दिवसांतच थकवा जाणवायला लागतो. काहीजण महिनाभर उत्साहाने जिमला जातात आणि एका महिन्यात वजनात कमालीचा फरक दिसावा अशी अपेक्षा करतात. त्यासाठी ओव्हर एक्सरसाइजही करायला लागतात; मात्न हा मार्ग घातक आहे असं फिटनेस एक्सपर्ट सांगतात.
त्यात अजून एक गैरसमज म्हणजे तरुणांचा व्यायाम वेगळा, तरुणींचा वेगळा. तो ही निव्वळ गैरसमज. व्यायामात स्त्नी-पुरु ष असा भेद नसतो. वेट ट्रेनिंग केवळ पुरु षांनी करावं आणि स्त्रियांनी केवळ कार्डिओ करावं हा निव्वळ भ्रम आहे. दोघांनाही कार्डिओ, झुंबा, वेट ट्रेनिंग प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे आवश्यक असते. 
त्यामुळे यावर्षी जिम लावणार असाल, व्यायामाला सुरुवात करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा!

प्रोटीन पावडर घेण्यापूर्वी.

जिम लावलं की बरेचदा प्रोटीन पावडर, सप्लिमेण्ट घ्या असं सांगितलं जातं. बॉडी बिल्डिंगला मदत होते असा सल्ला मिळतो. दुसरीकडे हे प्रोटीन सप्लीमेंट शरीराला अपायकारक  असतं अशीही चर्चा होते. मग त्यात खरं काय, तर फिटनेसतज्ज्ञ सौरभ साहू सांगतात, प्रोटीन पावडर आणि स्टिरॉइड यात मूलभूत फरक आहे. स्टिरॉइड सेवनाला भारतात परवानगी नाही; मात्र काही ठिकाणी प्रोटीनच्या नावाखाली स्टिरॉइडचं सेवन केलं जातं. ते शरीरास अपायकारक असते. याउलट, प्रोटीन योग्य प्रमाणात घेतल्यास शरीराला कोणताही अपाय होत नाही. शरीराची गरज भागविण्यासाठी प्रामुख्याने व्हे प्रोटीन एक्सट्रॅक्ट दिलं जातं. दूध फाटल्यावर वर उरलेल्या पाण्यामध्ये व्हे प्रोटीन असतं. ते शरीरास उपयुक्त असतं. दररोजच्या आहारातून जे घटक मिळू शकत नाहीत, ते सप्लीमेंटच्या माध्यमातून योग्य पद्धतीने दिले जातात; मात्र योग्य डॉक्टरच्या सल्ल्यानं ते घ्यावेत.

प्रोटीन किती लागतं शरीराला?
प्रत्येकाच्या व्यायाम पद्धतीवर प्रोटीन सेवनाचे प्रमाण ठरते. फारसा व्यायाम न करणार्‍यासाठी पाउण्डमधील वजन गुणिले 1 इतके ग्रॅम प्रोटीन दिवसाला आवश्यक असतं. मध्यम व्यायाम करणार्‍यासाठी पाउण्डमधील वजन गुणिले दीड ग्रॅम तर दररोज भरपूर व्यायाम करणार्‍यासाठी पाउण्डमधील वजन गुणिले दोन इतकं ग्रॅम प्रोटीन दर दिवशी आवश्यक असतं. सुरु वातीचे व्यायाम प्रकार सर्वासाठी सारखे असतात. हळूहळू त्यात लेव्हल 1, 2, 3 प्रमाणे बदल केले जातात.
हिवाळ्यात वातावरणही आल्हाददायक असतं. डिहायड्रेशन कमी होतं. त्यामुळे अनेक जण उत्साहाने व्यायामाला सुरु वात करतात. हा उत्साह मात्न कायम टिकायला हवा, तरच फिटनेस मिळविता येऊ शकेल. व्यायाम आणि आहार यांचा योग्य समन्वय साधायला हवा. दोन्ही परस्परपूरक ठरावे यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. चुकीचे व्यायाम प्रकार आणि अयोग्य डाएट शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकतं. 
- सौरभ साहू
( फिटनेस एक्सपर्ट)

डाएट प्लॅन करताय?
 वजन वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी व्यायामाला योग्य पोषक आहाराची जोड आवश्यक असते. जिममधून व्यायाम करताना डाएटिशियनकडून बरेचदा टोकाचं डाएट सुचवलं जातं. बरेचदा दोन-तीन महिन्यांचा एखादा कोर्स करून हे तथाकथित डाएटिशियन जिमशी जोडले जातात. एखादा पदार्थ आहारातून पूर्ण हद्दपार केला किंवा एकाच पदार्थाचं जास्त सेवन केलं तर न्यूट्रिशन डेफिशियन्सी होऊ शकते. मुळात, आहाराचे नियोजन तात्पुरते करून चालत नाही. त्यासाठी आपली शरीराची ठेवण, बॉडी मास इंडेक्स, फॅमिली हिस्ट्री, मानसिकता अशा अनेक बाबींचा विचार करून तज्ज्ञ डाएटिशियन आहार सुचवितात. आहाराचा विचार असा करायला हवा.
- डॉ. अर्चना रायरीकर, 
आहारतज्ज्ञ

Web Title: joined Jim? Have you checked these things?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.