गेली 13 वर्ष
By admin | Published: May 20, 2016 10:57 AM2016-05-20T10:57:53+5:302016-05-20T10:57:53+5:30
अन्सार शेख म्हणाला, मी मुस्लीम होतो, म्हणून मला राहायला खोली मिळाली नाही. शेवटी तो नाव बदलून राहिला आणि शिकला. माझा अनुभवही वेगळा नाही, पण फक्त एकांगीही नाही. गेली तेरा र्वष मी घराबाहेर राहतोय. मलाही ‘नकार’ मिळाले, संताप आला; पण माझ्यावर प्रेम करणारी, मला जीव लावणारी माणसंही मला इथेच मिळाली.
Next
अन्सार शेख म्हणाला, मी मुस्लीम होतो, म्हणून मला राहायला खोली मिळाली नाही. शेवटी तो नाव बदलून राहिला आणि शिकला. माझा अनुभवही वेगळा नाही, पण फक्त एकांगीही नाही. गेली तेरा र्वष मी घराबाहेर राहतोय. मलाही ‘नकार’ मिळाले, संताप आला; पण माझ्यावर प्रेम करणारी, मला जीव लावणारी माणसंही मला इथेच मिळाली. दारं बंद झाली हे खरं, पण माझ्यासाठी दारं उघडली, हेही खरं!
-मी तेही सांगितलं पाहिजे. आणि हेही, की अशी एकमेकांबद्दल अढी धरून बसणारी माणसं
‘तिकडे’ही असतात आणि ‘इकडे’ही!
एकमेकांना उगीचच दूर लोटू पाहणारा हा विनाकारण संशय कोण आपल्या डोक्यात घालतं, हे आपण तरुण मुलामुलींनी तरी शोधलंच पाहिजे!
शेख आमीर रसूल
गेल्या आठवडय़ात यूपीएससी परीक्षेत मूळच्या जालन्याच्या आणि पुण्यात शिकणा:या अन्सार शेख या मुस्लीम तरुणानं चांगलं यश संपादन केलं. त्यानिमित्तानं दिलेल्या मुलाखतीमधे त्यानं म्हटलं की, ‘मी जेव्हा पुण्यात शिक्षणासाठी आलो त्यावेळी मी मुस्लीम असल्या कारणानं मला अनेक ठिकाणी राहण्यासाठी घर नाकारण्यात आलं. शेवटी मी ‘शुभम’ हे टोपणनाव धारण करून, आपली मुस्लीम असण्याची ओळख लपवून पुण्यात राहू लागलो.’
त्याच्या या वक्तव्यानं समाजमाध्यमात आणि प्रसारमाध्यमात अनेक उलटसुलट प्रतिक्रिया समोर आल्या. अनेकांनी आपण मुस्लीम असल्याकारणानं आपल्याला अनेक ठिकाणी घर कसं नाकारलं गेलं तसंच अनेक प्रकारच्या डायरेक्ट, इनडायरेक्ट भेदभावाला कसं सामोरं जावं लागलं याचे अनुभव शेअर केले.
वरपांगी मला ही एकूण चर्चा जरा एकांगी वाटली, त्यात नकारार्थी सूरच जरा अधिक वाटला. वरील वागणूक ही अन्याय्य नक्कीच आहे. स्वातंत्र्यानंतर 67 वर्षानंतरही, शिक्षणाचा प्रसार हा समाजातील सर्व स्तरांमध्ये झालेला असतानाही आपल्या समाजातील काही समाजघटकांना अशा अनुभवांना सामोरं जावं लागतं हे नक्कीच खेदजनक आहे; मात्र अतिशय संवेदनशील असणा:या या विषयाची चर्चा जरा व्यापक, समतोल आणि विश्लेषणांसह होणं मला अधिक योग्य वाटतं.
गेली 13 र्वष म्हणजे वयाच्या 14 व्या वर्षापासून मी घराबाहेर राहत आहे. खोली भाडय़ानं घेऊनच मी गेली 13 वर्षे राहिलो, अजूनही राहत आहे. या 13 वर्षात 2-3 महिन्यांचा अपवाद वगळता मी एकही वर्ष कधी मुस्लीम घरात राहिलो नाही. या 13 वर्षात माझे वास्तव्य हे तीन शहरांमध्ये हिंदू धर्मीय घरातच राहिलं आहे. या पाश्र्वभूमीवर मला माङो अनुभव या ठिकाणी नमूद करणं महत्त्वाचं वाटतं.
