जोक मारला, इतकं काय त्याचं?
By Admin | Published: April 14, 2016 05:57 PM2016-04-14T17:57:25+5:302016-04-14T17:59:03+5:30
व्हॉट्सअॅप ग्रुप हा प्रकार अस्तित्वातच नव्हता, ट्विटर, फेसबुक नव्हतं, आपल्याला मतं फुटलेली आहेत हेच ज्या तारुण्याला माहिती नव्हतं तेव्हा वेळ कसा घालवत असतील ते लोक? आता तर काय, निमित्त पाहिजे, एखाद्या विषयाच्या मागे असं काही हात धुवून लागतात पोरं, की ज्याच्या मागे लागलेत तो माणूस आणि तो विषय पुरते हैराण-परेशान होऊन जातात. इतके पिडले जातात की जीव नको होतो.
>
व्हॉट्सअॅप ग्रुप हा प्रकार अस्तित्वातच नव्हता, ट्विटर, फेसबुक नव्हतं, आपल्याला मतं फुटलेली आहेत हेच ज्या तारुण्याला माहिती नव्हतं तेव्हा वेळ कसा घालवत असतील ते लोक? आता तर काय, निमित्त पाहिजे, एखाद्या विषयाच्या मागे असं काही हात धुवून लागतात पोरं, की ज्याच्या मागे लागलेत तो माणूस आणि तो विषय पुरते हैराण-परेशान होऊन जातात. इतके पिडले जातात
की जीव नको होतो. ते पुरेसे पकले की, मग हे एक्सपर्ट कमेण्टणार, अरे, हे सगळं स्पोर्टिगली घ्यायचं असतं, गंमत केली यार!
व्हॉट्सअॅप ग्रुपवर चालणा:या ‘ट्रोलिंग कम टाइमपास’चा सतत चालणारा ‘पकाव’ रवंथ
अनुष्काचं व्हॉट्सअॅप स्टेटस : कसं खेळतंय माङया पिंज:यातून उडालेलं पाखरू.
अनुष्का भाभी जब से गयी है, विराट भय्या का हाथ बहुत चल रहा है.
अनुष्काचा उखाणा: ऑस्ट्रेलियाच्या बैलांना चारा घालते वाकून, विराट रावांचे नाव घेते 6 गडी राखून..
पंधरा मिनिटात पन्नासेक मेसेजस येऊन धडकले..
आपण म्हणजे भारत जिंकल्याच्या जल्लोषात. एका ग्रुपमधून दुस:या ग्रुपमध्ये दात विचके चेहरे फॉरवर्ड करण्यात गुंतलो होतो आम्ही नेहमीप्रमाणो. हे नवीन आहे काहीतरी. कन्हैयाकुमारचा एनीवे कंटाळा येत चालला होता. कोणो एकेकाळी सरदारजी असायचा दर दिवसाआड प्रत्येकाच्या इनबॉक्समध्ये. अधूनमधून पप्पू आणि त्याचे पप्पा फिरायचे वे टू एसएमएसवरून. पण मग सगळंच बोअर व्हायला लागतं नंतर. सृष्टीचा नियमच आहे ना तसा.
मग लोकांनी अलोकनाथला पुनर्जीवित केला. तोंडी लावायला राखी सावंत आणि पूनम पांडे. पण आजूबाजूला सतत घटना घडत असतात. घडवून आणल्या जात असतात. आपल्या वैयक्तिक मतं आणि भावनांच्या थिअरीज बनवल्या जातातच आणि तोंड उघडून व्यक्त होणं (किंवा फेसबुकवर शोधनिबंध टंकणं) हा अधिकार जन्मताक्षणीच फ्री ऑफ कॉस्ट मिळाला असल्याने आपल्या अफाट बुद्धिमत्तेची चुणूक दाखवायची संधी सोडत नाहीच कुणी.
आता आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधल्या निळ्या, लाल, भगव्या पोरांना कुणी जेलमध्ये टाकत नाही आणि कॉलेजमधल्या वैचारिक कट्टय़ांवर बौद्धिक टवाळक्या टाकायलाही कुणी आमंत्रण देत नाही.
But that doesn't keep us from expressing and reacting.
