कच:याची जबाबदारी कुणाची? फक्त माझी!

By admin | Published: December 11, 2015 02:13 PM2015-12-11T14:13:37+5:302015-12-11T14:13:37+5:30

विवेक आणि त्रिशूल. ‘कच:याचं करायचं काय?’ या एका प्रश्नानं या दोन मित्रंना पछाडलं. आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ती दोघं काम करू लागली.

Kacha: Whose responsibility? Just mine! | कच:याची जबाबदारी कुणाची? फक्त माझी!

कच:याची जबाबदारी कुणाची? फक्त माझी!

Next
विवेक केमिकल इंजिनिअर. मात्र कार्पोरेट बडय़ा कंपनीत प्लास्टिक उत्पादनाचं काम नाकारून तो सध्या प्लास्टिकसह अन्य कच:यापासून इंधन कसं तयार करता येईल, कच:याच्या व्यवस्थापनातून समस्येवर उपाय तर सापडेलच, पण त्यातून मिळणा:या इंधनाचा उत्तम वापरही खेडय़ापाडय़ासह सर्वदूर कसा करता येईल यासाठी तो आयआयटी मुंबईच्या टाटा सेण्टरमधे काम करतो आहे.
चकचकाटी कार्पोरेट जग नाकारून त्यानं अधिक शाश्वत विकासाच्या दृष्टीने उत्तरांची वाट धरण्याचं ठरवलंय!
आणि त्रिशूल, सॉफ्टवेअरच्या जगाला सोडचिठ्ठी देत औरंगाबादमधे प्राध्यापक म्हणून काम करताना कच:याचा विचार व्यक्तिगत पातळीवर करतोय. ‘मी निर्माण केलेल्या कच:याचं व्यवस्थापन ही माझी जबाबदारी आहे, तो मी घरातच जिरवला पाहिजे’ या भूमिकेतून त्यानं वन बीएचके फ्लॅटमधे वापरता येईल असं सेंद्रिय खत बनवण्याचं मडक्यांचं युनिट तयार केलं आहे. आपल्या घरातल्या कच:याची जबाबदारी यंत्रणांवर ढकलणं योग्य नाही, अशी त्याची भूमिका आहे.
त्याच दोन मित्रंची ही भेट.
कच:याचा प्रश्न इतरांवर न ढकलता, उत्तरांचा भाग होण्यासाठी त्यांनी घेतलेला हा पुढाकार, ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे.
 
- ऑक्सिजन टीम
मुलाखती आणि शब्दांकन
-ऑक्सिजन टीम

Web Title: Kacha: Whose responsibility? Just mine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.