आपण कुणीतरी वेगळे आहोत याची जाणीव आपल्याला साधारणत: दोन गोष्टींमुळे होत असते. एक म्हणजे आपल्यामध्ये असणारी काही वेगळी अंगभूत कौशल्यं आणि दुसरं म्हणजे आपल्याला लाभलेली आपली सांस्कृतिक, धार्मिक, जातीय तसेच भौगोलिक, भाषिक पाश्र्वभूमी. आपल्यामध्ये असणा:या अनेक अस्मितांची कारणं ही वरील दोन प्रकारांमध्ये विखुरलेली असतात.
मी कुणीतरी वेगळा आहे, याची जाणीव मला मी सहावी-सातवीत असताना होऊ लागली. त्यावेळी या सर्वाचा अर्थही मला नीट समजत नव्हता. पण आपण कुणीतरी वेगळे आहोत, असं वाटण्याची दोन प्रमुख कारणं होती. एक तर माझं मराठी हे इतरांपेक्षा बरं होतं आणि मी शिवाजी महाराजांवर फार उत्साहानं भाषण करायचो. या दोन गोष्टींची जरा जास्तच चर्चा माङया शाळेमध्ये, आसपास होत असे. एक मुसलमान मुलगा शिवाजी महाराजांवर कसं काय बोलू शकतो आणि इतकं छान मराठी कसं काय बोलू शकतो, याचं इतरांना जरा जास्तच आश्चर्य वाटायचं.
मी पहिल्यांदा घराबाहेर पडलो. त्यावेळी मी आठवीला होतो, ते शहर होतं लातूर. लातूरमध्ये मी जवळपास 7 वर्षे राहिलो. या सात वर्षामध्ये मी एकूण दहा-अकरा ठिकाणी वास्तव्य केलं. यामध्ये मी सर्व ठिकाणी हिंदू धर्मीय घरमालकांच्या खोलीत राहिलो.
या सात वर्षामध्ये आपण मुस्लीम आहोत याची जाणीव कधी मलाच प्रकर्षाने झाली, तर कधी ती करून दिली गेली. लातूर येथील माङया वास्तव्यात मी अनेक ब:या-वाईट अनुभवांतून गेलो आहे. मुस्लीम असल्या कारणानं मी अनेक ठिकाणी ङिाडकारलो गेलो, नाकारलो गेलो आहे. इतपत की अनेक दिवस मला माझं नाव सांगायला पण लाज वाटायची. पण याचा अर्थ असा नक्कीच नाही की, मला सर्वच ठिकाणी मुस्लीम म्हणून नाकारणारी, ङिाडकारणारी माणसं, संस्था भेटत गेल्या.
तेव्हा मी एकटाच खोली शोधायचो (त्याकाळी ब्रोकर नव्हते). अनेक कारणं देऊन मला घर नाकारलं जायचं. एके ठिकाणी मी खोली शोधायला गेलो होतो. मला चोर समजून पोलिसांना फोन करण्याइतपत मजल तिथल्या आजोबांनी मारली. अनेक ठिकाणी इनडायरेक्ट कारणं दिली जायची. आधी आडनाव काय विचारलं जायचं. आडनाव काय हा प्रश्न विचारल्यावर माङया पोटात गोळाच यायचा. भीती वाटायची. पण आडनाव सांगावंच लागायचं. अनेक ठिकाणी रूम दाखवली जायची, भाडं ठरवलं जायचं (कारण दिसण्यावरून आणि बोलण्यावरून, राहणीमानावरून मी कधीच कुणाला मुस्लीम वाटायचो नाही.) आणि शेवटी आडनाव सांगितलं की उत्तरादाखल सांगितलं जायचं की आधीच काहीजण पाहून गेले आहेत. त्यांनी नाही सांगितलं तर मग तुम्हाला कळवू. आपण काय ते समजून तिथून निघायचं. असं खूपदा घडायचं. अनेक ठिकाणी सरळ सांगितलं जायचं की, आम्ही मुस्लिमांना घर देत नाहीत.
