गुगल लोकेशन चालू ठेवा नाहीतर बंद, गुगल तुम्हाला ‘लोकेट’ करतंय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 05:29 PM2020-09-18T17:29:06+5:302020-09-18T17:29:49+5:30
गुगल पीछे पीछे आए.
- प्रसाद ताम्हनकर
जगात काहीही शोधायचं असो, आपण गुगल करतो. गुगल करेंगे हाच आपला नारा. मात्र गुगलच्या मागेही सध्या भलतीच पीडा लागलेली आहे. यूझर्सच्या नकळत त्यांच्या मोबाइलमधील डेटावरती आणि इतर वापरल्या जाणार्या अॅप्लिकेशनच्या वापरावरतीही गुगल चोरून लक्ष ठेवत आहे असा आरोप गुगलवरती करण्यात आला होता. त्यात आता पुन्हा एकदा गुगलच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. आणि हे कुणी बाहेरच्या माणसानं नाही तर यावेळी चक्क गुगलच्याच इंजिनिअरने या प्रकरणाला वाचा फोडली आहे. वादाला कारणीभूत ठरली आहे, ती गुगलची ¬ Google Location Tracking Surveillanceही सेवा.
आपण विचार तरी करतो का, सतत फोनवर लोकेशन ऑनच असतं; पण आता आरोप असा करण्यात येतोय की, लोकेशन बंद ठेवल्यानंतरदेखील यूझर गूगलच्या रडारावरती दिसतो. हा खुलासा गुगलच्याच इंजिनिअर्सनी केला आहे. गुगलच्या लोकेशन अॅप्लिकेशन अॅपमध्ये काही त्रुटी आहेत आणि प्रायव्हसी सेटिंगमध्येच असलेल्या या त्रुटींमुळे हे अॅप पूर्णपणे सुरक्षित नाही. तीनच महिन्यांपूर्वी या संदर्भात अॅरिझोना प्रांताच्या एटर्नी जनरलनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत गुगल गोळा करत असलेल्या डेटा संग्रहणाच्या
प्रक्रियेवरती शंका उपस्थित करण्यात आली असून, ही डेटा संग्रहण पद्धती म्हणजे राज्याच्या ग्राहक फसवणूक कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप त्यात लावण्यात आलेला आहे.
यापूर्वी 2018 साली असोसिएट प्रेसने ग्राहकांच्या होणार्या फसवणुकीवरती एक रिपोर्ट बनवला होता. त्या रिपोर्टमध्येदेखील याबद्दल उल्लेख करण्यात आला होता.
खरं तर लोकेशन सव्र्हिस ऑफ केली की ती परत चालू करेर्पयत ऑफच राहायला हवी. मात्र गुगलच्या या सेवेमध्ये ती ऑफ केल्यानंतर, कधी ऑफ अर्थात बंद राहाते तर कधी चालूच राहाते ही सगळ्यात मोठी त्रुटी समोर आली आहे.
त्यामुळे आपल्या खासगीपणावर गुगलचा डोळा आहे, हे विसरू नका.