मग कुणीतरी एखादा आझादीचा नारा फॉरवर्ड करतो. पाठोपाठ तुलसी विराणी-ईराणी यांच्या भाषणाची लिंक येते. प्रत्युत्तरादाखल कवी कन्हैयाकुमार उद्घृत केला जातो. मग कुणीतरी ब्राrाण्यवादी अशी जातिवाचक शिवी हासडतं. हे सगळं तुंबळ युद्ध सुरू असताना एखादा सहिष्णूवादी आमच्यापैकी प्रत्येकाला पर्सनल वर, ‘‘हो हो. तुझं बरोबर आहे. मी सहमत आहे तुङयाशी’’ असं आश्वस्त करत असतो. दुस:या दिवशी सोमवार असल्याने शेवटी मग गुड नाइटच्या मालिकांनी दिवस मालवतो.
एकुणात काय, वैचारिक आदानप्रदान ऊर्फएकमेकांना पिडत राहणं यात छान वेळ जातो आमचा. ग्रुप हा प्रकार अस्तित्वातच आला नव्हता तेव्हा वेळ कसा घालवत असतील लोक?
अर्थात आमचा ग्रुप फक्त असल्या टाइमपास गोष्टींवरच चर्चा करतो असं नाहीये. अनेक अत्यंत महत्त्वाच्या आणि नाजूक मुद्दय़ांना हात घालतो आम्ही. वीकेंडला तळजाईवर जायचं की कामशेतला? मग अम्या लगेच टाईप करतो. तुळजाई. त्यावर त्याचं मत खोडून काढणारे अभ्यासपूर्ण मुद्दे मांडतात एकेक.
‘‘तुझी आयटम तर नाहीये अम्या, मग कुणाला घेऊन जायचंय तुला तिकडे?’’
‘‘तुङया हनिमूनला तू जा हं तिकडे.’’
.. ‘‘मला की नै आठला पुनर्वसू पाहायचं असतं. त्यामुळे जवळच जाऊ.’’
बाळ अमेय, तुङया वजनाने टेकडी खाली यायची बाबा.’’
यावर पिंकी, रिंकी, गुड्डी, छोटी हसरे चेहरे पाठवतात वेगवेगळे.
मग अमेय गप्प होतो. ‘‘ऐकून घ्यायचं नसेल तर विचारतातच का?’’ असले बावळट, नॉन इंटलेक्च्युअल प्रश्न पाडून घेत ‘एक्ङिाट ग्रुप’च्या बटणापाशी घुटमळत राहतो. कधीतरी सोडतोही ग्रुप. दहाव्या मिनिटाला पुन्हा अॅड केलेलं असतं त्याला. एव्हाना अम्याची जागा सोम्याने घेतलेली असते. मग अम्याही सगळ्यांसोबत सोम्याची (इंटलेक्च्युअली) घेत राहतो. त्याच उत्साहाने आणि चैतन्याने. मघाची त्याची दहा मिनिटं आता सोम्याला देऊन टाकतो तो उदार होऊन. मग सोम्याची जागा गोम्या घेतो, गोम्याची जागा पम्या. आणि या आनंददायी, बुद्धिवर्धक काव्य, शास्त्र, विनोदात आम्हा बुद्धिवंतांचा वेळ मजेत जातो.
आणि सगळ्याच्या शेवटी हे सगळं घेतलं जाणं, स्पोर्टिगली घ्यायचं असतं ही शिकवण द्यायला विसरत नाही कधीही आम्ही. त्यामुळे लाल रंगवाल्याला विरोध करताना भगवा रंगवाला लालवाल्याच्या एखाद्या व्यक्तिगत गोष्टीचं भांडवलीकरण करत एक चिमटा काढतो. लालवाला कळवळून मग निळ्यावाल्याला बोचकारतो. आणि हे असं करताना न चुकता एकमेकांच्या अकलेचं तोंडभरून कौतुक करतो आणि एकमेकांच्या आई आणि बहिणींची आस्थेने विचारपूसही करतो. आपापले मुद्दे शांत आणि संयतपणो मांडत असतो आम्ही.