एक 15-16 वर्षाचा मुलगा कुणासाठी काय धोका असू शकतो? काय अडथळा असू शकतो, हा प्रश्न मला पडायचा. मी बारावीला असताना माझी आई माङया जवळ आली होती राहण्यासाठी. त्यावेळी ती आली असताना एका ठिकाणी मी रूम शिफ्ट केली. त्यांनी दोन दिवसात मला रूम खाली करायला सांगितली. मी माङया बाबांना कधी रूम शोधू दिली नाही. कारण त्यांना या सर्व अनुभवांतून मला जाऊ द्यायचं नव्हतं. त्या बालवयात या सर्व गोष्टींचे माङया मनावर खूप ओरखडे उमटले आहेत. नंतर नंतर या गोष्टी मला सवयीच्या होत गेल्या.
पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातही मला असेच अनुभव आले. येथे ब्रोकरला आधीच सांगावं लागायचं की, आम्ही मुस्लीम आहोत. मालकाला ते आधीच सांगून ठेव.आता तर रूम बदलायची म्हटली की मला धस्सच होतं.
हिंदूबहुल वस्तीमध्ये कुणी घर देत नसेल तर मुस्लीमबहूल वस्तीमध्ये घर शोधणं हा पर्याय असायचा. तिथं पाहिलं तर सारखंच चित्र दिसायचं. तिथं हिंदूना घरं भाडय़ानं दिली जायची नाहीत. मुस्लिमांनाच दिली जायची. पुण्यामधील एक अनुभव असा आहे, मी एके ठिकाणी फ्लॅट पहायला गेलो होतो. ते घर मुस्लीम कुटुंबाचं होतं त्या ठिकाणी 3-4 फ्लॅट रिकामे होते. त्यांना ते मुस्लीम कुटुंबालाच द्यायचे होते. दोन दिवसआधी आपण एका ािश्चन कुटुंबाला घराबाहेर कसं काढलं हे त्यांनी सांगितलं आणि त्यात त्यांना स्वत:चा अभिमान वाटत होता. त्या कुटुंबप्रमुख बाई न्यायाधीश होत्या. अर्थातच, अशा ठिकाणी मला रहायचं नव्हतं, मी ते घर घेतलं नाही.
हा अनुभव फक्त रूमच्या बाबतीतच येतो असं नाही. इतर अनेक प्रसंगी असे अनुभव येत असतात. मला जर कोणी माझं नाव विचारलं तर मोठी गंमत येते. मी अतिशय मोठय़ा आवाजात स्पष्टपणो माझं नाव अमीर असं सांगितलं तरी ते अनेकांना ‘अमर, अमित, समीर’ असंच ऐकू जातं. ‘अक्षरमित्र’ हा उपक्रम मी सुरू केल्यावरही या उपक्रमाचा संचालक ‘अमीर शेख’ असू शकतो हे अनेकांना पटायचं नाही. शेवटी याचा मालक कुणीतरी पुणोस्थित ‘मेहता, कुलकर्णी’ आणि मॅनेजर अमीर शेख आहे, हे सांगितल्यावर गाडी पुढे सरकायची.
असे अनेक अनुभव आले. आधी खूप राग यायचा, नंतर कीव यायला लागली या सर्वाची. सवयीच्या झाल्या या सगळ्या गोष्टी. कधी तू वेगळा आहेस, चांगला आहेस असा भाव खाऊन जायचो तर कधी नाकारला जायचो. दोन्ही गोष्टी सारख्याच क्लेशदायक होत्या, आहेत माङयासाठी.
हे सर्व मुसलमानांच्या बाबतीतच घडतं का? तर नाही. बहुजन समाजाच्या बाबतीतही या गोष्टी प्रकर्षाने घडतात. ही ओळख उघड करणारी आडनावं सांगा, तुम्हाला कुणी घरं देणार नाहीत किंवा आपल्या कळपात लवकर सामील करून घेणार नाहीत. ख्रिश्चन बांधवांनाही ह्या अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं.
ही झाली नाण्याची एक बाजू. कुठल्याही नाण्याला दोन बाजू असतात. त्या दोन्हीही बाजू समोर येणं आवश्यक असतं. अशी माङया नाण्याची दुसरी बाजू मी येथे मांडत आहे.
