जंबो

By admin | Published: June 24, 2016 06:34 PM2016-06-24T18:34:16+5:302016-06-24T18:36:55+5:30

It was one of the bravest things I've seen on the field of play," said Viv Richards - असं सर वीव रिचर्ड्स यांनी ‘त्याच्या’विषयी म्हणावं यातच सारं आलं खरंतर!

Jumbo | जंबो

जंबो

Next
>-चिन्मय लेले
It was one of the bravest things I've seen on the field of play," said Viv Richards
 
- असं सर वीव रिचर्ड्स यांनी ‘त्याच्या’विषयी म्हणावं यातच सारं आलं खरंतर! वेस्ट इंडिज आणि भारताची टेस्ट मॅच. २००२ ची गोष्ट. अ‍ॅटिंग्वा टेस्ट म्हणून आता इतिहासात तिची नोंद आहे. त्या मॅचमध्ये लढाई अटीतटीची होती. समोर ब्रायन लारा नावाचा झंझावात बॅटिंग करत होता. आणि अशा स्थितीत जबडा पार फाटलेला असताना, चेहºयाला बॅँडेज बांधून आणि वेदना सहन करतच ‘तो’ मैदानात उतरला. सलग १४ ओव्हर्स त्यानं अशा अवस्थेत बॉलिंग केली. आणि ब्रायन लाराची विकेट घेतलीच. 
ती मॅच ड्रॉ झाली पण तो आणि त्याचा भारतीय संघ मात्र जिंकलेले होते, अनेकांची मनं त्यांनी जिंकून घेतली. आणि त्याच्या धाडसाची, धैयाची आणि संयमाची झलक साºया क्रिकेट जगानं पाहिली.
त्या मॅच नंतर तो म्हणाला होता की, ‘ मला दुखापत झाली होती, आॅपरेशन करावं लागणारच होतं. पण म्हणून मी नुस्ता पॅव्हिलियनमध्ये बसून राहत संघ हारताना पाहू शकत नव्हतो. हरलो तरी आपण प्रयत्न पूर्ण केले ही भावना तरी मला हवीच होती, म्हणून मी मैदानात उतरलो..!’
तेव्हा जबड्याला बॅँडेज बांधून मैदानात उतरलेला तो -जंबो!
आज नवे पॅड्स बांधून पुन्हा एका नव्या इंनिंगसाठी मैदानात उतरलेला आहे. लिमिटेड ओव्हरची, वर्षभराचीच आहे ही सध्याची इंनिंग. आणि त्याचीच विकेट कशी जाईल हे पहायला टपून बसलेत लोक, तरीही त्यानं जिद्दीनं जबाबदारी उचलत मैदानात उतरायचं ठरवलंय!
त्याचीच, अर्थात अनिल कुंबळेची ही गोष्ट!
ज्याला सारं क्रिकेट जग जंबो म्हणूनच ओळखतं.
इतका सरळ साधा माणूस की त्याचे चेंडूही कधीही फारसे वळले नाहीत अशी वारेमाप टीका झाली त्याच्यावर आजवर! पण म्हणून त्यानं सभ्य, शांत आणि सरळमार्गी असणं सोडलं नाही.
शांत राहूनही अत्यंत आक्रमक आणि संयमी असूनही अत्यंत निग्रही राहता येतं याचं आजच्या जगातलं सभ्य उदाहरण म्हणजे हा जंबो!
त्यानं जे पराक्रम केले, जे रेकॉर्ड रचले. त्याची यादी तर मोठी होईलच. पण त्या कामगिरीचा कसलाही माज त्याच्या चेहºयावर कधी दिसला नाही. उलट अधिकाधिक संयत, नम्र होत त्यानं पुढचा पराक्रम केला. पुढची इनिंग रचली. 
आणि म्हणून तर पाकिस्तानचे दहा गडी बाद केल्यावरही तो संयत होता नी ४०० विकेट्सचं रेकॉर्ड केल्यावरही. 
व्यक्तिगत आयुष्यातही त्यानं त्या संयमाची, साधेपणाची, आणि सभ्यतेची शान कायम उंचावत ठेवली.
म्हणून तर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी त्याची नेमणूक हा एक साºया देशासाठी आनंदाचा विषय आहे..
आता नव्या इनिंगमध्ये हा जंबो काय कमाल करतो ते पहायचं.
पण भारतीय क्रिकेटला अत्यंत सभ्य चेहरा पुन्हा नव्यानं लाभला म्हणून त्याचं अभिनंदन करायला हवं..आणि क्रिकेटचंही!

Web Title: Jumbo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.