हे सारं असं घडत असताना आमच्या ग्रुपमध्ये असूनही नसल्यासारखं करणारी काही मंडळी आहेत. ही मंडळी नेहमीच उदास आणि उदासीन असतात यार. ते कधीच कुठल्याच ‘इझम’वरून वाद घालत नाहीत. कधीही कुठल्याही वादाचा ‘इझम’ करत नाहीत. यांच्या तलवारी कायम म्यानातच असतात. त्यांचं कधीच काही म्हणणं/स्टॅण्ड/ व्हय़ू पॉईण्ट/ विचारप्रवाह/धारणा/श्रद्धा/भक्ती असलं काही नसतं. होऊ बोअरिंग. त्यांना आम्ही पॉलिटिकली करेक्ट पांढरपेशे, पापभिरू किंवा सभ्य भाषेत बुळ्या असं संबोधतो. त्यांना आमच्या वैचारिक चळवळीत सहभागी करून घ्यायचे आम्ही अनेक प्रयत्न करतो. असे रंगहीन, कंटाळवाणो लोक सगळीकडे असतात राव. एकतर ते कॉलेजमध्ये फी भरून शिकायला वगैरे येतात. शिवाय ते फिजिक्सच्या वर्गातही बसलेले असतात आणि पॉलिटिकल सायन्सच्याही! बीइंग देअर टीचर, त्यांना चहा आणि सुट्टा पाजत वेगवेगळ्या रंगांची नव्याने ओळख करून द्यायचा प्रयत्न करतात आमच्यातले अनेकजण. काहीजण आमच्या ग्रुपमध्ये येतात. व्हॉट्सअॅपवर आता 256 जणांना अॅड करता येतं ग्रुपमध्ये. त्यामुळे आम्ही नव्या मेंबर्सना नेहमी वेलकम करतो. पण काहीजण मात्र सॅडच राहतात. 100 वरून 256 केली लिमिट तरी यांना त्याचं काही नाही. एकटेच फिरत राहतात. असलेच ग्रुपमध्ये तरी ब्ल्यू टिक्स दाखवतात फक्त. फेसबुकवरच्या उद्बोधक पोस्टमधूनही स्वत:ला अनटॅग करून घेतात. आम्ही ज्ञानाचा एवढा वर्षाव करत असतो अहोरात्र मेहनत घेऊन. (कन्हैयाकुमारमुळे तर चहा आणि सिगारेटवर दुप्पट खर्च व्हायला लागलाय राव.) हे मात्र फक्त स्क्रोल डाउन करणार. शेवटी न राहवून आमच्यातलं कुणी पर्सनलवर चार मोलाचे शब्द सांगायला गेलंच तर त्याला ब्लॉक केलं जातं सरळ!! ही असहिष्णूता नाही का? ‘‘रंग माझा वेगळा’’ असलं काहीबाही वाटत असावं यांना. अहो, रंग वेगळा असला तरी तो कुठलाय हे माहीत असावंच लागतं.
असो. एक ना एक दिवस यांनाही यावं लागेलच आमच्यात.
तर अशा रीतीने सगळं छान, आलबेल सुरूये आमचं.
विराट कोहली पेटलाय म्हणो अनुष्का शर्माला टार्गेट केलं म्हणून..
अम्या पुन्हा ‘‘कोहलीचं बरोबर आहे’’ असलं काहीतरी पचकला आहेच.
‘‘अरे जोक होते ते. इतकं काय त्याचं?’’ असे सूर आळवायला लागलेत काहीजण..
जरा बघायला हवंय.
तुम्हीही बघा हं तुमच्या आसपास. नीट, उघडय़ा डोळ्यांनी..
बघा, बघत राहा की आपण कसे इतरांना ट्रोल करतोय आणि ट्रोलिंग कसं आपल्यामागे लागलंय.
आणि मग म्हणा, त्यात काय एवढं, जोक होता यार.
ट्रोल किंवा ट्रोलिंग म्हणजे काय?
खरंतर सोप्या मराठीत सांगायचं तर एखाद्या मागे हात धुवून लागणं म्हणजे ‘ट्रोल’ प्रकरण.
फक्त इथे ‘त्या’ एखाद्याला पिडणारे हे ऑनलाइन असतात आणि आपापल्या हातातल्या मोबाइलच्या साहाय्याने किंवा टॅब कम्प्युटरवरून ते एखाद्या माणसाच्या मागे हात धुवूनच नाही तर पार साबण-हॅण्डवॉश-डिटर्जण्ट घेऊन एखाद्याच्या मागे लागणं आणि त्याला पिडणं, छळणं, खिल्ली उडवणं, अपमानास्पद कमेण्ट करणं, जोक तयार करकरून ते व्हायरल करणं, हॅशटॅग तयार करून तो विषय, ती व्यक्ती, ऑनलाइन जगात सतत थट्टेचा, टिंगलीचा विषय बनत राहीन अशा पद्धतीनं तो हॅशटॅग वापरणं.