गेली 13 वर्षे मी बाहेर राहिलो. घरं नाकारली गेली हे खरं; पण अशा अनेक नकारातून जाऊन अखेरीस जे होकार आले, तेही दिलासादायकच होते. मी सर्व ठिकाणी हिंदू कुटुंबातच राहिलो. त्यांनीच मला ख:या अर्थाने वाढवलं. माझं बहुतांश वास्तव्य हे लातूर शहरात गेलं. ख:या अर्थानं माङया आयुष्याला वळण देणारी, अर्थ देणारी माणसं मला याच शहरात भेटली. माझी शाळा ही ‘केशवराज’ होती. या शाळेत माझा प्रवेश हा माङो घरमालक कुलकर्णीकाकांच्या शिफारशीने झाला. माङया आयुष्याला विधायक वळण देणारी, माङयावर जिवापाड प्रेम करणारी, मी आयुष्यात खूप यशस्वी व्हावं यासाठी झटणारी माणसं, माङो शिक्षक मला केशवराज मध्येच भेटले. या शाळेमध्ये मी 3 वर्षे होतो.
माङया कवितांवर आणि माङयावर प्रेम करणा:या सांगवीकर मॅडम, मी आजारी असल्यावर आपल्या घरून डब्बा आणून मला भरवणारे सेलूकर सर, माङो लातूरमधील पालकत्व स्वीकारणारे वसमतकर सर, मी वेगळा आहे, मी वेगळं काहीतरी करू शकतो याची जाणीव असणारे, तसा प्रय} करणारे माङो स्थानिक पालक, भावराणकर सर, कट्टर संघसेवक असूनही माङया वाचनाचे, कवितांचे फॅन असणारे, आपल्या अनेक सामाजिक दौ:यात मला आनंदाने आपणहून सामील करून घेणारे काशीकर सर अशी सर्व मंडळी मला इथे भेटली. माङया हातात पहिलं पुस्तक ठेवणारे आणि माझी वाटचालही सामाजिक चळवळीकडे होण्यास कारणीभूत ठरणारे नरहरे सर मला इथेच भेटले.
मी शाळेतून लवकर आलो नाही तर माङयासाठी जेवायला थांबणा:या, अवांतर पुस्तकं घेता यावीत, त्यासाठी पैसे वाचावेत म्हणून मी एकवेळेस जेवण करतो हे कळल्यावर मला सुनावणा:या आणि मला दररोज एक वेळ मला जेवायला घालणा:या शिंदेकाकू, मी रूम सोडणार हे कळताच ढसढसा रडणारे शिंदेकाका हे दांपत्यही मला इथेच भेटलं. माङया कामाचं, वाचनाचं भारी कौतुक असणारे, आम्हा मुलांवर जिवापाड प्रेम करणारे कुलकर्णी दांपत्य, अचानक बाजारात भेटल्यावर दोन किलो सफरचंद विकत घेऊन देणारे चहावाले काका मला इथेच भेटले.
मी दहावीला असताना मला खोली मिळत नव्हती. तेव्हा माझा मित्र सागर याने माझं आमीर हे नाव बदलून अमर असं करून मला आपल्या घरी ठेवलं. शेवटी त्याच्या आईला खरं काय ते समजलं; परंतु तोर्पयत मी त्यांच्या घरातला एक झालो होतो. सागरच्या आई-काकूंना माङयामुळे वाचनाची आवड लागली. त्यांच्या समविचारी मैत्रिणींना एकत्र करून त्यांनी एक रीडर्स क्लब बनवला. त्यांना मीच पुस्तकं घेऊन देत असे. त्यातून येणा:या डिस्काऊण्ट मधून मला पुस्तकं घेण्यास परवानगी होती.
पुढे मी नगरला आलो. तिथेही मला अनेक चांगली माणसं भेटत गेली.वडिलांच्या मृत्यूनंतर घराची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उभा राहिल्यावर मला आपल्या घरात वर्षभर ठेवणारे, आपल्या कुटुंबाचा एक भाग म्हणून घेणारे स्नेहालय या संस्थेचे संचालक डॉ. गिरीश कुलकर्णी (मी त्यांना बाबाच म्हणतो) इथेच भेटले. या घरात आईसारखे प्रेम करणा:या आमच्या सर्वाच्या आई तसेच अक्षरमित्र सुरू व्हावे म्हणून पाठीशी भक्कम उभ्या राहणा:या अर्चनाताई याच घरात भेटल्या. डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या घरातच अक्षरमित्र सुरू झालं.
