कमिने दोस्त
By admin | Published: October 27, 2016 03:56 PM2016-10-27T15:56:21+5:302016-10-27T15:56:21+5:30
दोस्त... आपलेच.. कधी कामाचे, कधी बिनकामाचे. काही त्रासाचे, काही जिवाभावाचे. त्यांचं काय करतो आपण? आपला मित्र, मैत्रीण म्हणते ना कधी कधी, तुला माझ्यासाठी वेळच नाही, तुझ्यालेखी मला काही किंमतच नाही.. कधी दिसतात, या दोन वाक्यांत त्यांच्या मनावर उमटलेले असंख्य ओरखडे..

त्या ओरखड्यांतली कोरडी ठसठस..
तडतड.
ती दिसत असेल,
तर दोेस्त आपले राहतात..
त्या दोस्तांसाठी
जगायला हवं आपणही असंच भरभरून..
जे त्यांनी आपल्यासाठी करावं असं वाटतं,
ते आपणच त्यांच्यासाठी करावं..
दोस्त खरंतर सतत देतच असतात
आपल्याला साथ..
सच्चे दोस्त.
ते बोलत नाही.
बोलले तर शिव्या घालतात.
अपमान करतात.
गरज नसते त्यांना
येताजाता आपले फेसबुक
स्टेटस अपडेट लाइक करण्याची..
आणि पीडीए करत
लोकांना आपलं
प्रेम जाहीर दाखवण्याची..
काळ कितीही बदलला तरी
अशा दोस्तांचा जमाना बदलत नाही..
त्या दोस्तांची सर
पाचहजार फेसबुक फ्रेण्ड्सना येत नाही..
कारण आपल्या चणचणीत,
आजारपणात, सुखादु:खात
लाईक्सची संख्या उपयोगी पडत नाही.
त्यामुळे लाईक ठोकणाऱ्यांपेक्षा
आपल्यासाठी बाईक काढून धावणारे
आणि गरज पडलीस तर आपल्यासाठी दुसऱ्यांना काय आपल्यालाही ठोकणारे,
ते दोस्त महत्वाचे.
प्रेमाचे.
ते सोबत असतील
तर रोजचं जगणं हीच एक ट्रीप होते.
सारं जगणं हेच एक सेलिब्रेशन होतं..
त्या दोस्तांना जपलं मात्र पाहिजे..
आणि जमलंच तर
दुसऱ्या कुणासाठी
तसा खास दोस्त
आपणच झालं पाहिजे..