थेट चीनसारख्या महासत्तेलाच आव्हान देणारा जोशुआ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 03:52 PM2019-08-22T15:52:05+5:302019-08-22T15:53:27+5:30

हा तरुण हॉँगकॉँगचा. वय वर्षे फक्त 22. हॉँगकॉँगचा स्वायत्ततेसाठी जो लढा सुरू आहे, त्या लढय़ाचा चेहरा बनलाय हा बारकुडा, बुटकासा मुलगा. लहानपणी डिसलेक्सियाच्या आजारानं त्रस्त झालेल्या या तरुणानं आता भल्याभल्यांचं गणित चुकवायला सुरुवात केली आहे. कोण तो?

joshua wong a face of hong kong protest against china | थेट चीनसारख्या महासत्तेलाच आव्हान देणारा जोशुआ

थेट चीनसारख्या महासत्तेलाच आव्हान देणारा जोशुआ

googlenewsNext
ठळक मुद्देहॉँगकॉँग लोकशाही हक्कासाठी भांडत आहे, आणि त्या लढय़ाचा चेहरा ठरला आहे जोशुआ वांग. वय वर्षे फक्त 22.

- निशांत महाजन

हॉँगकॉँगमध्ये सध्या स्वातयत्तेसाठी चीनविरोधी लढा सुरू आहे. आय अ‍ॅम फ्रॉम हॉँगकॉँग, नॉट चीन असे फलक लिहून जगभरात पसरलेले हॉँगकॉँगचे तरुण-तरुणी घेऊन फिरत आहेत. तसे शर्ट घालत आहेत.
हॉँगकॉँगमध्ये तर हजारो तरुण मुलं-मुली रस्त्यावर उतरून आपल्या स्वातंत्र्य आणि लोकशाही अधिकारांसाठी निदर्शनं करत आहेत. त्या प्रचंड मोठय़ा लढय़ाचा चेहरा बनलाय एक जेमतेम 22 वर्षाचा, बारकुडासा मुलगा. त्या मुलाच्या शांत चेहर्‍याकडे पाहून असं वाटतही नाही की एका महासत्तेच्या ताकदीला आव्हान देण्याचं बळ या लहानशा मुलात असेल?
मात्र तसं आहे. आणि जगभर या मुलाच्या हिमतीचीही चर्चा आहे. ‘ द फेस ऑफ द प्रोटेस्ट’-ैआंदोलनाचा चेहरा म्हणून तो जगभर गाजतो आहे.
त्याचं नाव जोशुआ वांग. हा फक्त 22 वर्षाचा तरुण आहे. एका साध्याशा मध्यमवर्गीय घरात तो वाढला. त्याचे वडील आयटीत नोकरी करायचे, तर आई वंचित मुलांना सेवासुविधा मिळाव्यात म्हणून काम करायची.
2019 र्पयत जोशुआचंही आयुष्य एकदम चारचौघांसारखंच नाकासमोर चाललं होतं. शाळेतही तो जेमतेम हुशार होता. कारण त्याला डिसलेक्सिया या आजाराचा त्रास होता. मात्र 2010 साली त्यानं पहिल्यांदा लोकशाही आंदोलनात सहभाग घेतला. 2014 मध्ये हे आंदोलन अधिक तीव्र झालं आणि एक मोठी चळवळ उभी राहिली. तिचं नाव अम्ब्रेला मुव्हमेण्ट. या चळवळीत जवळपास दोन महिने पूर्ण शहर ठप्प झालं होतं. त्या चळवळीचं नेतृत्वच जोशुआनं केलं. तेव्हा तो जेमतेम 19 वर्षाचाही नव्हता. मात्र त्याच्या नेतृत्वगुणाची चर्चा झाली. आणि जगप्रसिद्ध टाइम मॅगझिनच्या टीन्स स्पेशल मुखपृष्टावर तो पर्सन ऑफ द इअर म्हणून झळकला.
म्हणता म्हणता हॉँगकॉँगच्या लोकशाही आणि स्वायत्ततेसाठीच्या लढय़ाचा तो चेहरा बनत गेला. आंदोलन पेटतच होतं. ऑनलाइन जगातही त्याला पाठीराखे मिळत होते तर टीकाकारही. त्याच्यावर टीकाही जोरदार होते. सायबर बुलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र कशाचाही त्याच्या स्थिर चित्त प्रकृतीवर काहीही परिणाम होत नाही. एवढंच नव्हे तर 2017 साली त्याला अटक झाली. खटला दाखल होऊन शिक्षाही झाली. मात्र 2018 ला त्याची मुक्तताही करण्यात आली.
जोशुआच्या जगण्याविषयी, संघर्षाविषयी एक डॉक्युमेण्टरीही 2017 मध्ये प्रसिद्ध झाली. तिचं नाव, अ टीनएजर व्हर्सेस सुपर पॉवर. 
एका कोवळ्या पोरानं थेट चीनसारख्या महासत्तेलाच आव्हान देणं हे किती थरारक आणि तरीही धोकेदायक असू शकतं याचा प्रवास हा माहितीपट सांगतो. पुढे नेटफ्लिक्सवरही ती रीलिज करण्यात आली.
अजूनही जोशुआचा लढा सुरूच आहे. हॉँगकॉँग लोकशाही हक्कासाठी भांडत आहे, आणि त्या लढय़ाचा चेहरा ठरला आहे जोशुआ वांग. वय वर्षे फक्त 22.
मात्र त्याची जिगर मोठी आहे.

 

Web Title: joshua wong a face of hong kong protest against china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.