ज्यांनी मी माङो बाबा मानतो ते सातपुते काका-काकू , अक्षरमित्र अडचणीत असताना पाठीशी उभे राहणारे शिंदे सर आणि जवळचा मित्र संदीप, मोठय़ा भावासारखा पाठीशी सदैव उभा असणार गोविंद, अनिल ही सर्व माणसं मला माङया या प्रवासात भेटत गेली. माझी जबाबदारी त्यांनी वाटून घेतली. माझं पालकत्व स्वीकारलं, मी मोठा व्हावे, माङयाकडून काहीतरी चांगलं घडावं म्हणून सतत मदत करणारे माङयासाठी सतत धडपडणारे मित्र, मार्गदर्शक मला या माङया प्रवासात भेटत गेले. वर उल्लेखलेली सर्व माणसं ही हिंदूच आहेत.
.. सांगायचा मुद्दा हा की माणसं, धर्म, जाती वाईट नसतात. वाईट या प्रवृत्ती असतात. अशा प्रवृत्ती सर्व जाती-धर्मात कमी-अधिक प्रमाणात असतात. व्यक्तींमधील दोष आपण त्या-त्या जाती-धर्माला चिटकवून टाकतो आणि धर्मावर शिक्का मारतो हे बरं नव्हे.
इथे हिंदूविरोधात मुसलमानांच्या मनात राग आहे आणि मुसलमानांविषयी हिंदूच्या मनात राग आहे. बाबरीच्या घटनेनंतर देशभरात जे घडलं त्याने गावांच्या (मतदारसंघात) संरचनेत महत्त्वाचे बदल घडत गेले. सुरक्षिततेच्या नावाखाली जाती-धर्मावर आधारित गल्ली-मोहल्ले विभागले गेले. सण, उत्सव, थोर माणसं आपापसात वाटली गेली. त्यामागील अर्थ-संदर्भ बदलत गेले. एका बाजूला विज्ञान, तंत्रज्ञान प्रगती करत असताना माणूस म्हणून आपली अधोगतीच अधिक होत राहिली आहे असं मला वाटतं.
शाळेत राष्ट्रगीत न म्हणणारी, प्रार्थनेला हात न जोडणारी, शाळेत सरस्वती पूजन करावं लागतं म्हणून थेट शिक्षकाची नोकरी नाकारून स्टोव्ह दुरूस्त करण्यात धन्यता मानणारी माङया समाजातील माणसंही मला या प्रवासात भेटत गेली. ह्या प्रेरणा यांमध्ये कोण रुजवतो, याचाही शोध घेणं गरजेचं आहे.
आपण तिस:या भूमिकेतून स्वत:कडे पाहत समजून घेणं, काळानुरूप, परिस्थितीनुसार आपल्यामध्ये बदल करत राहणं गरजेचं आहे. अल्पसंख्याक समूह ही आपली जबाबदारी आहे, हे बहुसंख्याकांनी समजून घेतलं पाहिजे. बहुसंख्याकवाद फोफावत असताना अल्पसंख्याकात कट्टरवाद वाढण्याची शक्यता फार जास्त असते. अशावेळी अल्पसंख्याकांचीही जबाबदारी वाढत असते. त्यांनी बहुसंख्याकांच्या हेतूंना बळी न पडता अधिक जबाबदारीनं े भूमिका पार पाडणं गरजेचं असतं.
आजवरच्या सगळ्या ब:यावाईट अनुभवांतून जात असताना माङया ‘पुस्तक’ नावाच्या मित्रनं मला खूप साथ दिली. त्यानं मला स्वत:कडे तिस:या भूमिकेतून पहायला शिकवलं. त्यामुळेच स्वत:कडे वस्तुनिष्ठपद्धतीनं पाहून माङया चुकाही मला सुधारता आल्या. अधिक जबाबदार बनता आलं. विवेकाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली, रागाचं रूपांतर संकल्पात केलं. आणि आज त्याच संकल्पातूनच अक्षरमित्र या खेडोपाडी उत्तम पुस्तक पोहचवणा:या संकल्पनेचा जन्म झाला आहे.
- शेख आमीर रसूल
(खेडय़ापाडय़ातल्या शाळांमध्ये शिकणा:या मुलांर्पयत उत्तम पुस्तक पोहचावीत म्हणून अक्षरमित्र हा उपक्रम राबवणारा आमीर पुण्यात फग्यरुसन कॉलेजमध्ये बीए करतो आहे.)
aksharmitrabooks@gmail.com