काहीजण हे ट्रोलिंग स्वत:हून करतात, बदला घेतात किंवा अपमानास्पद टिंगल करतात, पण काहीजण आपण व्हायरल करत असलेला मजकूर कसा आहे याची खातरजमा न करताच त्या ट्रोलिंगचा भाग होतात.
उदाहरणार्थ अलीकडेच व्हायरल झालेले अनुष्का शर्माचे जोक्स. जे काहींनी बनवले असतील पण हजारो लोकांनी ते फॉरवर्ड केले आणि मिटक्या मारत त्या जोक्सचा आनंद घेतला.
आशिष नेहरा जुनाट नोकिया मोबाइल वापरतो म्हणून त्याला किती जणांनी ऑनलाइन पिडला.
मात्र हे सारं सेलिब्रिटींपुरतंच मर्यादित नसतं.
आपल्या सगळ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये, कधी ना कधी आपल्यालाही असंच घेरलं जातं. कधी काही तास, कधी काही दिवस. किंवा कायम एखाद्या सवयीवरून आपली पुरती र्हुे उडवली जाते. फेसबुकवर आपले फोटो, आपली मतं यावर काही लोकं कायम विरोधी, तुसडय़ा टिप्पण्या करतात, कायम आपल्याला घेरतात किंवा कायम टीका करतात.
हे सारं म्हणजे ट्रोलिंग.
आणि सध्याच्या काळात हे ट्रोलिंग ही एक फार मोठी गंभीर समस्या बनत चाललेली आहे.
इतकी की, सायबर गुन्ह्याअंतर्गत या ट्रोल करणा:यांविरोधात अशा ‘छळकुटय़ा’ लोकांवर गुन्हा दाखल करता येऊ शकतो का, अशी चाचपणी सुरू झाली आहेच.
आणि आपल्याचकडे नाही तर जगभरात हा प्रश्न गंभीर आहे आणि विशेषत: मुली, महिलांना याचा सामना अधिक करावा लागतो आहे.
थट्टामस्करीच्या नादात आपण एखाद्याला जगणं नको होईस्तोवर पिडतो आहोत, अपमान करतो आहोत याचं भानच जिथं सुटतं आहे ते म्हणजे ट्रोलिंग!
ट्रोलिंगचे हकनाक बळी
1) गेल्या काही दिवसांत ट्रोलिंगचा सर्वाधिक त्रस अनुष्का शर्माला झाला. विराट कोहली आणि अनुष्काच्या प्रेमप्रकरणावरून, विराटच्या आल्या-गेल्या फॉर्मवरून प्रचंड टीकाटिप्पणी, जोक्स व्हायरल झाले.
इतके की ‘शेम ऑन यू’ असं जाहीर म्हणत विराटने सगळ्यांना चार शब्द सुनावले.
आचकट-पाचकट जोक्स आणि अपमानास्पद टीका हे या ट्रोलिंगचं अत्यंत घातक चित्र होतं.
2) आशिष नेहरा, हा याच दरम्यान ट्रोलिंगचा शिकार ठरला. तो जुनाट फोन वापरतो या एका गोष्टीवरून अनेकांनी त्याच्यावर सुमार टीका केली. तेच त्यानं बांग्लादेशच्या मॅचमध्ये पांडय़ानं टाकलेल्या शेवटच्या ओव्हरला केलेलं मार्गदर्शनही अनेकांच्या टिंगलीचा विषय बनलं.
3) दिल्लीच्या एक पोलीस ऑफिसर मोनिका भारद्वाज यांना दिल्लीच्या एका केसच्या संदर्भात असंच दिल्लीकरांनी ऑनलाइन ट्रोल करकरत छळलं.
4) भारत-पाकिस्तानच्या मॅचला अन्य सेलिब्रिटींसह उपस्थित असलेल्या अभिषेक बच्चनलाही ‘अननोन सेलिब्रिटी’ म्हणत ऑनलाइन टार्गेट करण्यात आलं.
5) आमीर खान, दिया मिङर, श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर, हर्षा भोगले हे सारेच गेल्या काही दिवसांत ट्रोलिंगने त्रसलेले दिसले.
6) देशाबाहेर पळून गेलेल्या मल्ल्यानं तर ऑनलाइन जगाला चक्क विनंती केली की, मला वाट्टेल ते बोला, पण माङया मुलाला टार्गेट करू नका.
- सागर पांढरे
(आपल्या तरुण जगण्यावर बारीक लक्ष असलेले लेखक स्वत: पीएचडी स्कॉलर आहेत.)
pandhare.05@gmail.com