Judgement & decision making - वेळेत आणि अचूक निर्णय घेण्याची कला शिकलात की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 07:20 AM2020-01-16T07:20:00+5:302020-01-16T07:20:01+5:30

जजमेंट अ‍ॅण्ड डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णयक्षमता. काही प्रश्न निर्णय न घेतल्यानेच सुटतात असं म्हणायचे दिवस गेले. धडाडीनं निर्णय घेणं, वेळेत घेणं आणि ते राबवणं हेच मोठं स्किल आहे.

Judgement & decision making - Art of taking timly decision!Judgement & decision making - art of taking timely decision, makes a perfect career. | Judgement & decision making - वेळेत आणि अचूक निर्णय घेण्याची कला शिकलात की नाही?

Judgement & decision making - वेळेत आणि अचूक निर्णय घेण्याची कला शिकलात की नाही?

Next
ठळक मुद्देजॉब टिकवणं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यशस्वी करिअर करणं हे एक आव्हान असू शकतं. ते आव्हान स्वीकारायचं तर आपल्याकडे काही खास कौशल्यं हवीत? तेच  सांगणारा  ऑक्सिजनचा  विशेष  अंक 

अतुल कहाते,  डॉ. यश वेलणकर


परिस्थितीचं योग्य मूल्यांकन करू शकणार्‍या माणसांना कंपन्या पटापट वरच्या पदांवर पाठवतात. याचं कारण म्हणजे अमुक परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं याची जाण येणं तसं सोपं नसतं. दैनंदिन कामांमध्ये आपल्यासमोर अनेक अडचणी उभ्या ठाकतात. काहीजण या अडचणींचा डोंगर होईर्पयत नुसताच विचार करत बसतात किंवा काळजीमध्ये बुडून जातात. या उलट काही कृतिशील माणसं मात्न या अडचणींचा सामना निधडेपणानं करतात. त्यातून काय होऊ शकेल या विविध शक्यतांचा ते विचार करतात. शेवटी काही अंदाज मनाशी बांधून ते अडचण सोडवण्यासाठीची कृती करून टाकतात. सारासार विचार न करता काही लोक या मार्गानं जातात आणि त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात; पण जे लोक सगळ्या शक्यता विचारात घेऊन पाऊल टाकतात त्यांना मात्न वेगानं बढती मिळत जाते.
कुठल्या परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं हे कुठेही शिकवलं जात नाही. ते तसं शिकवणं शक्यही नाही. अनुभवातून माणूस ते काही प्रमाणात शिकत जातो. बरेचदा आपलं मन काय म्हणतं आहे आणि आत्तार्पयतचा इतिहास काय सांगतो, यानुसार निर्णय घ्यावे लागतात. हे काम अजिबातच सोपं नाही. त्यात प्रचंड आव्हानं आहेत. त्यात चुका होऊ शकतात. म्हणजेच तरीही निर्णय घेऊन ते अंमलात आणण्यासाठी संबंधित माणसाकडे धाडस असावं लागतं.
खरं म्हणजे दैनंदिन आयुष्यातच आपण असंख्य बाबतींमध्ये बारीकसारीक निर्णय घेत असतो. आत्ता रस्ता ओलांडायचा का नाही, आज डबा न्यायचा का नाही, आज लवकर झोपायचं का नाही, अशा हजारो गोष्टी आपण सहजपणे करत असतो. हेच काम अधिकृतपणे आपल्यावर सोपवलं गेल्यावर मात्न आपण गांगरून जातो. अमुक ग्राहकाला फोन करायचा का नाही, हे उत्पादन बाजारात आणायचं का नाही, झालेली चूक वरिष्ठांना सांगायची का नाही, असे प्रश्न समोर उभे ठाकले की अनेक लोक पार कोलमडून पडतात. अशावेळी ‘कुठलाच निर्णय न घेणं हाच एक निर्णय असतो’ असं म्हणण्याचीही एक पद्धत असते. खरोखरच काही प्रसंगांमध्ये काहीच न करणं योग्य ठरूही शकतं; पण दरवेळी तसं करण्यातून मोठे धोकेही निर्माण होतात. सगळ्या गोष्टी नीटपणे टिपत राहणारा माणूस यातूनच हळूहळू ‘कॅल्क्युलेटेड रिस्क्स’ घ्यायला शिकायला लागतो. प्रत्येक माणसाची धोके पत्करण्याची क्षमताही भिन्न असू शकते. एखादा माणूस धडाडीनं मोठा निर्णय घेऊन मोकळा होत असल्याचं बघून दुसर्‍या एखाद्या माणसाला पार घाबरून जायला होतं. अशा सगळ्या छटा निर्णय प्रक्रि येमागे असल्या तरी प्रसंगानुरूप निर्णय घेणं आणि तो अंमलात आणणं हे अत्यंत महत्त्वाचं कौशल्य ठरणार, यात शंका नाही.


त्यासाठीची मानसिक कौशल्यं  कशी कमवायची?


1. आपण रोज अनेक निर्णय घेत असतोच. पण अनेकजण मोठे निर्णय घ्यायला घाबरतात. त्यापासून पळायचा प्रय} करतात, ते टाळतात, त्यानं तणाव वाढतो आणि परिस्थिती बदलत नाही.
2. जितके पर्याय जास्त तितके निर्णय अधिक.
3. निर्णय घेताना वर्तमान स्थिती जाणून भविष्याचा अंदाज बांधावा लागतो. निर्णय घ्यायचा म्हणजे अनेक पर्यायातील एक पर्याय निवडायचा. असं करताना आपण काहींना काही किमत मोजावी लागते. धोकाही पत्करावा लागतो.
4. मात्र त्यामुळेच निर्णय घेताना कोणत्याही भावनिक कृती किंवा उतावीळपणा टाळला पाहिजे.
5. निर्णयक्षमता वाढविण्यासाठी आपण रोज छोटेमोठे निर्णय घेण्याचा सराव करायला हवा. तज्ज्ञ व्यक्तीचा, मित्नमंडळीचा सल्ला घ्यायला हवा; पण हा माझा निर्णय आहे ही जबाबदारी स्वीकारायला हवी.
6. जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल दुसर्‍यांना दोष देत न राहता तो निर्णय बरोबर ठरवण्यासाठी मेहनत घ्यायला हवी. 

Web Title: Judgement & decision making - Art of taking timly decision!Judgement & decision making - art of taking timely decision, makes a perfect career.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.