Kiss Love & आंदोलनाची अळीमिळी गुपचिळी
By admin | Published: November 20, 2014 06:30 PM2014-11-20T18:30:36+5:302014-11-20T18:30:36+5:30
लाजा नाही वाटत भररस्त्यात अशी नस्ती थेरं करायला ? तुम्हाला प्रायव्हसी हवी असेल हो, पण बाकीच्यांच्या प्रायव्हसीचं काय? त्यांना किती ऑकवर्ड होतं, ‘असले’ जाहीर प्रकार पाहून.! लाज म्हणून काही आहे की नाही?
Next
>लाजा नाही वाटत भररस्त्यात अशी नस्ती थेरं करायला ? तुम्हाला प्रायव्हसी हवी असेल हो, पण बाकीच्यांच्या प्रायव्हसीचं काय? त्यांना किती ऑकवर्ड होतं, ‘असले’ जाहीर प्रकार पाहून.!
लाज म्हणून काही आहे की नाही?
कॅफेजवळच्या पार्किंगमधे
गाड्यांवर बसून आले असतील ते दोघे एकमेकांच्या जरा जास्तच जवळ, म्हणून काय लगेच मारायला निघाल त्यांना?
अरे, हा देश आहे की मोगलाई?
कसली ह्यांची आंदोलनं? नुस्ते प्रसिद्धीपिसाट-पोंगापंडित.
काढ फोटो की टाक फेसबुकवर.
मिळव लाईक्स-कमेण्ट, निर्लज्ज नुस्ते!!
सगळ्याचा इव्हेण्ट आणि बाजार करतात,
कसलं गांभीर्य म्हणून नाहीच त्यांना. सगळी प्रसिद्धीची थेरं!!
प्रेम करायला विरोध,
केलंच तर चोरूनलपून करा,
नाहीतर गप्प बसा,
चारचौघात तर सुरक्षित
अंतरच ठेवा.
या तरुण देशात
किती ढोंग कराल?
देश तरुणांचा आहे ना, मग त्यांना त्यांच्या
वयाच्या म्हणून
काही गरजा
असतील की नाही?
तुम्हाला होतो ना त्रास,
मग द्या ना लव्हर्स पार्क !
आम्ही तिकडे जाऊ!!
कोण म्हणतं,
खेड्यात नसतंच असलं काही?
जरा बघा काय चाललंय खेड्यापाड्यात
गावातली पोरंपोरीही
शहरी पोरांइकीच फॉरवर्ड झाली आहेत!!
संस्कृतीचं काय घेऊन बसलात?
सगळीच अळीमिळी गुपचिळी!
केरळमध्ये झालेल्या एका घटनेनं देशभरातल्या बड्या शहरात ‘किस ऑफ लव्ह’ नावाचं आंदोलन भडकलं. गर्दी जमवून ‘किस’ करणारे तरुण स्वातंत्र्याच्या लढाया लढत असल्याच्या बाता मारू लागले आणि विरोध करणारे संस्कृतीचे झेंडे मिरवत त्यांना अडवू लागले.
पण खरंच प्रश्न आणि उत्तरं या दोन टोकांवर आहेत? की मूळ मुद्दा भलतीकडेच आहे?
आणि असला तर तो नेमका काय?
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com