काश्मिरी तरुणी ३ वर्षे उशिरा करतात लग्न

By admin | Published: April 5, 2017 06:35 PM2017-04-05T18:35:11+5:302017-04-05T18:35:11+5:30

गेली अनेक वर्षे झाली, काश्मीरचा विषय चर्चेत राहिला नाही असा एकही दिवस जात नाही. आताही काश्मीर चर्चेच आहेच.

Kashmarini marrying sisters who delayed by 3 years | काश्मिरी तरुणी ३ वर्षे उशिरा करतात लग्न

काश्मिरी तरुणी ३ वर्षे उशिरा करतात लग्न

Next

गेली अनेक वर्षे झाली, काश्मीरचा विषय चर्चेत राहिला नाही असा एकही दिवस जात नाही. आताही काश्मीर चर्चेच आहेच. काश्मीरच्या अशांततेचं नेहमीचं कारण तर आहेच, पण यावेळी काश्मीर गाजवताहेत त्या काश्मिरी ललना. केंद्र सरकारनं गेल्याच आठवड्यात एक अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार एक आश्चर्यकारक माहिती उघड झाली आहे. देशातील पुरुष आणि स्त्रियांच्या संदर्भातील अभ्यासाचा हा अहवाल सांगतो, जम्मू-काश्मिरातील तरुणींचं विवाहाचं वय देशात सर्वाधिक आहे. त्याचवेळी झारखंडच्या तरुणी मात्र अधिक लवकर विवाहबंधनात अडकून संसाराला लागतात. या अभ्यासात देशातील एकूण २१ राज्यांचा अभ्यास करण्यात आला आणि ठिकठिकाणच्या तरुणींच्या विवाहाच्या वयाचा आढावा घेण्यात आला. २०१४ मध्ये देशातील या २१ राज्यांतील तरुणींचं विवाहाचं सरासरी वय होतं २२ वर्षे आणि तीन महिने. त्याचवेळी जम्मू-काश्मीरच्या तरुणींचं विवाहाचं वय मात्र होतं तब्बल २५ वर्षे आणि दोन महिने. याच काळात झारखंडच्या तरुणींचं विविहाचं वय होतं २१ वर्षे. संपूर्ण देशातच तरुणींच्या विवाहाचं वय हळूहळू वाढतं आहे असं निरीक्षण हा अहवाल नोंदवतो. पण संपूर्ण देशात काश्मिरी तरुणींच्याच विवाहाचं वय इतकं जास्त का? गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मिरात फोफावलेला हिंसाचार आणि तिथली अशांतता, आपल्या भवितव्याविषयी वाटत असलेली चिंता हे तर त्याचं एक कारण आहेच, पण जम्मु-काश्मिरी तरुणींचा विवेकवाद हेही त्यामागचं एक कारण असल्याचं सांगितलं जातंय. याचसंदर्भात कै. बशीर अहमद दाबला यांनीही काश्मिरी तरुण-तरुणींच्या विवाहाचा अभ्यास केला आहे आणि २००८मध्ये तो प्रसिद्धही झाला आहे. नऊ वर्षांपूर्वी जम्मू-काश्मिरातील २५०० तरुण-तरुणींचा अभ्यास त्यांनी केला. त्यांची वैयक्तिक माहिती जमवली. त्यावेळीसुद्धा जेव्हा तेथील तरुणांचं विवाहाचं अपेक्षित वय २८ वर्षे होतं, त्यावेळी तब्बल ३२ व्या वर्षी ते विवाह करीत होते, तर वयाच्या किमान २६व्या वर्षी तरुणींचा विवाह व्हावा असं अपेक्षित असताना २८ व्या वर्षी त्यांचं लग्न होत होतं. खोऱ्यातला दिवसेंदिवस तीव्र होत जाणारा संघर्ष आणि तेथील अशांतता हे कारण तर बशीर यांनी नोंदवलं होतंच, पण या राज्यात कायमच पेटलेल्या असलेल्या बर्फामुळेही अनेक तरुणांनी आपल्या खोऱ्याला रामराम ठोकला होता आणि इतर ठिकाणी ते गेले होते. राहिलेल्यांसाठी हुंड्याचा प्रश्न मोठा होता. जम्मू-काश्मीरमधील तरुणींच्या विवाहाचं सरासरी वय २५ वर्षे दोन महिने असलं तरी शहरी भागातल्या मुलींची हीच सरासरी आणखी जास्त म्हणजे २५ वर्षे आठ महिने इतकी होती. ग्रामीण भागातील मुलींच्या विवाहाच्या वयाची सरासरी मात्र तुलनेनं थोडी कमी २४ वर्षे नऊ महिने होती. देशातील साक्षरतेचा दर ज्या राज्यात सर्वाधिक आहे, त्या केरळचा क्रमांक जम्मू-काश्मीरच्या नंतर लागतो. यासंदर्भातील आकडेवारीही मोठी रंजक आहे. देशातील तरुणींच्या विवाहाच्या वयाची ही आकडेवारी सातत्याने वाढतच गेली आहे. त्यात कायमच जम्मू-काश्मीरने आघाडी घेतली आहे. १९६१मध्ये भारतीय तरुणींच्या विवाहाचं सरासरी वय १५.२ वर्षे होतं, त्यावेळी जम्मू-काश्मीरच्या तरुणींचं विवाहाचं सरासरी वय होतं १७.५ वर्षे. देशाच्या आणि काश्मीरच्या संदर्भात २०१२ मध्ये हेच वय अनुक्रमे २१.२ वर्षे आणि २४.६ वर्षे होतं तर २०१४मध्ये २२.३ वर्षे आणि २५.२ वर्षे! याचाच सरळसरळ अर्थ म्हणजे देशातल्या तरुणींपेक्षा जम्मू-काश्मीरमधील तरुणी तब्बल तीन वर्षे उशिरा लग्न करतात. लग्न तर त्या उशिरा करतात, पण मनासारखा जोडीदार त्यांना मिळतो का, मिळाला का, याचं उत्तर मात्र अजून शोधायचं बाकी आहे.

Web Title: Kashmarini marrying sisters who delayed by 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.