सुरक्षित अंतर ठेवाच!
By Admin | Published: June 11, 2015 02:44 PM2015-06-11T14:44:29+5:302015-06-11T14:44:29+5:30
तुम्ही ऑफिसमध्ये असता, लिफ्टमध्ये असता, वॉशरूमच्या रांगेत उभे असता. कसे उभे असता? म्हणजे पुढच्या माणसापासून किती लांब?
दुस:याला खेटून उभं राहताय?
तुम्ही ऑफिसमध्ये असता, लिफ्टमध्ये असता, वॉशरूमच्या रांगेत उभे असता.
कसे उभे असता?
म्हणजे पुढच्या माणसापासून किती लांब?
खरं तर एक साधा नियम आहे की, आपला दुस:या माणसाला स्पर्श होता कामा नये आणि अगदी त्याच्या नाकासमोर आपण जाऊन उभं राहता कामा नये!
पण एवढी साधी गोष्ट अनेकांना कळत नाही. अगदी जवळ, अगदी खेटूननेटून उभं राहण्याची सवय अनेकांना असते.
नव्या जगात या सा:याला अत्यंत असभ्य आणि दुस:याच्या पर्सनल स्पेसवरचं आक्रमण आणि अतिक्रमण मानलं जातं!
त्यामुळे कधीही सुरक्षित अंतर ठेवलेलंच बरं!